Arijit Singh Pune : सुप्रसिद्ध गायक अरिजीत सिंग (Arijit Singh) नवीन वर्षात गाण्याच्या कॉन्सर्टसाठी पुण्यात येणार आहे. द मिल्समध्ये हे कॉन्सर्ट असणार आहे. अनेक पुणेकर या कॉन्सर्टसाठी उत्सुक आहेत. मात्र याच कॉन्सर्टच्या तिकीटांची किंमत पाहून अनेक संगीत प्रेमी तरुणांच्या भुवया उंचावल्या आहेत. 900 ते तब्बल 16 लाखपर्यंत या कॉन्सर्टचं तिकीट असणार आहे. या तिकीटांची किंमत पाहून पुणेकर तरुण सध्या चांगलेच निराश झाले आहेत.


अरिजीत सिंग हा सध्याच्या तरुणांचा आवडता गायक आहे. त्याचा लाईव्ह गाणं ऐकणं अनेकांचं स्वप्न असतं. अनेक तरुणांच्या तोंडी सध्या अरिजीत सिंगचं गाणं दिसतं. येत्या नव्या वर्षात अरिजीत सिंगचं गाणं लाईव्ह ऐकण्याची संधी पुणेकरांना मिळणार आहे. नवीन वर्षात द मिल्समध्ये त्याचा कॉन्सर्ट आयोजित करण्यात आला आहे. मात्र या तिकीटांची किंमत पाहून सगळेच अवाक् झाले आहेत. 


तिकीट-बुकिंग साईटनुसार, प्रीमियम लाऊंज वनच्या तिकीटांची किंमत तब्बल 16 लाख रुपये आहेत. त्यात 40 खुर्च्या बसू शकतात. अमर्यादित अन्न आणि प्रीमियम मद्य असेल. यात उपस्थितांसाठी स्टार्टर्स, मेन कोर्स देखील असतील. मोकळ्या एरियामध्ये किंमती 999, प्रीमियम लाऊंज 2 ची किंमत 14 लाख रुपये, 3 ची किंमत 12 लाख रुपये आणि चारची किंमत 10 लाख रुपये आहेत. यात किमान लाऊंज 2 मध्ये 40, 3 आणि 2 मध्ये 30 सीट्स असणार आहे. 


तिकीटांची किंमत पाहून चाहते निराश
या कॉन्सर्टसाठी लागणारं महागडं तिकीट पाहून चाहते निराश झाले आहेत. अनेक चाहत्यांनी ट्विटरवर त्यांनी निराशा दर्शवली आहे. अनेक चाहत्यांनी या तिकीटांच्या कॅटेगिरीचा किंवा फिल्टरचा फोटो शेअर केला आहे. त्यावर अनेकांनी आपली मतं देखील मांडली आहेत. तर काहींनी मिश्किल भाषेत टिप्पणी केली आहे तर अनेकांनी आम्ही रात्रीच रडत घरीच अरिजीत सिंगचं गाणं ऐकू अशा भन्नाट प्रतिक्रिया दिल्या आहे. शिवाय यातील बऱ्याच प्रतिक्रिया भाव खाऊन जात आहेत. यावर लोक एकमेकांना समजवण्याचा देखील प्रयत्न करत असल्याचं ट्विटमध्ये दिसत आहे. 






'रात्रीच रडत ऐकण्यासाठी अरिजीतची गाणी'
या तिकीटांची किंमत पाहून अनेकांनी ट्विट केलं आहे. त्यात आम्हाला अरिजितची गाणी आवडतात. 'अरिजीत सिंगचं गाणं ऐकण्यासाठी 16 लाख देण्याची काहीच गरज नाही. त्याचं गाणं शांततेत रात्री ऐकून कोणाच्यातरी आठवणीत रडण्यासाठी आहे', अशी एकाने कमेंट केली आहे. तर एका व्यक्तीने वेबसाईटवर चुकून ही किंमत टाकण्यात आल्याचं म्हटलं आहे.