Apple CEO Tim Cook: अँपलचे सीईओ टीम कुक (Tim cook) यांनी पिंपरी चिंचवडमधील आयटी अभियंता संदीप रानडेची भेट घेतली. संदीप रानडेंनी 'नादसाधना' हे अँप विकसित केलं आहे. दोन वर्षांपूर्वी या अँपल कंपनीच्या 'इनोव्हेशन कॅटेगिरी'चे जागतिक विजेतेपद मिळाले होते. आणि आता तर टीम कुक यांनी थेट संदीपशी पंधरा मिनिटं चर्चा केली. त्याच अँपचा वापर करत संदीपने एक गाणंही गाऊन दाखवलं. सध्या संदीप यांची जोरदार चर्चा सुरु आहे. टीम कूक दोघांचा फोटोदेखील ट्विटरवर शेअर केला आहे.
भारतातील पहिलं अॅपल स्टोअर मुंबईत सुरु झालं. याच अॅपल स्टोअरच्या उद्घाटनासाठी भारतात आले होते. त्यावेळी त्यांनी भारतातील नामवंत डेव्हलपर्सला बोलवलं होतं. त्यातच संदीप रानडे यांना बोलवलं होतं. ते पुण्यात आयटी कंपनीत काम करतात. टीम कूक यांच्या भेटीदरम्यान त्यांनी बऱ्याच गप्पा केल्या. माझ्या अॅपची माहिती मी त्यांना दिली. माझं हे अॅप फक्त अॅपलच्या सिस्टिमवर काम करतं. त्यामुळे मी त्यांना यासंदर्भात सगळी महिती दिली, असं संदीप सांगतात.
मिले सूर मेरा तुम्हारा...
'टीम कूक हे अमेरिकेतून भारतात आले होते. त्यामुळे त्यांच्या स्वागतासाठी मी माझं अॅप वापरुन त्यांना गाणं गाऊन दाखवलं. 'मिले सूर मेरा तुम्हारा' हे आपल्या सर्वांचं आवडीचं गाणं त्यांच्यासमोर मी सादर केलं', असं संदीप सांगतात.
टीम कूक यांनी ट्वीटमध्ये काय लिहिलंय?
'Kiddopia च्या माध्यामातून प्री-स्कूलचे मुलं ज्यापद्धतीने शिकत आहेत. ते पाहून मला आनंद झाला आहे. नादसाधनाचे संदीप रानडे यांनी मिले सुर मेरा तुम्हाला या गाण्याचं उत्तम सादरीकरण केलं. भारतातील डेव्हलपर्सची कम्युनिटी उत्साही आहे आणि ते जगात मोठा प्रभाव पाडत आहेत', असं त्यांनी ट्वीटमध्ये लिहिलं आहे.
नादसाधना अॅप कसं आहे?
नादसाधना हे अँप एकट्याने रियाज करणाऱ्यांसाठी गाईडची भूमिका बजावतं. ताल वाद्य ते पियानोपर्यंतची वेगवेगळी बारा वाद्य गायकाच्या साथीला धावून येतात. गायकाच्या लय, ताल आणि पट्टीनुसार हे अँप व्हेरिएशन देतं. हे अँप केवळ अँपलच्या मोबाईलमध्येच डाउनलोड करता येऊ शकतं. अँड्रॉइड मोबाईलसाठी अद्याप तरी हे अॅप सुटेबल होणार नाही. पंडित जसराजजी यांचे शिष्य असणारे संदीप पेशाने सॉफ्टवेअर इंजिनियर आहेत. गुगल कंपनीत काही वर्षे नोकरी केल्यानंतर ते आठ वर्षांपूर्वी भारतात परतले. गायनाची असलेली आवड आणि सॉफ्टवेअर इंजिनीयरिंगचं असलेलं ज्ञान, यातून काहीतरी वेगळं करायचं हे भारतात येताना त्यांनी ठरवलं होतं. अशात साडे पाच वर्षांपूर्वी एक शिकाऊ गायिका त्यांच्याकडे आली. तिचे सूर जुळविण्याचा विडा त्यांनी हाती घेतला आणि यातून 'नादसाधना' अँपचा उगम झाला. संदीपने एकट्यानेच हे भारतीय बनावटीचे अॅप विकसित केल्याचा आणि अँपलकडून भारतासाठी संगीतक्षेत्रात मिळालेला हा पहिलाच पुरस्कार असल्याचा दावा तेव्हा केला होता. आता या अँपमध्ये आणखी वाद्य अॅड केली जाणार आहेत, असं ते सांगतात.