वसई : वसई-विरार महानगरपालिकेच्या संजय हीनवार या अधिकाऱ्यांवर चार किलो सफरचंद चोरीचा आरोप करण्यात आला आहे. संजय हीनवार यांच्यावर फळ विक्रेत्यांनी 5 किलो सफरचंद चोरल्याचा आरोप करून, त्यांच्या विरुद्ध विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार नोंदवली आहे.
रामनवमीच्या दिवशी विरार पश्चिम सरस्वती बाग या परिसरात संजय हीनवार हे काही ठेकेदारांसह बिभीचंद रामनारायण गुप्ता या फळविक्रेत्याकडून स्वच्छता करच्या नावाने पावती फाडू लागले आणि त्याने पावती नंतर फाडतो असे सांगितल्यास रागाने त्याचा हातगाडी वरून जवळ 5 किलो सफरचंद उचलून घेऊन गेले.
हा सर्व प्रकारात संजय यांच्यासोबत चंदू व पप्पू हे देखिल होते असे फळ विक्रेत्याने सांगितले आहे. या झाल्या प्रकारची तक्रार फळ विक्रेता गुप्ता यांनी विरार पोलिसांना दिली आहे.
या सर्व प्रकरणाबाबत संजय हिनवार यांचे असे म्हणणे आहे की, फळवाल्याने लावलेले आरोप हे खोटे असून माझ्या कडून असा कोणताही प्रकार घडला नाही आहे असे त्यांनी सांगिलते आहे. कारवाई करतो म्हणून मानसिक खच्चीकरण करण्यासाठी हा खोटा आरोप लावला गेला आहे असे हिनवार यांनी सांगितले.