मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग (Paramveer Singh) यांच्यावर गंभीर आरोप केले आहे. त्यामुळे परमवीर सिंग यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अकोल्याच्या पोलीस निरीक्षक पदावरील एका अधिकाऱ्याने सिंग यांच्यावर केले गंभीर आरोप केले आहे.
हजारो कोटी रुपयांच्या भ्रष्टाचाराचा आरोप परमवीर सिंग यांच्यावर करण्यात आला आहे. या पोलीस अधिकाऱ्याने याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि राज्याचे पोलीस महासंचालक संजय पांडे यांनाही पत्र पाठवले आहे. परमवीर सिंग ठाण्याचे पोलीस आयुक्त असताना भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. हजारो कोटी रुपयांचा भ्रष्टाचार करून विविध गोष्टीत गुंतवणूक केल्याचा आरोप आहे. पत्रात फक्त परमवीर सिंग यांच्यावर नाही तर त्यांच्या कुटुंबियांवर देखील आरोप केला आहे.
परमबीर सिंग यांच्या पत्नीचं इंडिया बुल्समध्ये कार्यालय आहे. तिथे हजारो कोटी गुंतवल्याचा आरोप केला आहे. तसेच त्यांचा मुलगा रोहन हा सिंगापूरमध्ये एक मोठा व्यवसाय करतो. तिथे देखील भ्रष्टाचाराचे पैसे गुंतवण्यात आल्याचा आरोप आहे.
परमबीर सिंग यांच्यावरील आरोपांचं हे दुसरं पत्र आहे. हे पत्र राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागालादेखील पाठवण्यात आलं आहे. या अगोदर गावदेवी पोलीस स्टेशनमधील पोलीस निरीक्षक अनुप डांगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरोधात तक्रार केल्याचं पत्र व्हायरल झाले होते या पत्रात अनुप डांगे यांनी माजी पोलीस आयुक्त यांच्यावर गंभीर आरोप केले होते. एका पबवर कारवाई केली म्हणून आयुक्तांनी आपल्या विरोधात कारवाई केल्याचा आरोप अनुप डांगे यांनी केला होता. अनुप डांगे यांनी 2 फेब्रुवारी रोजी याबाबतची लेखी तक्रार अपर मुख्य गृहसचिवांकडे केली आहे. या दरम्यान परमबीर यांचे चुलत भाऊ असल्याचे सांगून शार्दुल बायास यांनी बदली थांबवण्यासाठी 50 लाखांची मागणी केली होती. पुढे निलंबन रद्द करून पुन्हा कामावर परत घेण्यासाठी परमबीर यांच्या नावे 2 कोटींची मागणी केल्याचा गंभीर आरोप ही अनुप डांगे यांनी केला आहे. तसेच परमबीर सिंह यांचे थेट अंडरवर्ल्डशी संबंध असल्याचंही पत्रात नमूद केले होते.