Anjali Damania News: गेल्या काही दिवसांपासून राज्यभरात गाजत असलेल्या बीडमधील महादेव मुंडे प्रकरणाबाबत सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया (Anjali Damania) यांनी भाष्य केले आहे. महादेव मुंडे यांचा शवविच्छेदन अहवाल अतिश्य भयानक आहे. धारदार शस्त्राने मानेवर खोलवर वार केल्यामुळे महादेव मुंडे (Mahadev Munde) यांची श्वसननलिका कापली गेली. हे वाचून माझ्या अंगावर काटा आला. मी ज्ञानेश्वरी मुंडे यांच्यासोबत बोलणार आहे आणि जी लागेल ती मदत करणार आणि न्याय मिळवून देणार, असे आश्वासन अंजली दमानिया यांनी दिले. त्या बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होत्या.
अंजली दमानिया यांनी बुधवारी योगेश कदम यांच्या आईच्या नावे असलेल्या मुंबईतील 'सावली' बारला भेट दिली. समतानगर पोलिस स्टेशनमध्ये मला याप्रकरणातील एफआयआरची कॉपी देण्यात आली आहे. इथल्या सिनिअर पीआयला काहीही माहिती नव्हती. त्यांच्याकडे माझ्या प्रश्नांची उत्तरं नव्हती. यासंदर्भात कुठलीही चौकशी झालेली नाही. बारचे मालक बोलत होते, बार दुसरा व्यक्ती चालवत होता. योगेश कदम यांचा हा दावा मला मान्य नाही. मी त्यांच्याविरोधात लढा देणार आहे. योगेश कदम यांचा मुख्यमंत्र्यांनी राजीनामा मागितला पाहिजे, अशी मागणी अंजली दमानिया यांनी केली.
Mahadev Munde: महादेव मुंडेंच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये नेमकं काय?
बीडमधील महादेव मुंडे खून प्रकरणात धक्कादायक खुलासे करणारे विजयसिंह बाळ बांगर यांनी आता या प्रकरणातील शवविच्छेदन अहवाल देखील समोर आणला आहे. बांगर यांनी मुंडे कुटुंबीयांना भेट देत मी तुमच्या न्यायाच्या लढ्यात सोबत असल्याचे सांगितले होते. आता या शवविच्छेदन अहवालातून अनेक धक्कादायक बाबी समोर आल्या आहेत. 21ऑक्टोबर 2023 रोजी महादेव मुंडे यांचा खून झाला आणि 22 ऑक्टोबर रोजी रात्री 12.15 ते 1.30 असे सव्वा तास उपजिल्हा रुग्णालयात शवविच्छेदन करण्यात आले होते.
आधी महादेव मुंडे यांचा गळा कापण्यात आला. त्यांच्या शरीरावर तब्बल 20 से.मी. लांब, 8 से.मी. आणि 3 से.मी. रुंद असा हा वार होता. तर त्याच्या मानेवर उजव्या बाजूने चार वार करण्यात आले होते. मानेवरचा वार चुकविल्याने तोंडावर वार झाला होता. तोंडापासून कानापर्यंत एक वार झाला त्याची लांबी 13 से.मी. इतकी होती तर रुंदी व खोली दीड सेंटीमीटर होती. महादेव मुंडे यांच्या अंगावर 16 वार असल्याचे या शवविच्छेदन अहवालात म्हटले आहे.
महादेव मुंडे यांच्या गळ्यावर समोरून वार केल्याने त्यांची श्वसननलिका कापली गेली होती. तसेच काही रक्तवाहिनाही तुटल्या होत्या. दरम्यान महादेव मुंडे यांनी दोन्ही हाताने प्रतिकार करण्याचा प्रयत्न केल्याची शक्यता आहे. त्यामुळे त्यांच्या डाव्या आणि उजव्या हातावर अंगठ्याजवळ ,तळहातावर आणि मधल्या बोटावर जखमा झाल्या होत्या. खाली पडल्यानंतर डाव्या गुडघ्यालाही खरचटल्याची नोंद आहे. त्यांचा चेहरा छाती आणि हात रक्ताने माखलेले होते. त्यांच्या अंगावर रक्ताने माखलेली पांढरी बनियन आणि ब्राऊन कलरचा शर्ट होता. डॉक्टरांनी शवविच्छेदन अहवाल परळी शहर पोलिसांना दिला होता. त्यात अतिरक्तस्राव झाल्याने शॉकमध्ये जाऊन महादेव मुंडे यांचा मृत्यू झाल्याचे नमूद केले आहे.
Beed Crime: महादेव मुंडेंच्या अंगावर कुठे किती वार?
*मानेवर उजव्या बाजूला - 4
*तोंडापासून गालापर्यंत - 1
*उजव्या हातावर - 3
*डाव्या हातावर - 3
*तोंडावर - 1
*नाकावर - 1
*गळ्यावर - 3
आणखी वाचा