कार्तिकी सोहळ्यातील भाविकांना नोटा बदलून द्या : जिल्हाधिकारी
एबीपी माझा वेब टीम | 10 Nov 2016 10:27 AM (IST)
पंढरपूर : पंढरपुरात कार्तिकी सोहळ्यासाठी आलेल्या भाविकांची पाचशे, हजारच्या नोटा बंद झाल्यामुळे प्रचंड गैरसोय झाली आहे. ती टाळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी बँकांना वारकऱ्यांना नोटा बदलून देण्यासाठी जादा काऊंटर उघडण्याचे आदेश दिले आहेत. abpmajha.abplive.in उद्या होणाऱ्या प्रबोधिनी एकादशीसाठी पंढरपूर शहरात पाच लाखांपेक्षा जास्त भाविक दाखल झाले आहेत. मात्र नोटा स्वीकारल्या जात नसल्यामुळे भाविकांवर उपासमारीची वेळ आली आहे. abpmajha.abplive.in कार्तिकी एकादशीची शासकीय महापूजा महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते होणार आहे. दरम्यान जिल्हाधिकाऱ्यांच्या या निर्देशानंतर भाविकांची गैरसोय दूर होईल, अशी अपेक्षा केली जात आहे. abpmajha.abplive.in पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काळा पैसा, बनावट नोटा रोखण्यासाठी पाचशे आणि हजारच्या नोटा चलनातून रद्दबातल करण्याचा निर्णय जाहिर केला. त्यानंतर मंगळवार मध्यरात्रीपासून पाचशे आणि हजारच्या नोटा स्वीकारणं बद केलं आहे. abpmajha.abplive.in बँका आजपासून ग्राहकांना नव्या पाचशे आणि दोन हजारच्या नोटा देणार आहे. याबदल्यात जुन्या पाचशे आणि हजारच्या नोटा बँकेत जमा कराव्या लागणार आहेत. संबंधित बातम्या