Appasaheb Nalvade Gadhinglaj Sugar Factory : आमदार हसन मुश्रीफ आणि राजेश पाटील यांची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या  आप्पासाहेब नलवडे गडहिंग्लज साखर कारखान्यासाठी (गोडसाखर) उद्या मतदान होत आहे. उद्या रविवारी 6 सकाळी सायंकाळी 5 पर्यंत मतदान होईल. गडहिंग्लज शहरासह तालुक्यातील 74 केंद्रांवर मतदान होणार आहे. निवडणुकीतील चुरस पाहता 700 पोलीस कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निवडणुकीचा जाहीर प्रचार शुक्रवारी रात्री थांबला. या निवडणुकीत शाहू सभेचा शेतकरी आघाडी व काळभैरव शेतकरी कामगार विकास आघाडी थेट लढत होत आहे, तर पाच अपक्ष रिंगणात आहेत. 


असलेले मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत 


या निवडणुकीमध्ये हसन मुश्रीफ (Hasan Mushrif) यांनी गडहिंग्लजमधील कुपेकर गटासह भाजप, शिवसेना, स्वाभिमानी, काँग्रेस, अप्पी पाटील यांना सोबत घेऊन आघाडी केली आहे. आमदार राजेश पाटील यांनी जनता दल, निवृत्त कामगार संघटना, काँग्रेस युतीची आघाडी रिंगणात उतरविली आहे. त्यामुळे एकाच पक्षाचे आमदार असलेले मुश्रीफ व पाटील यांच्यात ही प्रतिष्ठेची लढत आहे. राष्ट्रवादीचे जिल्ह्यात दोनच आमदार आहेत. मात्र, त्यांच्यातही गटबाजीचे ग्रहण आहे. त्यामुळे गोडसाखर निवडणुकीमध्ये ‘राष्ट्रवादी’मधील या दोन्ही आमदारांचीच प्रतिष्ठा पणाला लागली आहे. हसन मुश्रीफ बाजी मारणार की गोकुळमधील जिव्हारी लागलेल्या पराभवाचे राजेश पाटील परतफेड करणार याकडे कोल्हापूर जिल्ह्यातील राजकीय वर्तुळाचे लक्ष आहे. 


दुसरीकडे गेले आठ दिवस शहरासह ग्रामीण भाग उमेदवारांनी पिंजून काढला आहे. 24851 उत्पादक तर 240 संस्था गटातील सभासद मतदानाचा हक्क बजावतील. शहरासह तालुक्यातील 74 केंद्रांवर हे मतदान होणार आहे. मतदारांपर्यंत जाऊन भूमिका मांडण्याचा प्रयत्न केला गेला आहे. अधिक मतदार संख्येसाठी एकाच गावात तर कमी लोकसंख्या असलेल्या जवळच्या एकाच गावातील मतदान केंद्रांना जोडले आहेत. उत्पादक गटासाठी पाच,  राखीव गटाचे चार, संस्था गटासाठी एक दहा मतपत्रिका असतील.


दरम्यान, मंगळवारी मतमोजणी पालिकेच्या गांधीनगर पॅव्हेलियन हॉलमध्ये मंगळवारी सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू होणार आहे. एका टेबलवर दोन केंद्रांची मतमोजणी होईल. प्रत्येक 50 मतपत्रिकांचे गट्टे तयार करून मतांची मोजणी होणार आहे. प्रत्येक केंद्रातील मतदारसंख्येवर आधारित फेऱ्या निश्चित होतील. 


इतर महत्वाच्या बातम्या