मुंबई : राज्याचे परिवहन मंत्री अनिल परब  यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. अनिल परब यांचे निकटवर्तीय मानले जाणारे बजरंग खरमाटे यांना ईडीनं नोटीस बजावली आहे. अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी)  उप प्रादेशिक परिवहन अधिकारी  बजरंग खरमाटे हे  सोमवारी सकाळी 12 वाजता ईडीच्या चौकशीला हजर राहिले. मनी लाँड्रिंग प्रकरणी खरमाटे हे चौकशीला आले आहेत


 राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरती असलेल्या बदली गैर व्यवहार प्रकरणात खरमाटे याचं नाव समोर आल्यानंतर ईडीचा ससेमिरा त्यांच्या मागे लागला. काही दिवसांपूर्वी खरमाटेच्या घरावर ईडीने कारवाई केली होती.  4.30 तास झाले खरमाटे यांची चौकशी सुरू आहे.  या कारवाई दरम्यान काही महत्वाचे पुरावे हाती लागले असल्यानेच ईडीने खरमाटे यांना चौकशसाठी आज बोलावले आहे.


केंद्रीय यंत्रणा ईडी च्या माध्यमातून परिवहन मंत्री अनिल परब यांना हजर राहण्याची नोटीस देण्यात आली तर
आरटीओ अधिकारी बजरंग खरमाटे यांच्या निवासस्थानी कार्यालयावर छापे मारण्यात आले. या प्रकरणी ईडीने  जबाब देण्यासाठी बोलवावे, डिजिटलसह सर्व पुरावे सादर करेल असा इशारा गजेंद्र पाटील यांनी दिल्यानं परिवहन खात्यात खळबळ उडाली असून ईडीच्या भूमिकेकडे लक्ष लागलाय.