Nagpur News नागपूर : मराठा आरक्षणाच्या (Maratha Reservation)अधिसूचनेविरोधात मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) अद्याप आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. त्यामुळे मंत्री छगन भुजबळांना टीकेची झोड देखील सहन करावी लागत आहे. 35 वर्षापासून मी ओबीसीसाठी काम करतोय, त्यामुळे मंत्रीपदाच सोडा आमदारकीचं पण सोयर सुतक मला नाही, अशी प्रतिक्रिया मंत्री छगन भुजबळ (Chhagan Bhujbal) यांनी दिली आहे. ओबीसी आरक्षणासाठी (OBC Reservation) राजीनामा देखील देण्यास तयार असल्याची भूमिका वारंवार छगन भुजबळ यांनी त्यांच्या भाषणातून बोलून दाखवलीये. परिणामी ते आपल्या पक्षात एकाकी पडल्याची देखील चर्चा सुरु आहे. त्यामुळे भुजबळ हे आरक्षणाच्या मुद्द्यावरुन राजीनामा देखील देऊ शकतात अशा जोरदार चर्चा रंगताय. अशातच आता नाराज असलेले भुजबळ भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांच्या एका पोस्टमुळे सुरू झाली आहे.


काय आहे अंजली दमानियांची पोस्ट?


सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी एक्सवर एक पोस्ट लिहिली आहे. या पोस्टमध्ये अंजली दमानिया म्हणतात, "भुजबळ भाजपाच्या वाटेवर?, एकेकाळी भुजबळांच्या भ्रष्टाचाराविरुद्ध जनहित याचिका करणारा भाजपा त्यांना मोठा ओबीसी नेता बनवणार? अशा भ्रष्ट माणसांना मोठे करणार, राजकारणासाठी? कुठे फेडाल हे पाप” अशी पोस्ट त्यांनी लिहिली आहे. त्यामुळे छगन भुजबळ हे भाजपाच्या वाटेवर आहेत का, अशी जोरदार चर्चा सोशल मीडियावर सुरु झाली आहे.


मला कुठल्या पदाची हौस नाही


अंजली दमानिया यांनी छगन भुजबळ भाजपच्या वाटेवर असे ट्विट केले. याबाबत छगन भुजबळ म्हणाले की, मला अजुन काही माहिती नाही. त्यांना कसे काय माहिती मिळाली. हे मला माहीत नाही. मला कुठल्या पदाची हौस नाही. गेल्या अनेक वर्षांपासून मी ओबीसींसाठी काम करत आहे. नवीन काही आता मला पाहिजे असे काही नाही, असे काही प्रपोजल मला आले नाही, असे ते म्हणाले. 


पक्षात सध्या तुमची घुसमट सुरु असल्याचा प्रचार सुरु आहे. यावर छगन भुजबळ यांना विचारणा केली असता ते म्हणाले की, पक्षात काय घुसमट आहे? मी मंत्री आहे, माझ्या विरुद्ध अजून तरी कोणी काही बोललेले नाही. मी जे काही करतोय त्याबाबत अजित दादाही म्हणालेत की ते ओबीसींचे काम करत आहेत. त्यांना तो हक्क आहे. तुम्ही तुमच्या समाजाबद्दल बोलतात तसे ते देखील त्यांच्या समाजाबाबत बोलत आहेत. 


इतर महत्वाच्या बातम्या