अमरावती : भारतीय सैन्य दलाचे एअर बलून हवेच्या अतिरिक्त दाबामुळे अमरावती जिल्ह्याच्या अचलपूर तालुक्यातील निंभारी ते सोनगाव दरम्यान शिवारात आज दुपारी अचानक उतरले. हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी एअर बलूनचे आकस्मिक लँडिंग केले.
बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली होती. भारतीय लष्काराचं हॉट एअर बलून जम्मूहून देशभ्रमंतीसाठी निघालं आहे. सध्या हे हॉट एअर बलून अकोल्यात दाखल झाले आहे.
हे एअर बलून अकोल्याला येत असतांना ही घटना घडली आहे. आज संध्याकाळी ते अकोल्यात पोहोचले. उद्या सकाळी अकोल्यावरून ते नांदेडकडे रवाना होणार आहे.
जमिनीपासून सुमारे 10 हजार फुटांवरून प्रवास करणारे हे एअर बलून 10 ते 12 जवान घेऊन काश्मीर ते कन्याकुमारी, असा प्रवास करीत होते. परतवाडा येथून अकोल्याला ते निघाले होते. परंतु, हवेच्या अतिरिक्त दाबामुळे तांत्रिक दोष निर्माण झाल्याने सैन्य अधिकाऱ्यांनी एअर बलूनचे आकस्मिक लँडिंग केले. तिथूनच सैन्य अधिकाऱ्यांना मदतीसाठी बोलावण्यात आले. वाहनाने बलूनसह जवानांना अकोला येथे नेण्यात आल्याची माहिती आहे.
दरम्यान, बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली होती. सैन्याच्या जवानांना भेटल्याचे समाधान त्यांच्या चेहऱ्यांवर झळकत होते.
अमरावतीत लष्कराचे एअर बलून उतरले
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
01 Dec 2018 10:39 PM (IST)
बलून उतरत असल्याचे फार लांबून दिसल्याने गावोगावच्या नागरिकांनी या एअर बलूनभोवती गर्दी केली होती. भारतीय लष्काराचं हॉट एअर बलून जम्मूहून देशभ्रमंतीसाठी निघालं आहे. सध्या हे हॉट एअर बलून अकोल्यात दाखल झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -