Shambhuraj Desai Vs Anil Parab: शिवसेना शिंदे गटाचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासामध्ये मिळणाऱ्या जेवणाच्या दर्जावरून थेट कर्मचाऱ्यांना बॉक्सिंग टाईप हाणामारी केल्यानंतर आज (10 जुलै) विधान परिषदेमध्ये शिंदे गटाचे मंत्री शंभूराज देसाई आणि शिवसेना ठाकरे गटाचे आमदार अनिल परब यांच्या जोरदार खडाजंगी झाली. त्यामुळे एकमेकांना धमकी देण्यापर्यंत पोहोचल्याचे अवघ्या महाराष्ट्राने पाहिलं. त्यामुळे सलग दुसऱ्या दिवशी लोकप्रतिनिधींच्या वर्तनावरून मान खाली गेली आहे. 

बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास

अनिल परब यांनी मराठी माणसांच्या मुद्यावरून बोलताना शंभूरा देसाई यांनी गद्दारी केली असा उल्लेख करताच शंभूराजे यांचा पारा चांगला चढल्याचे दिसून आलं. त्यानंतर त्यांनी तू गद्दार कोणाला बोलतो? बाहेर ये तुला दाखवतो, तू बूट चाटत होतास असा एकेरी उल्लेख करत अनिल परब यांच्यावर हल्लाबोल केला. त्यामुळे या दोघांच्या वादामध्ये विधान परिषदेचे काम दहा मिनिटांसाठी तहकूब करण्यात आले. गेल्या काही दिवसांपासून शिवसेना शिंदे गटातील ठाकरे गटातील वाद चांगलाच रंगला आहे.  विधान परिषदेमध्ये मराठी माणसांच्या घरांवरून ही चर्चा सुरू होती आणि या चर्चेमध्ये अनिल परब, अंबादास दानवे, प्रसाद लाड, अनिल परब, राजेश राठोड, हेमंत पाटील आणि शंभूराज देसाई यांनी यांनी सहभाग घेतला होता. मराठी माणसांच्या मुद्द्यावरूनच चर्चा सुरू असतानाच दोघांमध्ये वादाची ठिणगी पडली आणि एकमेकाला आव्हान देण्याची भाषा सुद्धा झाली.

इतर महत्वाच्या बातम्या