- 11 जुलैला आरोपींनी पीडितेला अडवलं. आरोपी जितेंद्र शिंदेनं हात ओढून अत्याचारासाठी चारीकडे खेचलं. यावेळी मैत्रीण रडली. यावेळी आरोपी भवाळ आणि नितीन भैलुमे हसत होते. निशस्त्र मुलीला हसून ओढतात. त्यामुळं शिंदेच्या कृतीचा भवाळ आणि नितीन भैलुमे आनंद घेत होते.
- नागरिक येण्याच्या भितीनं दोघांनी आपलं काम तिला नंतर दाखवू, असं शिंदेला म्हटलं. म्हणजेच आपण दोघे नंतर अत्याचार करु हा अर्थ होतो.
- त्यानंतर पीडित तरुणी दोन दिवसांनी 13 जुलैला सायंकाळी आजोबाकडे दुचाकीवरुन जात होती. यावेळी आरोपी दुचाकीवरुन लक्ष ठेवत होते.
- घराबाहेर गेलेली मुलगी घरी लवकर न आल्यानं आई पाहायला निघाली. त्यावेळी पीडित विवस्त्र पडली होती आणि त्यावेळी शिंदे पळून गेला. यापूर्वी भवाळ आणि नितीन भैलूमे यांनी आरोपी शिंदेला पळून जाण्यासाठी दुचाकी तयार ठेवली होती.
- तिन्ही आरोपी मनोरुग्ण नव्हते. आरोपी प्रौढ होते. त्यांना कृत्याची जाणीव होती. त्यामुळे आरोपींना कमी शिक्षा दिल्यास समाजात, ते पुन्हा असं करणार नाही, याची खात्री नाही. तिन्ही आरोपींना क्रूरपणे आत्याचार आणि हत्या केली. ही विकृती आहे. त्यामुळे तिघांनाही फाशी द्यावी.
कोपर्डीचा युक्तीवाद जसाच्या तसा : अॅड. उज्ज्वल निकम विरुद्ध तीन वकील
एबीपी माझा वेब टीम | 22 Nov 2017 01:22 PM (IST)
कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि दोषींच्या तिन्ही वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली आहे. 29 नोव्हेंबरला दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे.
अहमदनगर : कोपर्डी बलात्कार आणि हत्या खटल्यात विशेष सरकारी वकील उज्ज्वल निकम आणि दोषींच्या तिन्ही वकिलांचा युक्तीवाद पूर्ण झाला. तिन्ही आरोपींना फाशीची शिक्षा द्यावी, अशी मागणी उज्ज्वल निकम यांनी केली आहे. 29 नोव्हेंबरला दोषींना शिक्षा सुनावली जाणार आहे. अॅड. योहान मकासरे (आरोपी क्रमांक 1 – जितेंद्र शिंदेचे वकील) : अॅड. बाळासाहेब खोपडे (आरोपी क्रमांक 2 – संतोष भवाळचे वकील) : अॅड. प्रकाश आहेर (आरोपी क्रमांक 3 – नितीन भैलुमेचे वकील) : अॅड. उज्ज्वल निकम यांचा युक्तीवाद :