“लाख टन तुरीच्या खरेदीला मान्यता दिली म्हणून,
आम्हाला साला म्हणायला यांची जीभ रेटतेच कशी,
मला तुम्हाला विचारायचंय,
अशा ‘दानवां’ना माणसात राहण्याची संधी भेटतेच कशी”
अशी कवितेची सुरुवात करुन, अंकुशने सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. तर -"काळ्या ढेकळाच रान, काळ्या डांबरानं माखलं,
आम्ही आडोसा मागितला, यांनी लवासाचं स्वप्न दाखवलं",
या अंकुशच्या ओळी राजकारण्यांना चपराक लगावतात.“अहो 56 इंच काय, माझा बाप 112 इंच छाती फुगवतो,
करतो काय तर इमानदारीने जगतो आणि इमानदारी शिकवतो”
या ओळींनी सभागृह टाळ्यांनी कडाडलं. पुढे “चहावाला सांगून लाखोंचा कोट घालतात मोदी..., अहो विकला असेल चहा, म्हणून देश विकायचा असतो का”, या त्याच्या सवालाने उपस्थितांनी अंकुशला अक्षरश: डोक्यावर घेतलं. कोण आहे अंकुश आरेकर? अंकुश आरेकर हा पुण्यातील सावित्रीबाई फुले विद्यापीठात राज्यशास्त्र विभागात शिकतो. तो मूळचा सोलापूर जिल्ह्यातील मोहोळ तालुक्यातील भांबेवाडी गावचा आहे. लहानपणापासूनच कवितेची आवड असलेल्या अंकुशने अनेक कविता लिहिल्या आहेत, मात्र ‘बोचलं म्हणून’ या कवितेने तो प्रकाशझोतात आला आहे. अंकुशने ही कविता दहा दिवसांपूर्वी 12 सप्टेंबरला पिंपरी-चिंचवडमधील अंकुशराव लांडगे सभागृहात सादर केली. गदिमांचे वारसदार म्हणून राज्यभरातील सात कवींच्या काव्य वाचनाचा कार्यक्रम होता, त्यामध्ये अंकुशने ही कविता सादर केली. त्या कार्यक्रमाचा व्हिडीओ सोशल मीडियावर अपलोड झाल्यानंतर अंकुशची कविता सर्वांसमोर आली. VIDEO: