Amruta Fadnavis: मुंबईत वाहतूक कोंडीमुळे घटस्फोट होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले आहे. अमृता फडणवीस यांच्या या वक्तव्यानंतर राजकारण तापण्याची शक्यता आहे. याबाबत मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनीही त्यांच्यावर टीका केली आहे. हा नवीन जावईशोध लावला असल्याचे महापौरांनी म्हटले आहे. दरम्यान, या प्रकरणावर एबीपी माझाने अमृता फडणवीस यांच्याशी संपर्क साधला. यावेळी त्यांनी मुंबई मेट्रो मेस या संकेतस्थळाने ट्रॅफिकबाबत सर्व्हे मंकी केला होता, याचाच दाखला मी दिला असल्याचे अमृता फडणवीस यांनी सांगितले आहे. मी जर तुम्हाला काही माहिती सांगते तर ती रिपोर्ट पाहूनच सांगत असल्याचे अमृता पडणवीस म्हणाल्या. आपल्याकडे यावर उपाय असतानाही काही केले नसल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या.  


सर्व्हे मंकीच्या माहितीनुसर 3 टक्के घटस्फोट हे कुटंबांना वेळ न दिल्यामुळे होतात. ट्रॅफिकमुळे आपण घरी पोहोचू शकत नाही, आपण अडकून जातो. जी वेळ कुटुंबला द्यायची इच्छा असते तो वेळ आपण देऊ शकत नाही. ती सगळी वेळ रस्त्यावर अडकून पडतो. त्यामुळे कुटुंबांमध्ये अडथळे येतात, असा सर्व्हे सांगत असल्याचे अमृता फडणवीस म्हणाल्या. जगात सगळ्यात जास्त ट्रॅफिक हे मुंबईत आहे. पण गेल्या 25 ते 30 वर्षात याबाबत काही झाले नाही. सर्व्हे मंकी हा सर्व्हे मुंबईपुरता झाला होता. तसेच नेदरलँडच्या एका संस्थेनेही सर्व्हे केला होता. यावर उपायही त्यांनी सुचवले होते, पण यावर काहीच करत नसल्याचा आरोप त्यांनी केला. मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी या मुद्यावरुन अमृता फडणवीस यांच्यावर टीका केली होती. याबाबत त्यांना प्रश्न विचारण्यात आला, मात्र, अमृता फडणवीस यांनी त्यावर बोलण्यास नकार दिला. 


मुंबईतील एका कार्यक्रमात अमृता फडणवीस यांनी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी त्यांनी मुंबईतील वाहतूक कोंडीवर भाष्य करताना घटस्फोटाशी संबंध जोडला. मुंबईतील वाहतूक कोंडीमुळे तीन टक्के जोडप्यांचे घटस्फोट होत असल्याचे अमृता फडणवीस यांनी म्हटले. मुंबईत वाहतूक कोंडी वाढली असून खड्ड्यांमुळे आणखीच कोंडी होत असल्याचे वक्तव्य अमृता फडणवीस यांनी केले. एक सामान्य नागरीक म्हणून आपल्याला वाहतूक कोंडीचा हा त्रास सहन करावा लागत असल्याचे त्यांनी म्हटले. 


महत्त्वाच्या बातम्या: