मुंबई: आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला पोलिसांनी पाणी दिलं नाही असा गंभीर आरोप खासदार नवनीत राणा यांनी केला आहे. या संबंधी नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्ष ओमप्रकाश बिर्ला यांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये हा आरोप केला आहे.
खासदार नवनीत राणा या सध्या न्यायालयीन कोठडीत असून त्यांच्या जामीनाच्या याचिकेवर सुनावणी सुरू आहे. दरम्यान, नवनीत राणा यांनी लोकसभा अध्यक्षांना एक पत्र लिहिलं असून त्यामध्ये म्हटलं आहे की, "आपण मागासवर्गीय असल्याने पोलिसांनी आपल्याला पाणी दिलं नाही. माझ्या जातीवरुन माझा पोलीस ठाण्यात छळ केला गेला. खालच्या जातीची असल्याने मला बाथरुम वापरु दिलं नाही."
दरम्यान, रविवारी नवनीत राणा यांनी शिवसेनेवर असाच एक आरोप केला होता. मागासवर्गीय महिला आहे म्हणून मला शिवसेनेकडून अपमानस्पद वागणूक दिली जात आहे आणि माझ्याबदल खालच्या दर्जात बोललं जात आहे असं नवनीत राणा यांनी म्हटलं आहे.
नवनीत राणा यांनाही तुरुंगात पाणी दिले जात नाही - फडणवीसांचा आरोपफडणवीस म्हणाले, नवनीत राणा यांनाही तुरुंगात पाणी दिले जात नाही. दलित असल्याने त्यांच्याशी अशी वागणूक दिली जात आहे. नवनीत राणा यांनी वकिलामार्फत लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांच्याकडे तक्रार केली आहे. महाराष्ट्रात भाजप-शिवसेनेतील संघर्ष सुरूच आहे. भाजप नेते किरीट सोमय्या त्यांना भेटण्यासाठी पोलीस ठाण्यात पोहोचले असता त्यांच्या गाडीला शिवसैनिकांनी घेराव घातला. यावेळी त्यांच्या गाडीवरही दगडफेक करण्यात आली. रविवारी नवनीत राणाला न्यायालयाने 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली. भाजप नेत्यावर झालेल्या हल्ल्यानंतर महाराष्ट्रातील राजकारण चांगलेच तापले.
महत्वाच्या बातम्या: