Andheri Bypolls 2022 Live Updates : परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्वमधील पोटनिवडणुकीचं आज मतदान. ठाकरे गटाकडून ऋतुजा लटके मैदानात. पोटनिवडणुकीसाठी 7 उमेदवार रिंगणात, 6 नोव्हेंबरला निकाल

एबीपी माझा वेब टीम Last Updated: 03 Nov 2022 09:57 PM

पार्श्वभूमी

Andheri Bypolls 2022 Live Updates : अंधेरी पूर्व विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी आज मतदान होणार आहे. या पोटनिवडणुकीवरून अनेक नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. त्यातून अखेर आज मतदान होतंय आणि 6 नोव्हेंबरला...More

Maharashtra Education : परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्समध्ये महाराष्ट्र देशात अव्वल

परफॉर्मन्स ग्रेड इंडेक्स (कार्यमान प्रतवारी निर्देशांक) 2020-21 मध्ये शालेय शिक्षणात देशात महाराष्ट्र, केरळ आणि पंजाब संयुक्तरित्या प्रथम क्रमांकावर राहिले आहेत. शालेय शिक्षणात भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) तसेच प्रशासकीय प्रक्रियेमध्ये महाराष्ट्राची प्रगती यातून अधोरिखित झाली आहे. पीजीआय इंडेक्समध्ये महाराष्ट्राने 1000 पैकी 928 गुण मिळून महाराष्ट्र राज्य देशात पहिल्या क्रमांकावर आहे. 2019 च्या तुलनेत महाराष्ट्राची 59 गुणांनी वाढ झाली आहे. भौतिक संसाधने आणि सुविधा (इन्फ्रास्ट्रक्चर फॅसिलिटीज) व प्रशासकीय प्रक्रिया या गुणांमध्ये सर्वाधिक वाढ झाली आहे.