हिंगोली : पोलिस म्हटलं की मनात आपोआप एक प्रकारचा धाक निर्माण होता. सांगलीतल्या अनिकेत कोथळे प्रकरणात पोलिसांचं भयानक रुप समोर आल्यानंतर तर ही भीतीच आणखीच जास्त निर्माण झाली आहे. परंतु आता अनिकेत कोथळे प्रकरणातच पोलिसांचं भावनिक, सामाजिक रुप समोर आलं आहे.

अनिकेत कोथळेच्या मृत्यूनंतर त्याच्या कुटुंबावरचं छत्र हरवलं आहे. पत्नी आणि तीन वर्षाची प्रांजल आता आधारहीन झाल्या आहेत. या प्रकरणात एक सामाजिक बांधिलकी जोपासत, हिंगोलीत कार्यरत असलेल्या पोलिस उपअधीक्षक सुजाता पाटील यांनी प्रांजलचं पालकत्व स्वीकारलं आहे.

मम्मी यांनीच पप्पांना मारलं का, कोथळेच्या लेकीचा सवाल
प्रांजलच्या शिक्षणासह सर्व खर्चाची जबाबदारी घेण्याबाबतचं पत्र कोल्हापूर परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांना लिहिलं आहे.



सुजाता पाटील यांनी प्रांजलचं पालकत्व स्वीकारुन मलीन झालेल्या पोलिसांच्या प्रतिमेला सुधारण्याचा प्रयत्न केला आहे. अनिकेतच्या भावासोबत यासंदर्भात बोलणं झालं असून त्यांनी प्रांजलचं पालकत्व देण्याचं मान्य केल्याचं सुजाता पाटील यांनी सांगितलं.



पोलिस विभागात खऱ्या अर्थाने आज सुजाता पाटील यांच्यासारख्या अधिकाऱ्यांची गरज निर्माण झाली आहे. जेणकरुन सामान्य नागरिकामंधील पोलिसांबाबतची भीती दूर होऊन त्यांच्यातील दरी कमी  होईल.

संबंधित बातम्या

अनिकेत कोथळे हत्या प्रकरण, अॅड. उज्ज्वल निकमांची नियुक्ती


अनिकेतची हत्या पोलीस खात्याला कलंक, दोषींना फाशी द्या: आठवले


अनिकेत कोथळेच्या भावांचा आत्मदहनाचा प्रयत्न