Maharashtra Assembly Budget Session : 27 फेब्रुवारीपासून सुरु झालेल्या विधीमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाची (Maharashtra Assembly Budget Session) काल (25 मार्च) सांगता झाली. या अधिवेशनात विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मिनीट झाले. तर विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले.
17 जुलै 2023 पासून पावसाळी अधिवेशन
राष्ट्रगीतानं विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशन सांगता झाली. दरम्यान, पुढील पावसाळी अधिवेशन हे सोमवार दिनांक 17 जुलै 2023 रोजी विधानभवन, मुंबई येथे होणार असल्याची घोषणा देखील करण्यात आली. याबाबतची माहिती उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विधान परिषदेत दिली तर विधानसभेचे अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर यांनी विधानसभेत दिली.
विधानपरिषदेत 91.22 टक्के तर विधानसभेत 94.71 टक्के सदस्यांची उपस्थिती
विधानपरिषदेत प्रत्यक्षात 125 तास 20 मिनिटे कामकाज झाले. सरासरी कामकाज 6 तास 57 मिनीट झाले आहे. सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 91.22 टक्के होती तर सदस्यांनी एकूण सरासरी उपस्थिती 80.60 टक्के होती. तर विधानसभेत प्रत्यक्षात 165 तास 50 मिनिटे कामकाज झाले. रोजचे सरासरी कामकाज 9 तास 10 मिनिटे झाले. विधानसभेत सदस्यांची जास्तीत जास्त उपस्थिती 94.71 टक्के होती. तर एकूण सरासरी सदस्यांची उपस्थिती 80.89 टक्के होती.
या अर्थसंकल्पीय अधिवेशनात दोन्ही सभागृहात एकूण 17 विधेयके संमत करण्यात आली आहेत. तर विधान परिषदेत एक विधेयक प्रलंबित आहे. संयुक्त समितीकडे एक विधेयक. तर एक विधेयक मागे घेण्यात आले आहे.
संमत करण्यात आलेली विधेयके
1) महाराष्ट्र (पुरवणी) विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)
2) महाराष्ट्र वैद्यकीय वस्तु खरेदी प्राधीकरण विधेयक, 2023. (वैद्यकीय शिक्षण विभाग)
3) मुंबई महानगरपालिका आणि महाराष्ट्र महानगरपालिका (सुधारणा) विधेयक, 2023 (नामनिर्देशित सदस्यांच्या संख्येत वाढ करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
4) महाराष्ट्र ग्रामपंचायत (सुधारणा) विधेयक, 2023 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (ग्राम विकास विभाग)
5) महाराष्ट्र अत्यावश्यक सेवा परिरक्षण विधेयक, 2023 (सामान्य प्रशासन विभाग)
6) डॉ. बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ आणि महाराष्ट्र सीओईपी तंत्रज्ञान विद्यापीठ (सुधारणा) विधेयक, 2023 (विद्यापीठांचे कुलगुरू नियक्ती करण्याच्या व प्र. कुलगुरूची नियुक्ती करण्याच्या पात्रता निकषांची व निवड समिती गठित करण्याची तरतूदी विद्यापीठ अनुदान आयोगाच्या विनियमांशी अनुरूप करण्याकरिता सुधारणा करणे) (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
7) महाराष्ट्र कामगार कायदे (सुधारणा) विधेयक, 2022 (शिक्षेच्या तरतूदीमध्ये बदल करणेबाबत) (उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग)
8) महाराष्ट्र कर, व्याज, शास्ती किंवा विलंब शुल्क यांच्या थकबाकीची तडजोड करण्याबाबत विधेयक, 2023. (वित्त विभाग)
9) महाराष्ट्र राज्य व्यवसाय, व्यापार, आजिविका व नोक-या यांवरील कर (सुधारणा) विधेयक, 2023. (वित्त विभाग)
10) पंढरपूर मंदिरे (सुधारणा) विधेयक, 2023 (विधि व न्याय विभाग)
11) महाराष्ट्र विनियोजन विधेयक, 2023 (वित्त विभाग)
12) महाराष्ट्र विनाअनुदानित खाजगी व्यावसायिक शैक्षणिक संस्था (प्रवेश व शुल्क नियमन) (सुधारणा)
13) महाराष्ट्र आग प्रतिबंधक व जीवसंरक्षक उपाययोजना (सुधारणा) विधेयक, 2023 (विविध कलमांमध्ये सुधारणा करण्याबाबत) (नगर विकास विभाग)
14) महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (सुधारणा) विधेयक, 2023 (उच्च व तंत्र शिक्षण विभाग)
15) महाराष्ट्र गोसेवा आयोग विधेयक, 2023
16) महाराष्ट्र पोलीस (सुधारणा) विधेयक, 2023. (विशेष पोलीस आयुक्त या पदाच्या संदर्भाचा समावेश करण्यासाठी वैधानिक तरतुद करणे) (गृह विभाग)
17) महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) विधेयक, 2023 (कोविड-19 वैश्विक साथरोग राहिलेला नसल्याने त्या अनुषंगाने कलम 73अअअ मध्ये केलेली सुधारणा वगळणेबाबत.) (सहकार, वस्त्रद्योग व पणन विभाग)
महत्त्वाच्या बातम्या: