Mahadev Munde Case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणानंतर परळी शहरात पंधरा महिन्यापूर्वी झालेला एक हत्या प्रकरण चर्चेत आला आहे. व्यावसायिक महादेव मुंडे यांचा निर्घृणपणे खून परळी शहरातील तहसील कार्यालयासमोरील मैदानावर करण्यात आला होता. मात्र, हा खून कोणी केला आणि कशासाठी केला त्याचा तपास पोलिसांकडून होऊ शकला नव्हता. मात्र, सुरेश धस यांनी या प्रकरणाचे तपासाची मागणी केल्यानंतर आता या तपासणीच्या कामाला वेग आला आहे.

Continues below advertisement

हत्या ते होण्यापूर्वी कोणा कोणाला भेटले?

- 20 ऑक्टोबर 2023 ला रात्री महादेव मुंडे यांनी 6 वा.ट्युशन होऊन मुलांना घरी सोडले.- त्यानंतर पिग्मीचे कलेक्शन केले गणेश पार हनुमान नगर मोंढा मार्केट शेवटला शिवाजी चौकात 7.10 मिनिटाला सीसीटीव्ही मध्ये दिसले.- आझाद चौकात मित्राला भेटले. - आझाद चौक पासून 300 मीटर अंतरावर असलेल्या वनविभागाच्या कार्यालयासमोर त्यांची मोटरसायकल रात्री 9 वा आढळले.- ती गाडी पोलिसांनी पोलीस स्टेशनला आणून लावली आणि याच गाडीवर रक्त देखील सांडलेले होते, अशी कुटुंबीयांनी माहिती दिली. - याच गाडीमध्ये आधार कार्ड पॅन कार्ड बँकेचे पासबुक या सह इतर कागदपत्र होते.- ही मोटरसायकल सापडली मात्र महादेव मुंडे कुठे होते, हे माहित नाही या मोटरसायकल जवळ दोन चपला सापडल्या यामध्ये एक चप्पल महादेव मुंडे यांची होती तर दुसरी कोणाची होती याबाबत माहिती भेटली नाही.- दुसऱ्या दिवशी सकाळी जिथे मोटरसायकल सापडली, त्यापासून 50 मीटर अंतरावरच महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडला. मात्र, हा मृतदेह रात्री पोलिसांना का दिसला नाही असा प्रश्न उपस्थित होतोय.- 21 ऑक्टोबर 2023- सकाळी सात वाजून दहा मिनिटाला पोलीस कॉन्स्टेबल भास्कर केंद्रे यांचा महादेव मुंडे यांची मेहुणे सतीश फड यांना फोन आला. - हा फोन आल्यावर सतीश फड यांनी तात्काळ त्यांच्या दाजींना फोन केला मात्र तो फोन स्विच ऑफ आला. - त्यानंतर सतीश फड यांनी मुंडे यांच्या बँक कॉलनीतील घरी भेट दिली मुंडे हे तुळजापूरला गेले असल्याचे सांगितले. - महादेव मुंडे यांच्या मृतदेहावर मारल्याच्या जखमा होत्या आणि गळा कापलेला होता - त्याचबरोबर हातावर गालावर पाठीवर वार होते- महादेव मुंडे यांचा मृतदेह सापडल्यावर त्यांचा मोबाईल, अंगठी, लॉकेट त्याचबरोबर पिग्मीचे कलेक्शन साधारण किंमत एक ते दीड लाख रुपये हे गायब होते.- मृतदेहाचे संशोधन करून तो मृतदेह मुंडे कुटुंबीय पोलीस ठाण्यात ठेवणार होते. मात्र, पोलिसांनी आठ दिवसात आरोपी ताब्यात घेण्याचे आश्वासन दिल्यामुळे अंत्यविधी करण्यात आला. - अनेक चकरा मारूनही प्रकरणाचा तपास लागत नसल्याने मुंडे कुटुंबीयांनी सदरील प्रकरण एलसीबीला वर्ग करण्याची विनंती परळी पोलीस ठाण्याचे तत्कालीन पीआय सानप यांना केली.- 16 डिसेंबर 2023 ला मुंडे यांना न्याय मिळावा यासाठी परळी बंदचे आवाहन करण्यात आले होते.- हा गुन्हा एलसीबीला वर्ग करण्यासाठी तत्कालीन पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांची भेट घेतली.

Continues below advertisement