Anil Parab On Ramdas Kadam: ज्या राज्याचा गृहराज्यमंत्री स्वतःच्या आईच्या नावाने डान्स बार चालवतो, त्याला नैतिक लाज असायला पाहिजे, नैतिक लाजेने त्यांनी कमीत कमी राजीनामा द्यायला पाहिजे होता. पोरींना नाचवून जो मंत्री पैसे खातोय त्याला नैतिक अधिकार आहे का मंत्रिपदावर राहण्याचा? अशी विचारणा शिवसेना ठाकरे गटाचे नेते अनिल परब (Anil Parab vs Ramdas Kadam controversy यांनी केली. परंतु अशा नीच माणसाला कोर्टात खेचून कोर्टासमोर उघड नागडं पाडण्याची जबाबदारी माझी आहे. हे खोटं सांगत आहेत म्हणून आम्ही अब्रू नुकसानीचा दावा आता दाखल करत आहोत, असे ते म्हणाले. परब म्हणाले की, यांना भाडगिरीचे पैसे खायची सवय लागली आहे. या अब्रू नुकसानीच्या दाव्यात कोण डॉक्टर आहेत हे डॉक्टर समोर आले पाहिजेत. मी त्यांना कायदेशीर कोर्टात खेचत आहे, कायदेशीर उत्तर त्यांच्याकडून मागवणार आहे. 100 टक्के त्यांना माफी मागावीच लागेल, असे अनिल परब म्हणाले. मुख्यमंत्र्यांनी तरी स्वतःची प्रतिमा स्वच्छ ठेवण्यासाठी अशा मंत्र्यांना हाकलून दिलं पाहिजे आणि हे जे असे नासके आंबे आहेत ते मंत्रिमंडळातून काढून टाकले पाहिजेत, अशी मागणी केली.
तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला? ( Ramdas Kadam Wife suicide attempt 1993)
रामदास कदम यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या मृत्युपत्रावर शंका उपस्थित केल्याबद्दल अनिल परब यांनी त्यांना कोर्टात जाण्याचे आव्हान दिले. ते म्हणाले की, त्यांनी कोर्टात जावं माझं त्यांना आव्हान आहे. मृत्युपत्राबद्दल कोणाला शंका असेल तर त्याला कोर्ट आहे, कोर्टात न्याय मिळू शकतो. त्यांनी सांगितले की, आज गृहराज्यमंत्र्याची ताकद तुम्ही दाखवता, डान्सबारवर जाऊन रेड करताना स्वतःच्या घरात काय चाललं त्याची चौकशी करा, 1993 साली तुझ्या आईने का आत्महत्या करायचा प्रयत्न केला? स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला याची चौकशी कर, असे जाहीर आव्हान शिवसेना ठाकरे गटाचे नेते आमदार अनिल परब गृहराज्यमंत्री योगेश कदम यांना दिले. 1993 साली ज्योती रामदास कदम यांनी आत्महत्या का करायचा प्रयत्न केला? स्वतःला का जाळून घ्यायचा प्रयत्न केला? जळाली की जाळलं? आजही तिकडे खेडमध्ये साक्षीदार आहेत. वेळ पडली तर त्यांना देखील मी समोर आणू शकतो, खूप साक्षीदार आहेत. आजही जे समोरून सांगतात की त्या घटनेचे आम्ही साक्षीदार आहोत, असा इशारा अनिल परब यांनी दिला.
या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी प्रकरणे देणार
अनिल परब म्हणाले की, आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच्या घरात बघायचं वाकून ही प्रवृत्ती बंद करा. कोणाच्या घरात जाणं हे आमच्या संस्कृतीला पटत नाही. ते पुढे म्हणाले की, माझी आज मुख्यमंत्र्यांकडे मागणी आहे किंवा त्यांचा मुलगा जो गृहराज्यमंत्री आहे त्यांच्याकडे मागणी आहे की ही नार्को टेस्ट कराच पण यामध्ये माझ्या स्वतःच्या आईला का जाळलं किंवा तिने स्वतःला जाळून घेतलं, याचीही चौकशी कर, असे आव्हान दिले. ते म्हणाले की, ही आत्महत्या का केली आहे याचा देखील शोध गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी घेतला पाहिजे. घरातील लोक आत्महत्या कशासाठी करत आहेत, मुळाशी जाऊन चौकशी करा, असे ते म्हणाले. मागील अधिवेशनात तर फक्त दोनच प्रकरण आली बाहेर, या अधिवेशनात पुराव्या सकट पुन्हा सगळी प्रकरणे देणार असल्याचा इशारा त्यांनी दिला.
इतर महत्वाच्या बातम्या