मुंबई : समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मुंबई ते नागपूर प्रवास 8-10 तासांपर्यंत कमी करणारे महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाचे (MSRDC) संचालक अनिलकुमार गायकवाड यांचा अमेरिकेत विशेष सन्मान करण्यात आला. त्यांना अमेरिकेच्या 60व्या राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथग्रहण समारंभासाठी खास निमंत्रण मिळाले होते. या ऐतिहासिक प्रसंगी, गायकवाड यांनी महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधांच्या प्रगतीबाबत चर्चा करत भविष्यातील योजनांचे प्रभावी सादरीकरण केले.


जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राची ओळख


अमेरिकेतील शपथग्रहण सोहळ्यादरम्यान, अनिलकुमार गायकवाड यांनी टेस्लाचे सीईओ एलोन मस्क, गूगलचे सीईओ सुंदर पिचाई आणि सॉफ्टबँकचे मसायोशी सोन यांच्यासह अनेक आंतरराष्ट्रीय व्यावसायिक नेत्यांशी संवाद साधला. यावेळी, त्यांनी महाराष्ट्रातील पायाभूत प्रकल्पांमध्ये गुंतवणुकीच्या संधी तसेच राज्याच्या प्रगतिशील धोरणांवर चर्चा केली.


स्मार्ट सिटी आणि आधुनिक वाहतूक प्रणालींवर विशेष भर


गायकवाड यांनी महाराष्ट्रातील स्मार्ट सिटी प्रकल्प, शाश्वत शहरी विकास आणि आधुनिक वाहतूक व्यवस्था यावर विशेष लक्ष केंद्रित केले. त्यांनी सांगितले, "जागतिक व्यासपीठावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणे ही माझ्यासाठी अभिमानाची बाब आहे. या चर्चेतून मिळालेल्या अनुभवांमुळे महाराष्ट्राच्या पायाभूत सुविधा प्रकल्पांना नव्या दिशेने पुढे नेण्यास मदत होईल. आमचे उद्दीष्ट राज्याला टिकाऊ आणि जागतिक स्तरावरील दर्जेदार पायाभूत सुविधा पुरवणारे आघाडीचे राज्य बनवणे आहे."


MSRDC च्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राचा पायाभूत विकास


अनिलकुमार गायकवाड यांच्या नेतृत्वाखाली MSRDC ने महाराष्ट्राच्या पायाभूत विकासात मोठी प्रगती साधली आहे. समृद्धी महामार्ग, बांद्रा-वर्ली सी लिंक, मंत्रालय पुनर्निर्माण, तसेच भारतातील सर्वात मोठी रस्ते बोगदा (टनेल) हे काही महत्त्वाची प्रकल्प त्यांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्यात आले. या प्रकल्पांमुळे महाराष्ट्राच्या वाहतूक व्यवस्थेत मोठी सुधारणा झाली असून, आर्थिक विकासालाही चालना मिळाली आहे.


ही बातमी वाचा: