Anil Deshmukh Arrested : राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख (ANIL DESHMUKH) यांना ईडीनं अटक केली आहे. कथित 100 कोटींच्या वसुली प्रकरणात तब्बल 13 तास चौकशी केल्यानंतर ईडीनं अनिल देशमुख यांना अटक केली. आज सकाळी त्यांना न्यायालयात हजर करण्यात येणार आहे. जवळपास दोन महिने नॉट रिचेबल असलेले अनिल देशमुख काल स्वतःहून ईडी कार्यालयात दाखल झाले. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी अनिल देशमुखांवर 100 कोटी वसुलीचे आरोप लावले होते. त्या प्रकरणी ईडीच्या अधिकाऱ्यांनी देशमुखांची तेरा तास चौकशी केली. त्यानंतर रात्री दीड वाजता त्यांना अटक करण्यात आली. महाविकास आघाडीसाठी हा मोठा झटका मानला जातोय. अशातच आता अनिल देशमुखांनंतर अनिल परब यांचा नंबर, असा दावा भाजप नेते किरीट सोमय्यांनी केल्यामुळं महाविकास आघाडीच्या अडचणींमध्ये आणखी वाढ होण्याची शक्यता आहे.
Anil Deshmukh Arrested : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ईडीकडून अटक
अनिल देशमुख यांच्यावर आरोप झाल्यापासून अटक होईपर्यंत काय घडलं?
- मार्च 2021 : देशमुख यांच्याविरोधात परमबीर सिंह यांचं मुख्यमंत्र्यांना पत्र
- 5 एप्रिल : अनिल देशमुख यांचा मंत्रिपदाचा राजीनामा
- 10 मे : मनी लॉन्ड्रिंगच्या आरोपावरून ईडीकडून देशमुख यांच्याविरोधात गुन्हा
- 26 जून : ईडीकडून अनिल देशमुख यांना समन्स
- 29 जून : अनिल देशमुख यांना ईडीचं दुसरं समन्स
- 5 जुलै : ईडीकडून अनिल देशमुख यांना तिसरं समन्स
- 16 जुलै : अनिल देशमुख यांना ईडीचं चौथं समन्स
- 17 ऑगस्ट : देशमुख यांना ईडीचं पाचवं समन्स
- 2 सप्टेंबर : ईडीचं समन्स रद्द करण्यासाठी देशमुख यांची न्यायालयात याचिका
- 29 ऑक्टोबर : अनिल देशमुख यांची याचिका हायकोर्टानं फेटाळली
पाहा व्हिडीओ : महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना ED कडून अटक
वारंवार समन्स बजावल्यानंतरही अनिल देशमुख राहिले होते गैरहजर
अनिल देशमुख यांना पाचवेळा तर त्यांचे चिरंजीव ऋषिकेश देशमुख यांना ईडीकडून वारंवार समन्स बजावण्यात आलं होतं. मात्र सुरुवातीला अनिल देशमुख यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे त्यांचा जबाब नोंदवला जाण्याची मागणी ईडीकडे केली आणि त्यानंतर प्रकरण न्यायप्रविष्ट असल्याचं कारण देत पाचही वेळा ते ईडीसमोर आले नाहीत.
पाचही वेळा अनिल देशमुख यांनी आपल्या वकिलांमार्फत ईडीला पत्र पाठवून हजर होण्यासाठी मुदत मागितली होती. मात्र अनिल देशमुख कधीच ईडीपुढे चौकशीला हजर झाले नाही. त्यातच ईडीनं त्यांच्यावरील कारवाईचा धडाका सुरुच ठेवला आहे. अनिल देशमुख आणि त्यांच्या निकटवर्तीयांच्या ठिकाणांवर छापे टाकले, तर अनिल देशमुख यांची साडेचार कोटींची संपत्ती जप्त केली. अनिल देशमुख असं म्हणाले होते की, कोर्टाचा निकाल आल्यानंतर ते ईडीसमोर हजर होतील. मात्र कोर्टानं त्यांची याचिका फेटाळून लावली, पण त्यांनतरही ते ईडीसमोर हजर झाले नाहीत..
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Kirit Somaiya on Anil Deshmukh Arrest : अनिल देशमुख यांच्यानंतर आता अनिल परब : किरीट सोमय्या