मुंबई : भाजप नेते आणि माजी केंद्रीय मंत्री अनंत कुमार हेगडे यांनी महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह विधान केलं आहे. महात्मा गांधी यांनी स्वातंत्र्यासाठी केलेला संघर्ष हे निव्वळ नाटक होतं, असं वादग्रस्त विधान हेगडे यांनी केलं आहे. काल एका रॅलीला संबोधित करताना अनंत कुमार हेगडे यांनी हे विधान केलं होतं. एवढंच नव्हे तर हेगडेंनी उपोषण आणि गांधींजींची स्वातंत्र्य चळवळ हे एक मोठं नाटकं होतं. त्यावेळच्या नेत्यांनी एकदाही पोलिसांकडून लाठीमार खाल्ला नव्हता. तरी, गांधींची स्वातंत्र्य चळवळ ही नाटकी होती. ब्रिटिशांची परवानगी घेऊनच उभारण्यात आली होती. ती कुठलीही खरीखुरी लढाई नव्हती, तर तो बनावट संघर्ष होता, असं वादग्रस्त विधानही हेगडेंनी केलं आहे.


बाळासाहेब थोरात यांनी यावर प्रतिक्रिया दिली आहे. बाळासाहेब थोरात म्हणाले, हेगडे यांच्या वक्तव्याची दखल घेऊ नये असं वाटत. एखाद्या व्यक्तीच्या अकलेचं दिवाळं निघाल्यानंतर जसा तो बोलतो तसं ते बोलले आहेत. भाजप, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्या विचारांची लोक स्वांतंत्र्यलढ्यात कुठे होती? असा प्रश्न विचारला तर ते इंग्रजांना साथ देत होते असं उत्तर मिळतं असा इतिहास असणाऱ्यांनी महात्मा गांधींच्या चळवळीला नाटक होतं असं म्हणणं हे कुणालाच पटणार नाही.

Anant Hegde | महात्मा गांधींनी स्वातंत्र्यसाठी केलेले संघर्ष निव्वळ नाटक : अनंतकुमार हेगडे | ABP Majha