अकोला/अमरावती : देव तारी त्याला कोण मारी? या म्हणीचा प्रत्यय अमरावतीत आला. मुसळधार पावसानं अख्ख्या मुंदडा कुटुंबाचा घास घेतला असता, मात्र एका झाडानं देवदूताचा काम केलं.

 

पावसात वाहून गेलेली चारचाकी झाडात अडकून पडली आणि पाटील कुटुंब थोडक्यात बचावलं.

 

काय आहे प्रकरण?

राज्यभरात पावसाची संततधार सुरु आहे. अकोला, अमरावतीलाही पावसाने झोडपलं आहे. त्यामुळे परिसरात पूरस्थिती निर्माण झाली आहे. अकोल्यातील प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. सुरेश मुंदडा, त्यांची पत्नी पुष्पा आणि चालक संजय गुलहाने हे आयट्वेण्टी गाडीतून अमरावतीवरून दर्यापूरच्या दिशेने जात होते.

 

मात्र पुराच्या पाण्याचा अंदाज न आल्याने, त्यांची कार थेट पावसाच्या पाण्याने वाहून गेली.  रात्रीच्या सुमारास ही घटना घडली.

 

तहसिलदारांच्या तातडीच्या हालचाली

 

मुंदडा यांची वाहून गेलेली कार एका झाडाला अडकल्याची माहती रात्री 12.30 च्या सुमारास गावकऱ्यांस समजली.  त्यानंतर गृहराज्यमंत्री डॉ. रणजीत पाटील यांनाही याबाबतची माहिती मिळाल्यानंतर, त्यांनी तहसीलदारांशी संपर्क साधला. मग तहसिलदारांनी मध्यरात्री 2 वाजता स्पीड बोटद्वारे रेस्क्यू ऑपरेशन सुरु केलं.

 

तससिलदार ठाणेदार व त्यांच्या संपूर्ण टीमने रात्री 2 पासून पहाटे 5.30 पर्यंत रेस्क्यू ऑपरेशन करुन, मुंदडा कुटुंबाचे प्राण वाचवले.

 

टोंगलाबाद येथील पावन मेश्रे आणि सोनकर यांनी या प्रवाहात जाऊन प्रशासनला मदत केली.