Atul Bhatkhalkar on Amol Mitkari :  छत्रपती शिवाजी महाराजांचा (Chhatrapati Shivaji Maharaj) जन्मच या देशातील मुघल आक्रमण संपवण्याकरता झाला होता असं वक्तव्य भाजप आमदार अतुल भातखळकर (MLA Atul Bhatkhalkar) यांनी केलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी कायम हिंदू धर्म, हिंदू संस्कृतीसाठी काम केल्याचे भातखळकर म्हणाले. आमदार अमोल मिटकरींचा (MLA Amol Mitkari) इतिहास कच्चा असल्याचे मत भातखळकरांनी व्यक्त केलं.  खोटा इतिहास पसरविण्याचा प्रयत्न काही लोक करत आहेत. रायगडावर मशीद बांधली होती, असल्या ब्रिगेडी इतिहासकारांना आम्ही भीक घालत नाही असे भातखळकर म्हणाले. 


आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धोका पोहोचल्यामुळं ते खोटे आरोप करतायेत


मुळात कुठलेही लाऊड स्पीकर खाली केले नाहीत. मशिदीवरच्या भोंग्याचा प्रश्न मी उपस्थित केला आहे. त्यामुळं आदित्य ठाकरेंच्या मतपेढीला धोका पोहोचल्यामुळं ते खोटे आरोप करत असल्याचे भातखळकर म्हणाले. अनधिकृत भोंगे उतरवण्याचे आदेश राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी माझ्या लक्षवेधीच्या वेळी दिले होते. यावेळी याविषयी उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची काय भूमिका आहे? हे त्यांनी स्पष्ट करावं असेही भातखळकर म्हणाले.  


 पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याने आत्महत्या करणं दुर्दैवी


बुलढाणा जिल्ह्यातील पुरस्कार विजेत्या शेतकऱ्याने आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. ही अत्यंत दुर्दैवी घटना असल्याचे भातखळकर म्हणाले. कोणीही आत्महत्या करणे विशेषतः शेतकऱ्याने आत्महत्या करणे दुर्दैवी असल्याचे भातखळकर म्हणाले. माझी विरोधी पक्षांना विनंती राहील, यावर राजकारण करु नका असे भातखळकर म्हणाले. केंद्रात दहा वर्षे कृषी मंत्रीपद हे त्यांच्या नेत्यांनी भूषवलं होतं. शेतकऱ्यांच्या आत्महत्या कमी करण्याच्या दिशेने या सरकारने खूप पावले उचलली आहेत असे भातखळकर म्हणाले. बळीराजा कृषी संजीवनी योजना, पंतप्रधान कृषी संजीवनी योजना, जलसंपत्ती खात्याच्या मार्फत वेगवेगळे प्रोजेक्ट आणण्याचा प्रयत्न आहे. येणाऱ्या काळात प्रत्येकाला शाश्वत शेती मिळेल असा आमचा प्रयत्न असेल असे भातखळकर म्हणाले. 


सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत


भाजप आमदार सुधीर मुनगंटीवार नाराज नाहीत. हे सांगितलं आहे. काही नसताना त्यांच्या नाराजीच्या बातम्या चालवल्या जात आहेत. त्या संदर्भात त्यांनी या गाण्याचा उल्लेख केला त्यामुळं मला असं वाटतं की चुकीच्या बातम्या करणे योग्य नाही असे भातखळकर म्हणाले.  


जगात असं कोणतं सरकार नाही ज्यावर कर्ज नाही


जगात असं कोणतं सरकार नाही, ज्यावर कर्ज नाही. अमेरिकेवर देखील कर्ज आहे. कुठल्या राज्याची आर्थिक परिस्थिती चांगली की वाईट हे ठरवण्याचा एक मापदंड महत्त्वाचा असतो. तो म्हणजे त्याच्या राज्याच्या स्थूल उत्पन्नाशी कर्जाचा असलेल्या प्रमाणावरुन. आपल्या देशात राज्य सरकारचे उत्पन्न 25 टक्के असेल तर राज्य आर्थिक सुस्थितीत आहे हे हा आरबीआयचा मापदंड आहे.  


अबू आझमीने आपलं तोंड बंद ठेवलं तर असे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत


ग्रामसभेने एक निर्णय घेतला होता ग्रामसभेचा निर्णय तहसीलदारांनी रद्द केला आहे. जेव्हा ग्रामसभेने काही निर्णय घेतला, तेव्हा काही विचारपूर्वक निर्णय घेतला होता. तहसीलदारांनी तो रद्द केला होता. त्या ठिकाणी ग्रामस्थ यातून जो मार्ग काढतील तो आवश्य काढतील. अबू आझमीला बडगा मिळाल्यानंतर त्यांनी छत्रपती संभाजी महाराजांना आदरांजली वाहणारे ट्विट देखील केलं आहे. त्यामुळं या देशातील हिंदू हा नेहमीच सहिष्णु असतो, शांतता प्रिय असतो. देशात कायद्याचं राज्य आहे. कायद्या अंतर्गत प्रत्येकाने वागलं तर मुख्य म्हणजे अबू आझमीने आपलं तोंड बंद ठेवलं तर असे प्रश्न उत्पन्न होणार नाहीत असे भातखलकर म्हणाले. 


महत्वाच्या बातम्या:


Suresh Dhas : अमोल मिटकरी लहान आहे, तू कोणाच्या नादी लागतोय? माझ्या नादी लागू नको, तुझे लय अवघड होईल; सुरेश धस यांचा हल्लाबोल