LIVE UPDATES | संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापुरात NDRF च्या 2 टीम दाखल
महत्वाच्या घडामोडी - - जगभरात 78 लाख लोकं कोरोनामुक्त तर सध्या 50 लाख अॅक्टिव्ह रुग्ण. -ऑनलाईन शिक्षण कसे दिले जावे? केंद्रीय मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडून डिजिटल शिक्षणासंबंधी गाईडलाइन्स जारी - वारी, गणेशोत्सवाप्रमाणे ईदही साधेपणाने साजरी करा; मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचं आवाहन - पुन्हा राज्यपाल विरुद्ध महाविकास आघाडी? विधानपरिषदेच्या 12 जागांवरून पुन्हा राजकारण रंगणार? कोरोना व्हायरस, लॉकडाऊन आणि सर्व महत्वाचे अपडेट आणि घडामोडींचा आढावा या लाईव्ह ब्लॉगमध्ये...
एबीपी माझा वेब टीम
Last Updated:
15 Jul 2020 05:05 PM
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं 5G तंत्रज्ञान, लवकरच ट्रायल सुरु करणार
पूर्णपणे स्वदेशी बनावटीचं 5G तंत्रज्ञान, लवकरच ट्रायल सुरु करणार
संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापुरात NDRF च्या 2 टीम दाखल. एक कोल्हापूर शहरासाठी आणि एक शिरोळसाठी अशा दोन टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल. गेल्या वर्षी आलेल्या महापुरात NDRF ने मोठं बचावकार्य करत अनेकांचे जीव वाचवले
संभाव्य पूरस्थिती हाताळण्यासाठी कोल्हापुरात NDRF च्या 2 टीम दाखल. एक कोल्हापूर शहरासाठी आणि एक शिरोळसाठी अशा दोन टीम कोल्हापूर जिल्ह्यात दाखल. गेल्या वर्षी आलेल्या महापुरात NDRF ने मोठं बचावकार्य करत अनेकांचे जीव वाचवले
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं राज्यपालांना पत्र. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी. उदय सामंत यांनी चुकीची विधानं करुन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पोरखेळ लावला आहे, तसेच राजपालांच्या अधिकारांवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर निर्णय घेतल्याचा भातखळकर यांचा आरोप.
भाजप आमदार अतुल भातखळकर यांचं राज्यपालांना पत्र. उच्च व तंत्र शिक्षण मंत्री उदय सामंत यांची पदावरुन हकालपट्टी करण्याची मागणी. उदय सामंत यांनी चुकीची विधानं करुन विद्यार्थ्यांच्या आयुष्यात पोरखेळ लावला आहे, तसेच राजपालांच्या अधिकारांवर अतिक्रमण करुन बेकायदेशीर निर्णय घेतल्याचा भातखळकर यांचा आरोप.
मुंबईतल्या ग्रॅंटरोड परिसरातल्या एका इमरतीचा भाग कोसळला, या दुर्घटनेत सुदैवाने कोणीही जखमी किंवा मृत नाही, अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या असून ढिगारा उपसण्याचं काम सुरु आहे.
पंढरपूरमधील विठ्ठल मंदिर आता 31 जुलैपर्यंत बंद राहणार आहे. यासंदर्भात मंदिर समितीने परिपत्रक काढलं आहे.
CBSE बोर्डाच्या दहावीचा निकाल जाहीर, महाराष्ट्राचा निकाल 98.05 टक्के, देशभरात 93 टक्के मुली आणि 90 टक्के मुलं उत्तीर्ण
पुण्यात रात्रभरात 275 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. पुण्यातील कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या 41 हजार 601 वर पोहोचली असून आतापर्यंत 1 हजार 141 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या- 26623....
नागपूर : जिल्हा परिषद अध्यक्षांच्या पतीला कोरोनाची लागण झाल्याचं समोर आलं आहे. अनेक वेळेला कामासाठी ते जिल्हा परिषदेत येत असल्याने, जिल्हा परिषदेचे अनेक अधिकारी आणि पदाधिकारी यांच्यासह काँग्रेस पक्षाचे अनेक कार्यकर्तेही त्यांच्या संपर्कातून संक्रमित असण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
मुंबईतील पश्चिम उपनगरात अंधेरी, विलेपार्ले, गोरेगाव, दहिसर, बोरिवलीत मुसळधार पाऊस, सखल भागात पाणी साचल्यानं वाहतुकीवर परिणाम
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, पूर्व उपनगरात घाटकोपर, विक्रोळी, भांडूप, कांजूरमार्गमध्ये जोरदार पावसाची हजेरी
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, अंधेरी सबवेला पाणी साचलं, दक्षिण मुंबईत दादर, माटुंगा, वरळी परिसरात जोरदार पाऊस
मुंबईसह उपनगरात जोरदार पाऊस, दादरमधील हिंदमाता परिसरात पाणी साचलं, वाहतुकीवर परिणाम
वसई विरार शहर महानगरपालिकेने वाढत्या कोरोनाच्या आकड्यामुळे आता संपूर्ण शहरात लॉकडाउन न करता, जिथे कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहेत तिथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. वसई विरार महानगरपालिकेच्या 6 प्रभागातील 29 विभागात आता पुढील 14 दिवस लॉकडाउन असणार आहे. या 29 विभागाना प्रतिबंधित क्षेञ म्हणून घोषित करण्यात आलं आहेत. तेथे लाकडी बांबूच्या साह्याने बॅरेकेट बांधण्यात आलं असून, आता या प्रतिबंधित क्षेत्रात किराणा दुकान, मेडिकल स्टोअर, जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करणारी दुकाने सोडून सर्व दुकाने कडककडीत बंद राहणार आहेत.
वाशीम जिल्ह्यातील मंगरूळपीर आणि रिसोड शहरात पुढील सात दिवसा करिता संचारबंदी लागू करण्यात आली या दोन्ही शहरात दिवसेंदिवस कोरोना बाधितांचा आकडा वाढत चालला आहे. कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी, प्रशासनाच्या वतीने हा निर्णय घेण्यात आला आहे या वेळी नागरिकांना घरात राहण्याचे आवाहन हि या वेळेस आहे केले वाशीम जिल्ह्यात आज 4 तालुक्यात वेळेची मुभा देवून पासून पुढील 15 दिवस संचारबंदी लागू करण्यात आली आहे...तर वेळ मर्यादा घालून देण्यात आली आहे मंगरूळपीर व रिसोड तालुक्यात पुढील 7 दिवस 24 तास संचारबंदी राहणार असून फक्त दवाखाने आणि मेडिकल दुध विक्री आणि भाजीपाला चे आस्थापन उघडे राहतील तर उर्वरित वाशीम , मालेगाव मानोरा आणि कारंजा या 4 तालुक्यामध्ये दुपारी 2 वाजेपर्यंत अत्यावश्यक सुविधेची दुकान सुरु राहणार आहेत.
वर्षा ऋतुत अर्थात पावसाळ्यात कोकणचं सौदर्य आणखी बहरतं किंवा त्यात भर पडते. या काळात अनेक ठिकाणं अशी आहेत त्या ठिकाणी गेल्यानंतर मनमोहून जातं. अशाच एका तीर्थक्षेत्रांपैकी एक म्हणजे मार्लेश्वर. पण, यंदा या तीर्थक्षेत्रावर देखील कोरोनाचा परिणाम दिसून येत आहे. श्रावणी सोमवार अगदी चार दिवसांवर आला आहे. श्रावण मासात या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गर्दी होते. पण, कोरोनामुळे मात्र या ठिकाणी येण्यास भाविकांना बंदी आहे. परिणामी आता इथला व्यवसाय देखील बुडाला असून लाखो रूपयांच्या उलाढालींवर देखील परिणाम झाला आहे. या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी असलेले दुकानदार देखील आता मोठ्या आर्थिक संकटात सापडले आहे. राज्याच्या कानाकोपऱ्यावर सह्याद्रीच्या कुशीत असलेल्या स्वयंभू अशा मार्लेश्वराचं दर्शन घेण्यासाठी भाविक येतात. पण, यंदा त्यांना या ठिकाणी येता येणार नसल्यानं त्यांच्याकडून देखील आता नाराजी व्यक्त केली जात आहे. दरम्यान, जिल्हाधिकारी आणि न्यासाच्या निर्णयानंतरच हे देवस्थान भाविकांना खुलं होणार आहे. सध्या या ठिकाणी केवळ नित्यनेमानं पुजा केली जात आहे.
देशात काल दिवसभरात 29 हजार 429 कोरोनाबाधितांची नोंद. एकूण कोरोनाबाधितांचा आकडा 9 लाख 36 हजार 181 वर, आतापर्यंत बरे झालेले रुग्ण 5 लाख 92 हजार 32 तर 24 हजार 309 जणांचा मृत्यू
औरंगाबाद 39 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. आतापर्यंत 9104 कोरोनाबाधित आढळले, त्यापैकी 5355 बरे झाले, 364 जणांचा मृत्यू झाला. तर 3385 जणांवर उपचार सुरु आहेत.
डिस्ने हॉटस्टारने 7 सिनेमे दाखवण्याचं जाहीर केल्यानंतर आता नेटफ्लिक्सनेही घेतले 10 सिनेमे. यात लुडो, गुंजन सक्सेना, रात अकेली है, तोरबाज, गिनी वेड्स सनी, एके व्हरसेस एके, डॉली, किट्टी और वोह चमकते सितारे अशा सिनेमांचा समावेश होतो. यातला कोणता सिनेमा कधी रिलीज होणार ते नेटफ्लिक्स उद्या जाहीर करणार आहे.
नंदुरबार जिल्ह्यात कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत रात्री उशिरा प्राप्त अहवालात नंदुरबार जिल्ह्यात 12 रुग्णाचे अहवाल कोरोना बाधित असल्याचे प्राप्त अहवाल प्राप्त झाले आहेत. तर काल रात्री उशिरापर्यंत दोघांचा मूर्त्यू झाला आहे. तर सहा जणांनी कोरोनावर मात केली आहे. एकाच दिवसात दोघांचा मृत्यू झाल्याने नंदुरबार जिल्ह्यातील मृत्यूची संख्या 14 झाली आहे. एकूणच जिल्ह्यात नंदुरबार आणि शहादा शहरात कोरोना रुग्णांची संख्या वाढण्याचा वेग वाढला आहे. त्यामुळे या ठिकाणी कठोर उपाय योजना करण्याची मागणी सर्वपक्षीय नेत्यांनी केली आहे. नंदुरबार जिल्ह्यात एकूण कोरोना रुग्णांची संख्या 284 वर गेली आहे. 91रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 14 जणांचा मृत्यू झाला आहे. तर 179 जणांनी कोरोनावर मात केली आहे.
मुंबईच्या मरीन लाईन विभागात असलेल्या मेकर भवनमध्ये पहाटे सव्वा चार वाजताच्या दरम्यान आग लागली होती. मेकर भवन मधील पहिल्या मजल्यावर असलेल्या युनायटेड इंडिया इन्शुरन्सच्या कार्यालयात शॉक सर्किटने आग लागली होती. घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या आठ गाड्या घटना स्थळी दाखल झाल्या असून आगीवर नियंत्रण मिळविण्यात आले आहे.
शिवसेना नेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांची आमदारकी रद्द करण्याचा औरंगबाद खंडपीठाच्या निर्णया विरुद्धचे अपील सुप्रीम कोर्टात फेटाळण्यात आलंय, या प्रकरणी सुप्रीम कोर्टाने प्रतिवादीना प्रत्येकी 1-1 लाख अपिलासाठीचा खर्च खोतकरांना देण्याचा देखील आदेश दिला आहे.2014 साली झालेल्या विधानसभा निवडणुकीत अर्जुन खोतकरांनी वेळेत उमेदवारी अर्ज दाखल न केल्यामुळे त्यांचे प्रतिस्पर्धी उमेदवार काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगबाद खंडपीठात निवडणूक याचिका दाखल केली होती, त्यावर 2017 साली औरंगबाद खंडपीठाने निर्णय देऊन खोतकरांची आमदारकी रद्द केली होती, दरम्यान या निर्णयाविरोधात दाद मागण्यासाठी त्यांना चार आठवड्याची मुदत देण्यात आली होती, आज या प्रकरणी सुनावणी होऊन न्यायालयाने मागील निर्णय कायम ठेवत खोतकरांची याचिका फेटाळली..
चंद्रपूर शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या 17 ते 20 जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण लॉक डाऊन केले जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातील उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी 17 ते 20 जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले आहे.
जळगाव येथे शासकीय महाविद्यालयात महानगरपालिकेच्या कोविड सेंटर मध्ये दाखल असलेले 2 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण रुग्णांनी चक्क दारुसाठी गोंधळ घातला. कोविड सेंटरच्या सुरक्षारक्षकांना न जुमानता बाहेर जात स्वतःची असलेली रिक्षात दारूच्या बाटल्या लपवून आणल्या.चक्का कोविड सेंटर मध्ये टेंगो पंच देशी दारूचं पार्सल घेवून येणाऱ्या या दोन मद्यपीची महापौर भारती सोनवणे यांनी कोरोना कक्षा बाहेर बोलवत त्यांच्या सामानाची झडती घेतली असता त्यात दारूचा चारपाच बाटल्या सापडल्या. कोरोना संशयित महिलांच्या वार्डात दारू पिऊन आप्तांना भेटायला गेल्याने बिंग फुटले.
चंद्रपूर शहरांमध्ये कोरोना बाधितांची वाढती संख्या लक्षात घेता येत्या १७ जुलै ते २० जुलै या चार दिवसांच्या काळात पूर्ण टाळे बंदी (लॉक डाऊन) केली जाणार आहे. लॉक डाऊनच्या काळात जीवनावश्यक वस्तूंसह सर्व दुकाने बंद असतील. ही टाळेबंदी केवळ चंद्रपूर शहरासाठी मर्यादित असेल. त्यामुळे चंद्रपूर जिल्हयातीत उर्वरित ग्रामीण भागातील नागरिकांनी १७ ते २० जुलै या काळात चंद्रपूर शहरात येऊ नये आणि चंद्रपूर शहरातील नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हाधिकारी डॉ कुणाल खेमनार यांनी केले आहे.
वसई विरार महानगरपालिका क्षेत्रातील 29 ठिकाणी 15 जुलै पासून 14 दिवसांसाठी लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे.
अत्यावश्यक सेवेअंतर्गत किराणा दुकान, मेडिकल स्टोअर्स, जीवनावश्यक वस्तुंचा पुरवठा यांना परवानगी देण्यात आली आहे. इतर नागरिकांना ये-जा करण्यास व एकत्र येण्यास मनाई केली आहे. पुढील ५ प्रभागांमध्ये कंटेनमेंट झोन लागू असतील. प्रभाग समिती बी, विरार पुर्व, प्रभाग समिती सी चंदनसार, प्रभाग समिती डी आचोळे, प्रभाग समिती ई नालासोपारा पश्चिम, प्रभाग समिती एफ धानिव / पेल्हार, प्रभाग समिती आय वसई पश्चिम.
राज्यात आज 4500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.67 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 49 हजार 7 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 6741 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 7 हजार 665 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
राज्यात आज 4500 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 55.67 टक्के असून आतापर्यंत एकूण संख्या 1 लाख 49 हजार 7 झाली आहे. दरम्यान, आज कोरोनाच्या 6741 नवीन रुग्णांचे निदान झाले असून सध्या राज्यात 1 लाख 7 हजार 665 रुग्णांवर (ॲक्टीव्ह) उपचार सुरू आहेत, अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज दिली.
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सध्या शहरात विनाकारण फिरणाऱ्या व नियम मोडणाऱ्या वाहनांवर दंडात्मक कारवाई केली जाते आहे. आज वाहनाची तपासणी करत असताना हिंगोली शहरामध्ये इंदिरा चौकात हिंगोली विधानसभेचे विद्यमान आमदार तान्हाजी मुटकुळे यांची चार चाकी गाडी रॉंग साईडने येत असताना वाहतूक पोलीस शाखेच्या महिला कर्मचाऱ्याने त्यांना नियम मोडल्याप्रकरणी ऑनलाइन दोनशे रुपयांचा दंड ठोठावला आहे. विद्यमान आमदारांच्या गाडीला दंड ठोठावल्यामुळे सध्या राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे.
वारी आणि गणेशोत्सवाप्रमाणे ईद ही सावध आणि साधेपणाने साजरी करण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन, मटण शॉप्स जिथे असतील तिथून किंवा ऑनलाइन पद्धतीने ऑर्डर घेता येईल का याबाबत उपाय योजना करावी, गेल्या 4 महिन्यात सर्व सण सर्व समाज घटकांनी घरात साजरी केली, त्यामुळे मुस्लिम बांधवांनी ईदीची प्रार्थना घरातच करावी, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे याचं आवाहन
चंद्रपुरात सख्ख्या मोठ्या भावानेच केली भावाची हत्या, मैत्रिणीची छेड काढल्याच्या रागातून हत्या, शहरातील दुर्गापूर परिसरात आढळला पुरलेला मृतदेह, दुर्गापुरच्या वेताळ चौक भागातील घटनेने परिसरात खळबळ
#BreakingNews साताऱ्यात 17 जुलै ते 22 जुलैदरम्यान संपूर्ण लॉकडाऊन, सातारा जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश, कोरोनाचा वाढत्या प्रादुर्भाव रोखाण्यासाठी निर्णय
मनमाड शहर आणि परिसरात गेल्या अर्धा तासापासून जोरदार पावसाची हजेरी, 10 दिवसाच्या विश्रांती नंतर पावसाने लावली हजेरी,मका,भुईमूग,बाजरी पिकांना मिळणार जीवदान. 10 दिवसापासून उन्हामुळे पीक पिवळी पडू लागली होती.
गडचिरोली : गडचिरोलीत आरोग्य कर्मचारी कोरोनाचा 'सुपर स्प्रेडर' ठरण्याची शक्यता, आपल्या वडिलांच्या मृत्यूनंतर अंत्यविधीत सहभागी झालेला कर्मचारी परतला कामावर, लक्षणे दिसू लागल्यानंतर काळजी न घेता खाजगी रुग्णालयात घेतले उपचार, स्थिती गंभीर झाल्यावर शासकीय रुग्णालयात करण्यात आली स्त्राव चाचणी, पॉझिटिव आढळलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांच्या संपर्कात शेकडो लोक आल्याची माहिती, गडचिरोली आरोग्य आणि आणि जिल्हा प्रशासन वेगाने करत आहे संपर्क हुडकण्याची कारवाई, गडचिरोलीत संस्थात्मक विलगीकरणाव्यतिरिक्त बाधितांच्या संख्येत चिंताजनक वाढ
शरद पवार यांच्या मुलाखतीत एका मुद्द्यावरती भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी प्रसिद्धी पत्रक प्रसिद्धीसाठी दिले आहे. राष्ट्रवादी काँग्रेस वेगळी लढली असती तर राष्ट्रवादी काँग्रेसला 20 आणि काँग्रेसला कशाबशा दहा जागा मिळाल्या असत्या. आता जेव्हा केव्हा निवडणुका होतील त्यामध्ये चारही प्रमुख पक्ष स्वतंत्र लढूया. महाराष्ट्रात कोणाची किती ताकद आहे हे तपासून घ्या, असं आव्हान चंद्रकांत पाटील यांनी या पत्रकातून दिलं आहे.
रायगड - खोपोलीतील इंडिया स्टील कपंनीमध्ये मध्यरात्री स्फोट झाला. यामध्ये दोघांचा मृत्यू झाला असून एक जण जखमी झाला आहे. या स्फोटामुळे एक किमी परिसरात मोठा आवाज झाला. तर घरांना हादरे बसले, स्फोटाचे कारण अद्याप अस्पष्ट आहे. दरम्यान व्यवस्थापनाकडून कोणताही खुलासा नाही.
अमरावतीत आज सकाळी 7 जणांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे अमरावतीतील कोरोना बाधितांची संख्या 985 वर पोहोचली आहे. सध्या अमरावतीमध्ये 985 कोरोना बाधित आहेत. तर आतापर्यंत 34 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून 641 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
चंद्रपूर : सिंदेवाही शहरात वाघ शिरल्याने खळबळ उडाली. सिंदेवाही-पाथरी मार्गावर असलेल्या सहकारी राईस मिलमध्ये वाघाने ठिय्या मांडला आहे. वाघ पाहण्यासाठी परिसरात हजारो लोकांची गर्दी होते. त्यापैकी वाघ पाहण्यासाठी जवळ गेलेल्या गजानन ठाकरे या 45 वर्षीय व्यक्तीवर वाघाने केला हल्ला केला असून हा व्यक्ती जखमी झाला आहे. वनविभागाची टीम घटनास्थळी दाखल झाली आहे.
काही दिवसापूर्वी 'करोना मुक्त' झालेल्या बारामतीत पुन्हा करोनाने डोके वर काढले आहे. मागील दोन दिवसांपासून बारामतीतील करोना रुग्णांचा आलेख वाढू लागल्याच्या पार्श्वभूमीवर बुधवार 15 जुलैच्या रात्री 12 वाजल्यापासून पुढील आदेश येईपर्यंत बारामतीत कडकडीत बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. बारामतीत काल रविवार रोजी एकाच दिवशी तब्बल 18 रुग्ण आढळून आल्याने नागरिकांसह प्रशासनाची चिंता वाढली होती. बाधितांच्या संपर्कात असणाऱ्यांची करोना चाचणी घेतली असता आज पुन्हा नव्याने 5 करोना बाधितांची भर पडली आहे. बारामतीत दोन दिवसात 23 करोना बाधित रुग्ण आढळून आले असून एकूण बाधित रुग्णांची संख्या 63 वर पोहोचली आहे. या वाढत्या रुग्ण संख्येमुळे पुढील काही दिवस बारामती पुन्हा बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. त्यानुसार 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून नगरपालिका हद्दीतील सर्व क्षेत्र प्रतिबंधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आले आहे. गुरुवार 16 जुलैपासून अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकाने बंद राहणार आहेत. अशी माहिती प्रांताधिकारी दादासाहेब कांबळे यांनी दिली.
एल्गार परिषद प्रकरणी अटकेत असलेले लेखक, कवी वरवरा राव यांना सोमवारी 13 जुलै रात्री मुंबईच्या जेजे रुग्णलयात उपचारसाठी दाखल करण्यात आलं. त्यांनी कोरोनाच्या पार्श्वभूमीवर केलेला जामीन अर्ज विशेष एनआयए न्यायालयाने फेटाळल्यानंतर, मुंबई उच्च न्यायालयात जामीनासाठी याचिका दाखल केली आहे. राव हे तळोजा मध्यवर्ती कारागृहात होते. तळोजा कारागृहात प्रकृती खालावत चालली असल्याचे राव यांनी स्वतःहून फोनद्वारे आपल्या नातेवाईक आणि वकिलांना सांगतिल्यानंतर, त्यांच्या वकिलांनी ही याचिका दाखल केली. तसेच जेजे रुग्णालय प्रशासनाने सूचवल्याप्रमाणे कारागृह प्रशासन राव यांच्यावर योग्य ते उपचार करत नसल्याचा आरोप या याचिकेतून करण्यात आला आहे. कारागृहातील ज्या अधिकाऱ्यांनी हा गलथानपणा केला त्यांच्यावर कारवाई करावी, राव यांची तात्काळ वैद्यकीय तपासणी करुन त्यांना उपचारांसाठी तातडीने रुग्णालयात दाखल करावं, अशी मागणीही याचिकेमार्फत करण्यात आली आहे. या याचिकेवर लवकरच सुनावणी होण्याची शक्यता आहे. मात्र त्याआधीच त्यांना जेजे रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आलं आहे. त्यांचे स्वॅबही घेण्यात आले आहेत.
राजस्थानमधील सत्तासंघर्ष अजूनही कायम, आज पुन्हा काँग्रेस विधीमंडळ पक्षाची बैठक होणार, सचिन पायलट यांच्यासह इतर आमदारांना सहभागी होण्याचं आवाहन, मात्र आजही सचिन पायलट उपस्थित राहणार नाहीत, तसंच विधानसभेत बहुमत सिद्ध करण्याचं आव्हान पायलट यांनी दिल्याची सूत्रांची माहिती
रत्नागिरी जिल्ह्यात दिवसेंदिवस कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहायला मिळत आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील कोरोना बाधितांचा आकडा 900 पाह पोहोचला आहे. एकूण 912 जणांना कोरोनाची लागण झाली असून 627 जण कोरोनामुक्त झाले आहेत.
लातूर जिल्ह्यातील कोरोनाबाधित रुग्णसंख्या मोठ्या प्रमाणात वाढत आहे. एकाच दिवशी तब्बल 59 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. या 59 बाधित रुग्णांमध्ये लातूर शहर 33, उदगीर 7, अहमदपूर 1, देवणी 3, औसा 8, आणि निलंग्यातील 8 जणांचा समावेश आहे. सोमवारी 13 जुलैच्या अहवालानुसार 341 रुग्णांच्या स्वॅबची तपासणी करण्यात आली. त्यापैकी 57 रुग्णांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. तर 244 व्यक्तिंचा निगेटिव्ह, 32 अनिर्णित, 1 रद्द आणि 7 जणांचा अहवाल प्रलंबित आहे.
सोलापुरात एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू, आत्महत्या केल्याचा प्राथमिक अंदाज, शहरातील जुना पुणे नाका परिसरतील हांडे प्लॉट येथील धक्कादायक प्रकार, पती, पत्नी, दोन लहान मुलांचा मृत्यू, आर्थिक विवंचनेतुन आत्महत्या केल्याचा अंदाज, पोलीस आयुक्त, पोलीस निरीक्षक यांच्यासह अधिकारी कर्मचारी घटनास्थळी दाखल, मृतदेह शासकीय रुग्णालयात रवाना
यूजीसीचे उपाध्यक्ष डॉक्टर भूषण पटवर्धन यांची एबीपी माझाला exclusive माहिती. महाराष्ट्रातल्या गंभीर स्थितीची, वाढत्या कोरोना प्रादुर्भावाची पूर्ण कल्पना. पण परीक्षा न घेता पदव्या देणे हे शैक्षणिक दृष्ट्या योग्य नाही. मध्यम पर्याय काय काढता येईल यावर कुलपती कुलगुरू यांच्याशी चर्चा सुरू. महाराष्ट्राची केस योग्य पद्धतीने कमिशन पुढे मांडण्यासाठी पूर्णपणे प्रयत्न करणार. त्यातून हा वाद संपुष्टात येईल अशी ही आशा. महाराष्ट्रात उच्च शिक्षण मंत्र्यांनी जाहीर केलेल्या निर्णयावर यूजीसी सदस्यांची प्रतिक्रिया.
उस्मानाबादमधील तात्पुरत्या जेलमधील 17 जणांना कोरोनाची लागण, 6 कर्मचारी आणि 11 कैदी कोरोना पॉझिटिव्ह, काल 6 जण तर दोन दिवसात 23 जण कोरोना पॉझिटिव्ह, आणखी 11 कैद्यांची चाचणी करणे बाकी
सोयाबीनच्या बोगस बियाण्यामुळे पिकाची उगवण न झाल्याचे प्रकरण. औरंगाबाद खंडपीठात दाखल फौजदारी सुमोटो जनहित.
खंडपीठ कार्यक्षेत्रात महाबीजसह (दोन गुन्हे) तर इतर सोयाबीन कंपन्यावर 46 फौजदारी गुन्हे दाखल करण्यात आल्याचे म्हणणे कृषी विभागातर्फे खंडपीठात माहिती.
53 कंपन्यांना कृषी विभागाने कारणे दाखवा नोटीस बजावल्या . खंडपीठ कार्यक्षेत्रात सोयाबीन न उगवल्याप्रकरणातील तक्रार निवारण समितीकडे 49 हजार 337 तक्रारी दाखल झाल्या आहेत. त्यापैकी 36 हजार 692 तक्रारदारांचे पंचनामे करण्यात आल्याचेही खंडपीठात सादर करण्यात आले
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची सावध भूमिका? राजस्थानच्या हालचालींनंतर उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब थोरात यांच्यात झाली चर्चा, बाळासाहेब ठाकरे स्मारक येथे झाली चर्चा, गेल्या अनेक दिवसांपासून राष्च्रवादी आणि शिवसेना यांच्यात सुरु होत्या बैठका
शहरी नक्षलवाद प्रकरणी गौतम नवलखा यांना जामीन देण्यास एनआयए कोर्टाचा नकार, नवलखा नजरकैदेतून पुन्हा एनआयएच्या ताब्यात, 10 दिवसांसाठी एनआयए कोठडीत रवानगी, कोरोनामुळे तेलतुंबडे आणि नवलखा यांच्याविरोधात आरोपपत्र दाखल करण्यासाठी एनआयएला 10 दिवसांची मुदतवाढ, वरवरा राव यांची जामीनासाठी हायकोर्टात याचिका
बुलडाण्यात पेट्रोल पंप चालकाने पेट्रोल दिले नाही म्हणून पेट्रोल मागणाऱ्या मुलाने चक्क तीन साप कॅबिनमध्ये सोडले. ही धक्कादायक घटना बुलडाण्याच्या मलकापूर रोडवरील चौधरी पेट्रोल पंपावर सायंकाळी चार वाजता घडली.
भारतात कोरोनावरील लस 15 ऑगस्टपर्यंत येणे शक्य असल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आयसीएमआरचे डायरेक्टर डॉ. भार्गवा यांच्याशी फोनवर झालेल्या चर्चेनंतर टोपे यांनी ही शक्यता वर्तवलीय.
#Breaking राज्यातील मुदत संपलेल्या 14, 234 ग्रामपंचायतीवर प्रशासक नेमन्याचे आदेश, या ग्रामपंचायतींची मुदत डिसेंबरपर्यंत संपणार आहे, निवडणूक घेणे शक्य नसल्याने राज्य सरकारचा निर्णय, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने पालकमंत्र्यांच्या सल्ल्याने प्रशासकची नियुक्ती करावी
पिंपरी चिंचवडमधील देहूरोड पोलिसांनी आज पथसंचलन केलं. उद्या पासून शहरात सुरू होत असलेल्या लॉकडाऊनसाठी पोलीस सज्ज असल्याचं दिसून आलं. यावेळी नागरिकांना लॉकडाऊनच्या नियमांचे काटेकोर पालन करण्याच्या सूचना देण्यात आल्या. नियमांची पायमल्ली केल्यास कठोर शिक्षा दिली जाईल असं ही पोलिसांनी बजावलं.
मुंबईत पुढील 24 ते 48 तासांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याच्या वतीने देण्यात आली आहे. हवामान खात्याचे उपमहासंचालक कृष्णानंद हौसाळीकर यांनी ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. या पार्श्वभूमीवर हवामान खात्याने मुंबई महानगर पालिका, पोलिस प्रशासन यांना देखील दक्षतेचा इशारा दिला आहे. मुंबई महापालिकेने देखील आपल्या 24 विभागांना सावधानतेचा इशारा दिला आहे. विशेषता ज्याठिकाणी पाणी भरण्याची शक्यता आहे त्याठिकाणी पाणी उपसा करण्यासाठी पंप बसवण्यात आले आहेत. मुंबईसोबतच कोकणात देखील मुसळधार पाऊस पडणार असल्याचं हवामान खात्याने म्हंटल आहे.
रायगड जिल्ह्यात वाढत्या कोरोनाबाधितांच्या संख्येला रोखण्यासाठी दहा दिवसांचा लॉकडाऊन करण्यात येणार आहे. यासंदर्भातील निर्णय आज पालकमंत्री यांच्या उपस्थितीत झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत घेण्यात आला आहे. गेल्या साडेचार महिन्यांच्या कालावधीत रायगड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत वाढ झाली आहे. त्यातच, गेल्या बारा दिवसात ही संख्या सुमारे चार हजार पर्यंत पोहचली आहे. यामध्ये पनवेल, अलिबाग, पेण, रोहा आणि उरण परिसरात रुग्णांची संख्या ही झपाट्याने वाढू लागली आहे. यामुळे, यापूर्वीच अनेक तालुक्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आलेले आहे. याचदरम्यान, आज जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या सर्वपक्षीय आमदारांच्या बैठकीत पुन्हा एकदा लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. यामुळे, येत्या 15 जुलैच्या मध्यरात्रीपासून 24 जुलैपर्यंत रायगड जिल्ह्यात लॉकडाऊन जाहीर करण्यात आला आहे.
हातकणंगले तळंदगे ग्रामपंचायत हद्दीतील अतिक्रमण काढण्यासाठी गेलेल्या ग्रामपंचायतीच्या पथकावर जमावाचा सशस्त्र हल्ला, हल्ल्यामध्ये पथकातील सरपंचाच्या पतीसह ग्रामपंचायत कर्मचारी बेदम मारहाणीत गंभीर जखमी हल्लेखोरांना तातडीने अटक करण्याच्या मागणीसाठी तळंदगे गाव बेमुदत बंद, मारहाणीच्या घटनेची हुपरी पोलीस ठाण्यात नोंद
वाशिम : कोरोनाच्या काळात महावितरणने वाढीव वीज बिल देऊन सर्व सामान्य जनतेची पिळवणूक सुरु केलेली आहे. राज्यकर्ते त्याकडे नजरंदाज करत असल्याच्या निषेधार्थ वाशिमच्या वीज वितरण कंपनीच्या कार्यालयसमोर स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या वतीने वाढीव वीज बिलाची होळी करून वाढलेल्या वीज बिलांचा निषेध करण्यात आला आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात आज पावसाची सकाळपासून रिपरिप सुरु आहे. जिल्ह्यातील सर्वच भागात पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत. त्यामुळे बळीराजा सुखावला असून शेतकरी भात लागवड, नाचणी लागवड तसेच भुईमूग लागवड करत आहेत. गेल्या 24 तासांत जिल्ह्यात 57 मी. मी. सरासरी पाऊस पडला असून जिल्ह्यात आतापर्यंत 1991 मिलिमीटर पाऊस पडला आहे.
श्रावण महिन्याच्या पार्श्वभूमिवर बारा ज्योतिर्लिंगापैकी एक असलेल त्र्यंबकेश्वर मंदिर भाविकांसाठी खुले करा, तसेच धार्मिक विधी आणि इतर व्यवसायांना परवानगी द्या, अशी मागणी पुरोहित संघाने मुख्यमंत्र्यांकडे तर राष्ट्रवादी युवक कॉंग्रेसच्या वतीने पालकमंत्री छगन भुजबळ यांच्याकडे करण्यात आली आहे. 18 मार्चपासून त्र्यम्बकेश्वर मधिल सर्व व्यवहार ठप्प असून अनेकांवर यामुळे उपासमारीची वेळ आली आहे, त्र्यंबकेश्वर नगरीतिल सर्व व्यवसाय हे भाविक आणि पर्यटकांवरच अवलंबून असून श्रावण महिन्यात तर इथे उत्सवच साजरा होत असून या काळात मोठ्या संख्येने भाविक दाखल होत असतात. त्यामुळे लवकरात लवकर या मागणीवर विचार करावा, कोरोनाबाबत सर्व खबरदारीच पालन आम्ही करू अशी विनंती करण्यात आली आहे.
मुंबई महापालिकेच्या वैद्यकीय विद्यालय, हॉस्पिटल्समध्ये कंत्राटी तत्त्वावरील नियुक्तीवर असलेल्या डॉक्टर्स कोरोना बाधित झाल्यामुळे हॉस्पिटलमध्ये अॅडमिट व्हावं लागले होते. तसेच काही डॉक्टर्सना विलगीकरण कक्षेत जावं लागलं होतं. त्यामुळे त्यांचा मे महिन्याचा पगार महापालिकेने कापून घेतलेला आहे. सध्या असे 200 डॉक्टर्स महापालिकेच्या विविध हॉस्पिटलमध्ये सेवा देत आहेत. या डॉक्टरांचा पगार थकवण्यत आलेला आहे. अशा सर्व डॉक्टरांचा ताबडतोब पगार द्यावा अशी मागणी भारतीय जनता पार्टीचे नेते किरीट सोमय्या यांनी केलेली आहे.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या सावटात राज्याच्या विधिमंडळाने आजपासून अधिकारी आणि कर्मचार्यांची उपस्थिती 15 टक्क्यांवरून 50 टक्क्यांपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. 3 ऑगस्टपासून सुरु होणाऱ्या पावसाळी अधिवेशनाच्या तयारीसाठी विधिमंडळातील अधिकारी व कर्मचार्यांच्या उपस्थितीत वाढ करण्यात आली आहे. विधिमंडळ सचिवालयाने कर्मचार्यांच्या उपस्थितीसंदर्भात एक आदेश जारी केला आहे. ज्यामध्ये संबंधित विभागाचे सचिव व कक्ष अधिकारी यांची उपस्थिती अनिवार्य करण्यात आली आहे. मंत्रालयानंतर राजभवनात कोरोनाचा शिरकाव झाल्यानंतर आता विधिमंडळातही कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावामुळे चिंतेचे वातावरण आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्त्वाखाली राज्य आपत्ती व्यवस्थापन समितीची आज दुपारी एक वाजता मंत्रालयात बैठक होणार आहे. यात यूजीसीच्या गाईडलाईन्सनंतर विद्यापीठ अंतिम परीक्षांसंदर्भात चर्चा होणार आहे.
ठाण्यात आजपासून 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर सध्या बंद आहे. ठाणे शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील घराबाहेर पडण्याची मुभा असेल. मात्र इतर सर्व लोकांना घरात बसण्याचे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे. ठाण्यातील सर्व मुख्य बाजारपेठा या सध्या बंद आहेत. दुसरीकडे 12 तारखेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनसाठी घरात आणलेले जीवनावश्यक सामान आणि साहित्य संपल्याने आज काही ठाणेकर घराबाहेर पडले. पोलिसांनी त्यांना काही वेळासाठी पकडून मग सोडून दिले. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडण्याची मुभा सध्या कोणालाच नाही. मात्र जीवनावश्यक वस्तू संपल्या तर त्या आणायच्या कशा असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.
ठाण्यात आजपासून 19 तारखेपर्यंत लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. त्यामुळे संपूर्ण ठाणे शहर सध्या बंद आहे. ठाणे शहरात केवळ अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांना घराबाहेर पडण्याची परवानगी देण्यात आली आहे. त्यासोबत घरकाम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील घराबाहेर पडण्याची मुभा असेल. मात्र इतर सर्व लोकांना घरात बसण्याचे आवाहन पालिका आणि पोलीस प्रशासनाने केले आहे. ठाण्यातील सर्व मुख्य बाजारपेठा या सध्या बंद आहेत. दुसरीकडे 12 तारखेपर्यंत असलेल्या लॉकडाऊनसाठी घरात आणलेले जीवनावश्यक सामान आणि साहित्य संपल्याने आज काही ठाणेकर घराबाहेर पडले. पोलिसांनी त्यांना काही वेळासाठी पकडून मग सोडून दिले. लॉकडाऊन असल्याने घराबाहेर पडण्याची मुभा सध्या कोणालाच नाही. मात्र जीवनावश्यक वस्तू संपल्या तर त्या आणायच्या कशा असा प्रश्न ठाणेकर विचारत आहेत.
पिंपरी चिंचवडमध्ये आज दुकानं उघडण्यापूर्वीच ग्राहक रांगा लावून उभे असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. आज मध्यरात्रीपासून लॉकडाऊन सुरु होत असल्याने आणि रविवारच्या गर्दीत सामान खरेदी करता न आल्याने शहरवासीय सकाळीच घराबाहेर पडले आहेत.
धुळे जिल्ह्यात सर्वाधिक कोरोना बाधित रुग्ण संख्या धुळे शहरात असल्यानं धुळे शहरात 14 तासांची संपूर्ण संचारबंदी लागू करण्यात आलीय. दुपारी चार ते दुसऱ्या दिवशी सकाळी सहा वाजेपर्यंत ही संचार बंदी असल्यानं सायंकाळी भाजीपाला विक्री होत नाही. धुळे कृषी उत्पन्न बाजार समितीत देखील कोरोनाचा शिरकाव झाल्यानं 14 जुलैपर्यंत बाजार समिती बंद असल्यानं भाजीपाला उत्पादक शेतकऱ्यांची गैरसोय झालीय . गिलके लागवड खर्च देखील निघत नाहीये, त्यात कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे मजूर मिळत नाहीत, मजुरीचे दर दुपटीनं द्यावे लागताहेत. मार्केट बंद असल्यानं मिळेल त्या भावात गिलके विक्री करत असल्याची प्रतिक्रिया वरखेडी येथील शेतकरी अरुण माळी यांनी दिली आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात कोरोना बाधितांच्या वाढत्या आकड्यासोबतच आता कोरोनामुळे मृत्यू होणाऱ्यांची संख्या देखील वाढत आहे. कारण जिल्ह्यात आणखी एकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला असून एकूण बळींची संख्या ही 31वर पोहोचली आहे. तर, कोरोना बाधितांचा एकूण आकडा हा आता 865वर पोहोचला असून आतापर्यंत 612 जणांनी कोरोनावर मात केली आहे. टक्केवारीमध्ये पाहायचं झालं तर जिल्ह्यात कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या ही आता 70 टक्क्यांवर पोहोचली आहे.
कोरोना महामारीच्या काळात कर्तव्य करून देखील हाती पूर्ण पगार न आल्यानं संसाराचा गाडा कसा चालवावा, मुलांच्या शिक्षणासाठी तजवीज कशी करावी या विवंचनेत एसटी कर्मचारी असतांना एसटी प्रशासन एसटी कर्मचाऱ्यांना 20 दिवस अर्जित रजेचा निर्णय घेतल्यानं एसटी कर्मचाऱ्यांनी तीव्र संताप व्यक्त केलाय. लॉकडाऊनच्या काळात एसटी अत्यावश्यक सेवेतील कर्मचाऱ्यांसाठी धावतेय. राजस्थान मधील कोटायेथून महाराष्ट्रातील विद्यार्थी आणणं असो की परप्रांतीय कामगारांना मध्य प्रदेश सीमेपर्यंत पोहचवणं असो एसटी धावली, जीवाची पर्वा न करता एसटी कर्मचाऱ्यांनी देखील आपली ड्युटी केलीय. असं सगळं असतांना दुसरीकडे एसटी कर्मचाऱ्यांच्या पगारात कपात केल्यानं एसटी कर्मचारी त्यांच्या कुटुंबियांवर उपासमारीची वेळ आलीय,अशावेळी एसटी प्रशासनानं कर्मचाऱ्यांच्या पाठीशी उभं राहणं आवश्यक असतांना उलट 20 दिवस सक्तीचा रजेचा निर्णय लादून एसटी कर्मचाऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप एसटीची एकमेव मान्यता प्राप्त संघटना असलेल्या महाराष्ट्र एसटी कामगार संघटनेनं केलाय. संघटनेनं या संदर्भात एसटी प्रशासनाला निवेदन देऊन एसटी प्रशासनानं 20 दिवस अर्जित रजा कपातीचा निर्णय रद्द करण्याची तसेच एसटी कर्मचाऱ्यांना पूर्ण वेतन देण्याची मागणी केलीय .
कोरोनामुळे पहिल्या लाॅकडाऊनमध्ये बंद असलेल्या अनेक मंदिरांमध्ये तिरुपती बालाजीच्या मंदिराचा समावेश होता. हे मंदिर पुन्हा उघडण्यात आल्यानंतर पुन्हा एकदा तिरुपतीच्या कुंडीमध्ये भाविकांच्या दानाचा ओघ सुरु झाला आहे. तिरूमला येथील बालाजी मंदिरात एका भाविकाने कुंडीत 20 सोन्याच्या बिस्किटांची दान केले आहे. याचे वजन जवळपास दोन किलो असल्याची माहिती तिरुमला तिरुपती देवस्थानचे सीईओ अनिल कुमार सिंघल यांनी दिली आहे. सिंगल यांच्या माहितीनुसार, 11 जूनला तिरूमला मंदिर उघडण्यात आले. 30 दिवसांमध्ये 16.7 कोटी रुपयांची रोख रक्कम जमा झाली आहे. या दरम्यान जवळपास अडीच लाख भाविकांनी दर्शन घेतले. मंदिरातर्फे साडेतीन हजार कर्मचाऱ्यांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. कोरोना चाचणीमध्ये 91 जणाला लागण झाल्याचं उघड झालं. जवळपास 67 हजार भाविक विविध कारणांनी दर्शनाला येऊ शकले नाहीत हेही त्यांनी स्पष्ट केला आहे.
बीड जिल्ह्यातील 628 प्रलंबित अहवालांपैकी रात्री उशिरा 195 अहवाल प्रशासनाला प्राप्त झाले आहेत. त्यापैकी आणखी 9 पॉझिटिव्ह तर 184 रिपोर्ट निगेटिव्ह आले आहेत. अन्य 433 अजूनही प्रलंबित आहेत. दरम्यान काल सायंकाळी 345 अहवाल प्राप्त झाले होते. त्यात 5 पॉझिटिव्ह तर 340 निगेटिव्ह आले होते. त्यापैकी 4 परळी आणि 1 रुग्ण अंबाजोगाईचा होता. आत्ता आलेल्या प्रलंबित रिपोर्ट मधील पॉझिटिव्ह रुग्ण हे बीड तालुक्यातील सातजन आणि येथील शिरूर तालुक्यातील 1 व आष्टी येथील 1 अशा 9 रुग्णाचा समावेश आहे. आजच्या अहवालामुळे परळी शहर व तालुक्याची धाकधुक कायम आहे. प्रशासनाने अगोदरच परळीची टाळेबंदी दोन दिवसांनी वाढविली आहे
लातूर : सोमवारी सकाळी साडेसहाच्या सुमारास लातूर शहरातील औसारोड रस्त्यावर भरधाव कारचालकाने तिघांना उडवले असून तिघांचिही प्रकृती चिंताजनक आहे. चालक हा अल्पवयीन असून वडील झोपेतून उठण्याअगोदर चक्कर मारण्यासाठी त्याने कार बाहेर काढली होती. वेगावर नियंत्रण नसल्याने हा अपघात झाला. याप्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
दहशतवादी संघटनेशी संबंध असल्याच्या संशयावरुन पुण्यातून दोघांना अटक करण्यात आली आहे. एनआयए आणि दहशतवाद विरोधी पथकाने संयुक्त कारवाई केली. सादिया अन्वर शेख (वय 21, रा येरवडा) आणि नबील सिद्दिकी खत्री (वय 27, रा. कोंढवा) अशी अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.
नाशिक जिल्ह्यातील रुग्णसंख्येने सात हजारांचा टप्पा पार केला आहे. त्यामुळे जिल्ह्यातील एकूण आकडा 7002 वर पोहोचला आहे. रात्रितून 55 नव्या रुग्णांची भर पडली आहे. काल दिवसभरात 218 जणांना कोरोनाची लागण झाली असून कोरोनाचे 6 बळी गेले आहेत. आतापर्यंत कोरोनामुळे 332 बाधितांचा मृत्यू झाला असून सध्या 2151 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर 4519 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
मुंबई, ठाणे व कल्याण महापालिकेपाठोपाठ आत्ता भिवंडी महानगर पालिकेनेही लॉकडाऊन वाढवला आहे. भिवंडी क्षेत्रात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता आणखी सात दिवस लॉकडाऊन वाढवण्यात आला आहे. भिवंडी महापालिकेचे आयुक्त डॉ. पंकज आशिया यांनी पत्राद्वारे याबाबत आदेश काढले आहेत.
भिवंडी शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण अतिशय झपाट्याने वाढत आहेत, शहरात देखील कोरोनाचा प्रादुर्भाव कमी होत नसून शहर व ग्रामीण भागात आत्तापर्यंत 4572 रुग्ण पॉझिटिव्ह आलेत व 196 जणांचा मृत्यू झालाय तर रुग्ण 2675 बरे झालेत आणि 1696 जणांवर अजूनही उपचार सुरू आहे.
मुंबई : युजीसीचे (विद्यापीठ अनुदान आयोग) माजी अध्यक्ष सुखदेव थोरात यांनी देशातील विद्यापीठांच्या अंतिम वर्ष परिक्षेबाबत युजीसीने 6 जुलैला दिलेल्या गाईडलाइन्स नुसार परीक्षा बंधनकारक करण्याच्या निर्णयावर टीका केलीय. या गाईडलाइन्स दुर्भाग्यपूर्ण असल्याचं म्हटलं आहे. युजीसी अध्यक्ष धीरेंद्र पाल सिंग यांना हे पत्र लिहून देशातील अनेक विद्यार्थ्यांची परीक्षा रद्द करण्याची मागणीवर पुन्हा एकदा चर्चा करुन युजीसीने पुन्हा एकदा विचार करून सुधारित गाईडलाइन्स देशातील विद्यापीठांना देण्यात याव्यात, असं या पत्रात त्यांनी म्हटलं आहे.
मॉस्को : रशियातील सेशेनोव्ह विद्यापीठाने (Sechenov University) कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या सर्व चाचण्या यशस्वीरित्या पूर्ण केल्याचा दावा केला आहे. सर्व चाचण्या पूर्ण करणारी ही जगातली पहिली कोरोना प्रतिबंधक लस असेल. सेशेनोव्ह विद्यापीठ रशियाची राजधानी मॉस्कोमध्ये आहे.
कोरोना व्हायरस प्रतिबंधक लसीच्या चाचण्या यशस्वी झाल्याची माहिती सेशेनोव्ह विद्यापीठातील इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सलॅशनल मेडिसीन आणि बायोटेक्नॉलॉजी (Institute for Translational Medicine and Biotechnology) चे संचालक वादिम तारासोव्ह यांनी ही माहिती रशियातील अधिकृत वृत्तसंस्था स्पुटनिकला दिली आहे
वसई विरार क्षेञात कोरोनाचा वाढता प्रादुर्भावर पाहता, आता प्रशासनाने ज्या ठिकाणी कोरोनाची संख्या वाढत आहे तेथे लॉकडाऊन करण्याचा निर्णय घेतला आहे. नालासोपारा शहरात कोरोना रुग्णांचा आकडा वाढत आहे. त्यामुळे नालासोपारा पूर्व आणि पश्चिमेच्या पाच प्रभागात आज पासून पुढील आदेश येईपर्यंत लॉकडाऊन लागू करण्यात आला आहे. नालासोपारा पूर्वेकडील संयुक्त नगर, अल्कापुरी रोड तसेच नालासोपारा पश्चिमेकडील निलेगाव, सोपारागाव, समेळपाडा या ठिकाणी आजपासून लॉकडाऊन लागू असणार आहे. अत्यावश्यक सेवा वगळता सर्व दुकानं तसंच इतर आस्थापनं बंद असणार आहेत. नागरिकांनी सहकार्य करण्याचे आवाहन पालिका प्रशासनातर्फे करण्यात आलं आहे. आजच्या घडीला वसई विरार क्षेत्रात कोरोनाने 7,600 चा आकडा पार केला आहे.
लातूरचे जिल्हाधिकारी जी श्रीकांत यांनी 15 जुलै ते 30 जुलै पर्यंत लॉकडाऊन करण्यात येणार असल्याची माहिती दिली आहे. या काळात जीवनावश्यक सोयी सुविधा वगळाता इतर सर्व बाबींसाठी काय नियमावली असेल ते उद्या सांगण्यात येणार आहे. शहरी आणि ग्रामीण भागात काय नियमावली असेल याची माहिती उद्या देण्यात येणार आहे.
कुटुंबीय मोबाईल घेऊन देत नाही या रागातून विष पिऊन 19 वर्षीय तरूणीची आत्महत्या. हुडकेश्वर भागात राहणाऱ्या तरुणीनं काल मोबाईल फोन वापरण्यावरून तिच्या भावासोबत वाद झाले होते. तरुणीच्या भावाकडे मोबाईल होते. मात्र, तरुणीकडे नव्हते. कुटुंबाच्या आर्थिक स्थितीमुळे त्यांना आणखी एक मोबाईल लगेच खरेदी करणे शक्य नव्हते. त्याच नैराश्यात शनिवारी विष पिऊन केलेल्या तरुणीचा आज रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे. पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केले आहे.
पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनमध्ये उद्योग आणि आयटी कंपन्या सुरूच राहणार हे आता निश्चित झालंय. महापालिकेने तसं परिपत्रकात नमूद केलंय. पण कर्मचाऱ्यांना कंपनीत आणण्यासाठी औद्योगिक कंपन्यांना चारचाकी वाहन अथवा निश्चित केलेल्या बसचीच परवानगी राहील. तर जी कंपनी कर्मचाऱ्यांची कंपनीतच राहण्याची सोय करेल त्यांना कोणतीही अडचण नसेल. पण प्रवास करणाऱ्या प्रत्येकाला ओळखपत्र बाळगणं बंधनकारक असेल. तसेच कंपनीत कोणी कोरोना पॉझिटिव्ह आढळल्यास त्याच्या संपर्कातील कर्मचाऱ्यांच्या चाचण्या कंपनीला स्व-खर्चातून कराव्या लागणार आहेत. तसेच उद्योग बंद ही ठेवावा लागणार आहे. माहिती तंत्रज्ञान उद्योग अर्थात आयटी कंपन्या 15 टक्के क्षमतेने सुरू राहतील. इतर कर्मचाऱ्यांना वर्क फ्रॉम होमची मुभा देण्यात यावी. अशा सूचना देण्यात आल्यात.
औरंगाबाद संचारबंदी तिसरा दिवस, शहरात विनाकारण फिरणाऱ्या १९० वाहनधारकांवर कारवाई, कलम 188 अंतर्गत 25 गुन्ह्यांची नोंद
ठाणे-वाशी-ठाणे मार्गावर उद्यापासून अत्यावश्यक सेवेसाठी लोकलच्या दोन अतिरिक्त फेऱ्या
नागपुरात पुन्हा कडक लॉकडाऊनचे संकेत, नियम न पाळणाऱ्यांना आयुक्त तुकाराम मुंढेचा इशारा
पुण्याचे नवीन आयुक्त विक्रम कुमार यांनी आज शेखर गायकवाड यांच्याकडून महापालिकेची सुत्रं घेतली. तर शेखर गायकवाड साखर आयुक्तपदाचा पदभार स्वीकारणार आहेत. पदभार देताना अतिरीक्त आयुक्त रुबल अग्रवाल उपस्थित.
ऐश्वर्या रॉय बच्चन आणि आराध्या यांनाही कोरोनाची लागण, काल बिग बी अमिताभ आणि अभिषेक बच्चन यांचे रिपोर्ट आले होते पॉझिटिव्ह
सोलापुरात आकाड उत्सव साजरा करताना सोशल डिस्टंसिंगचा फज्जा. शितलादेवी मंदिरात आकाड उत्सवासाठी भाविकांची तुडुंब गर्दी. प्रशासनाने आधीच सार्वजनिक उत्सव साजरे न करण्याचे आदेश दिलेले असताना देखील गर्दी. एकीकडे कोरोनाची संख्या वाढत असताना दुसरीकडे प्रशासनच्या आदेशाची पायमल्ली.
चंद्रकांत पाटील यांनी ग्रामविकास विभागाबद्दल माध्यमांना चुकीची माहिती दिली. आज संध्याकाळपर्यंत माफी मागावी अन्यथा बदनामीचा दावा दाखल करणार. अपुऱ्या माहितीवर प्रतिक्रिया देऊन चंद्रकांत पाटील यांनी हसं करून घेतलं : हसन मुश्रीफ
'आमच्या पक्षाची काळजी वाटते... सगळे उमदे लोक सोडून गेल्यानंतर जाग येणार का?', राजस्थानमध्ये सचिन पायलट यांना गळाला लावण्याचे प्रयत्न सुरू आहेत त्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांचे ट्विट
राजभवनातील कोरोनाची लागण गांभीर्यानं घेतली पाहिजे, परीक्षा घ्या हा आग्रह चुकीचा असल्याचं नियतीनं दाखवून दिलं, राज्यपालांनी परीक्षेच्या निर्णयाचा पुनर्विचार करावा: खासदार संजय राऊत
कोणताही मुहुर्त काढा, आमचं सरकार पाच वर्ष चालणारच, काहींना जुगार खेळण्याचा छंद असतो, जुगार खेळत राहतात, हे मध्यप्रदेश नाही, महाराष्ट्र आहे :खासदार संजय राऊत
सोलापूर : सोलापुरात होणाऱ्या लॉकडाउनला कामगार नेते नरसय्या आडम यांचा विरोध,
कोरोनाची वाढती संख्या ही प्रशासकीय यंत्रणेचा अपयश असून लोकांना बेरोजगार करण्याचे षडयंत्र असल्याचा आरोप,
शहरात 3 लाख श्रमिक कामगार असून त्यांच्यावर उपासमारीची वेळ येईल ,
लॉकडाऊनचा निर्णय त्वरित मागे न घेतल्यास रस्त्यावर उतरण्याचा इशारा,
माजी आमदार नरसय्या आडम यांची 'माझा'ला प्रतिक्रिया
कोल्हापूरच्या तुरंबे याठिकाणी अतिक्रमणावरून जोरदार हाणामारी,
सरपंच यांच्या पतीसह सहा जण जखमी, दोन्ही बाजूने फिर्याद दाखल,
अतिक्रमण करू नका असा सांगण्यासाठी गेले असता शाब्दिक वाद झाला,
हा वाद इतका वाढला की थेट हाणामारी पर्यंत पोहचला
पंढरपूर : पत्नीच्या हत्येच्या गुन्ह्यात अटक असलेल्या आरोपीने उपजिल्हा रुग्णालयातून केले पलायन, आरोपीचं नाव शिवाजी नाथाजी भोसले, त्याला छातीमध्ये दुखत असल्याने दवाखान्यात आणलं होतं
पुणे आणि पिंपरी-चिंचवड शहरात 13 जुलैपासून लॉकडाऊन जाहीर करण्यात आलाय. याची अंमलबजावणीही कडेकोटपणे करण्यात येणार असल्याचे जिल्हा प्रशासनाने सांगितल्यानंतर नागरिकांची एकच धावपळ उडाली आहे. मागील दोन दिवसांपासून पुण्यात जीवनावश्यक वस्तूंच्या दुकानासमोर रांगा लागल्याचे चित्र आहे. हीच परिस्थिती आज सकाळपासून पुण्यातील भाजीपाला आणि फळांचे मार्केट असलेल्या मार्केट यार्ड मध्ये आहे. याठिकाणी नागरिकांची मोठ्या प्रमाणात गर्दी झाली आहे..
वसईतील प्रसिद्ध डॉक्टर आणि माजी नगरसेवक हेमंत पाटील यांचे आज कोरोनामुळं निधन झाले आहे. कोरोनाच्या प्रादूर्भावात सुरुवातीपासूनच डॉ हेमंत पाटील हे कोरोना बाधित रुग्णांच्या उपचारासाठी कार्यरत होते. वयाच्या 58 व्या वर्षी नालासोपा-यातील रिद्धीविनायक हॉस्पिटलमध्ये आज पहाटे त्यांचे उपचारा दरम्यान निधन झाले.
औरंगाबाद जिल्ह्यातील परीक्षण केलेल्या 873 स्वॅबपैकी 64 रुग्णांचे (31 पुरूष, 33 महिला) अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह आले. त्यामुळे आतापर्यंत कोरोनाबधितांची संख्या 8280 झाली आहे. त्यापैकी 4834 रुग्ण बरे झाले असून 350 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या 3096 जणांवर उपचार सुरु आहेत.
पुण्यात रात्रभरात 267 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 37681 तर आतापर्यंत 1036 कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 23591 वर
Corona Update | औरंगाबाद : कोरोनामुळे पोलीस कर्मचाऱ्याचा मृत्यू, 51 वर्षीय पोलीस कर्मचारी विजय पवार यांचा मृत्यू, विजय पवार यांची कोविड 19 टेस्ट काल आली होती पॉझिटिव्ह, खासगी रुग्णालयात सुरू होते उपचार
#Breaking सोलापुरात 16 जुलैच्या मध्यरात्रीपासून 26 जुलैपर्यंत कडक लॉकडाऊन, दूध, मेडिकल व्यतिरिक्त सर्व आस्थापना राहणार बंद, शहराला लागून असलेल्या काही गावांमध्ये देखील लागू करणार लॉकडाऊन, जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांची माहिती
धक्कादायक! मुंबईत कोरोनाबाबत सर्वात चांगली कामगिरी असणाऱ्या वांद्रे पूर्व-खार येथील एच इस्ट वॉर्डच्या कोरोनाबाधित वॉर्ड ऑफिसरचा मृत्यू
लॉकडाऊनच्या काळात पिंपरी चिंचवडमधील उद्योग सुरुच राहणार आहेत. पण आयटी कंपन्यांबाबत निर्णय होणं बाकी आहे. महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडून अशी माहिती प्राप्त झालीय. पण केवळ 33 टक्के कर्मचारी उपस्थित राहतील, त्यांना कंपनीत आणण्यासाठी वाहनांची सोय करण कंपनीस बंधनकारक करण्यात आलंय. चाकण आणि तळेगाव परिसरातील उद्योगांसाठी आधीचेच नियम कायम आहेत.
पिंपरी चिंचवडच्या लॉकडाऊनला वंचित बहुजन आघाडीचा विरोध. लॉकडाऊनचा निर्णय स्वातंत्र्यावर गदा आणणारा. वंचित बहुजन आघाडीने पत्रक काढून विरोध दर्शविला.
पाटीदार समाजाचा नेता हार्दिक पटेल गुजरात काँग्रेसच्या कार्यकारी अध्यक्षपदी. गेल्या काही दिवसांपासून गुजरातमध्ये सुरू असलेली काँग्रेसची पडझड थांबवण्यासाठी युवा नेतृत्वाला संधी.
मराठा आरक्षणा संदर्भात सुप्रीम कोर्टात कपिल सिब्बलही महाराष्ट्र सरकारची बाजू मांडणार. 15 जुलैच्या सुनावणी आधी आज महत्त्वाच्या नेत्यांसोबत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे चर्चा झाली. मराठा आरक्षण उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण, बाळासाहेब थोरात, एकनाथ शिंदे, दिलीप वळसे-पाटील या नेत्यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे सिब्बल यांच्यासोबत चर्चा केली.
LIVE UPDATE | पुणे महापालिकेचे आयुक्त शेखर गायकवाड यांची बदली, विक्रम कुमार पुणे महापालिकेचे नवे आयुक्त, शेखर गायकवाड यांच्याकडे पुन्हा एकदा साखर आयुक्तांचा पदभार
पुणे : सुट्टीनिमित्त फिरण्यासाठी आलेल्या बेजबाबदार नागरिकांच्या दुचाकी व चारचाकी वाहनांवर हवेली पोलिस स्टेशन व खडकवासला ग्रामपंचायतीच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणात कारवाई करण्यात आली. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाने खडकवासला, पानशेत, सिंहगड या भागात पर्यटनास बंदी असल्याने सिंहगड रोडवरील खडकवासला धरण चौकात तब्बल 300 दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करण्यात आली. या भागामध्ये कोरोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढत असल्याने नागरिकांनी विनाकारण फिरणे टाळावे असे आवाहन पोलिस निरीक्षक अशोक शेळके यांनी केली आहे.
पुणे-
पुण्यातील कोंढवा परिसरात सराईत गुंडाची निर्घृण हत्या, घनश्याम पडवळ या गुन्हेगाराची घरामध्येच धारदार हत्याराने वार करून निर्घृण हत्या
,
पडवळ हा सावकारी करत असून तो इतरांना व्याजाने पैसे देत होता, याच पैशातून वादातून हत्या झाल्याचा प्राथमिक अंदाज
,
नऊ तारखेपासून पडवळचा मोबाईल बंद होता, घरात एकटाच असताना पडवळची हत्या
,समर्थ पोलिस ठाण्यासह इतर पोलिस ठाण्यात जीवे मारण्याचा प्रयत्नसह इतर गुन्हे दाखल
,त्याचबरोबर पडवळचे दोन विवाह झाल्याची पोलिसांची माहिती
,या संदर्भात अजून कोणाला अटक नसून पोलीस घटनास्थळी दाखल
प्रतापगडाच्या बुरुजाजवळ एक भाग दरीत ढासळला. ध्वजबुरुजाजवळ बुरुजाच्या खालचा भाग दरीत ढासळला. बुरुजाचा संरक्षण कठडा अधाप सुरक्षित. वेळीच लक्ष दिले तर धोका टळणार. खालचा भाग ढासळल्याने कठडाही दरीत जाण्याची शक्यता.
सांगलीत काल झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हा उपाध्यक्ष खून प्रकरणाचा छडा; अवघ्या 24 तासात 5 जणांना स्थानिक गुन्हे अन्वेशन शाखेकडून अटक. भांडणाचा राग मनात धरून खून केल्याची संशयित आरोपींची कबुली. कुपवाड एमआयडीसी मध्ये शुक्रवारी झाली होती निर्घृण हत्या.
महाराष्ट्र शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागाच्या वतीने दररोज सकाळी दहा वाजता कोविड रुग्णांच्या संदर्भातला विश्लेषणात्मक अहवाल सादर केला जातो. गेल्या दोन महिन्याची तुलना केली तर महाराष्ट्रामध्ये कोविडच्या रुग्णांच्या मृत्यूचा दर हा चढा आहे. बरोबर एक महिन्यापूर्वी हा दर सुमारे 3.25 टक्के होता. आज 4.15 टक्के एवढा झाला आहे. देशाच्या तुलनेमध्ये हा दर जवळपास दीड पटीने अधिक आहे. महाराष्ट्राच्या शेजारी असलेल्या गुजरात राज्याचा दर तर देशाच्या सरासरीच्या तब्बल दुप्पट आहे. देशामध्येआजच्या तारखेपर्यंत आठ लाख 20 हजार 916 एकूण रुग्णांची संख्या आहे. त्यापैकी 22123 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हे प्रमाण 2.69 टक्के एवढा आहे. महाराष्ट्र मध्ये दोन लाख 38 हजार 461 एकूण रुग्ण आहेत. त्यापैकी नऊ हजार 893 रुग्णांचा मृत्यू झालाय. हे प्रमाण 4.1 पंधरा टक्के एवढे आहे. शेजारच्या गुजरात मध्ये 40 हजार 69 एकूण रुग्ण आहेत परंतु त्यापैकी दोन हजार बावीस रुग्णांचा मृत्यू झाला आहे. हा मृत्यु दर 5.05 टक्के एवढा आहे.
सोलापूर :
सोलापूरात नर्सिंगच्या विद्यार्थ्यांचे आंदोलन,
सर्व्हेक्षणच्या कामासाठी मानधन देण्याचे आश्वासन देण्यात आले होते मात्र त्याची पूर्तता नाही,
सर्व्हे करताना पीपीई किट तसेच अन्य सुरक्षा पुरवली जात नसल्याचा विद्यार्थ्यांचा आरोप,
विना परवानगी एकत्रित येत आंदोलन केल्याप्रकरणी 100-150 विद्यार्थीनी ताब्यात
पुण्यात रात्रभरात 220 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 36217 तर आतापर्यंत 1007 कोरोनाबाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 22180 वर
नाशिक शहरात संपूर्ण लॉकडाऊन नाही, पोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी फेटाळली , जिथे रुग्ण तिथे निर्बंध अधिक कठोर करणार, रुग्ण तिथे लॉकडाऊन एवढेच लॉकडाऊनचे स्वरूप राहणार, कंटेन्मेंट झोनवर लक्ष केंद्रित करणार, पुणे, पिंपरी चिंचवडमद्ये लॉकडाऊनची घोषणा झाल्यानंतर नशिकमध्ये लॉकडाऊन होणार अशी चर्चा होती मात्र नांगरे पाटलांनी शक्यता फेटाळली
वाढीव वीज बिलाच्या मुद्द्यावर आज नागपुरात भाजपने ठिकठिकाणी नगाडा, ढोल वाजवून आंदोलन केले.
भाजप शहर अध्यक्ष आणि आमदार प्रवीण दटके यांनी विणकारांचा परिसर मानल्या जाणाऱ्या गोळीबार चौकात नगाडा वाजवत आंदोलन केले.
छोट्या छोट्या घरामध्ये राहणाऱ्या सामान्य नागपूरकर आणि सामान्य विणकरांना 15 - 15 हजारांचे वीज बिल आले आहे.
ऊर्जा मंत्री नितीन राऊत यांनी दिल्लीच्या धर्तीवर 100 युनिट वीज बिल माफ करण्याचे जाहिर केले होते. मात्र, आता ते माघार घेत केंद्राने वीज बिल माफीसाठी अनुदान द्यावे असे म्हणत आहेत. ऊर्जा मंत्र्यांवर खोटारडेपणाचा आरोप करत हे आंदोलन करण्यात आले
चंदगड तालुक्यात अनेक ठिकाणी भात पेरणी झाली असून कोळपणीचे काम सुरु आहे.पाऊस चांगला झाल्यामुळे तालुक्यातील अनेक भागात शेतात चांगले पाणी साठले आहे.पाणी साठलेल्या शेतात भातरोप लावणी करण्यासाठी शेतकरी शेतात तयारी करत आहेत.कोरोनामुळे उद्योग व्यवसाय ठप्प झाल्यामुळे अनेक जण गावाकडे परतले आहेत.गावाकडे परतलेले उच्चविद्याविभूषित देखील आता शेतातील कामात सहभागी होताना तालुक्यात पाहायला मिळत आहे.शेतीची कामे सुरू झाल्यामुळे मजुरांचा तुटवडा जाणवत आहे.त्यामुळे शहरातून आलेला तरुण वर्ग शेतात राबणाऱ्या आपल्या कुटुंबाला मदत करत आहेत.
दोन महिन्यापूर्वी तुळजापूर मध्ये कोरोना विषाणूचा निवारण करण्यासाठी एका पुजाऱ्याने आपल्या घरामध्ये होम-हवन केले होते. त्याच्या बातम्या वर्तमानपत्रात प्रसिध्द झाल्या. त्यावरून पुण्याच्या एका सामाजिक कार्यकर्तीने पोलिसांत ॲानलाईन तक्रार दाखल केली होती. त्या तक्रारीवर दोन महिन्यानंतर घरात केलेल्या होमहवनामुळे करोनाचा संसर्ग पसरण्यास मदत केल्याचा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे
जळगाव जिल्हयातील कोरोनाच्या बाधितांची संख्या आज अखेर 5471 इतकी आहे यातील 315 जनांचा मृत्यू झाला आहे तर 3223 जण बरे होऊन परतले आहेत. यातील पहिल्या एक हजार बाधितांचा आकडा होण्यासाठी अडीच महिन्यांचा कालावधी सुरुवातीला लागला होता,मात्र नंतरच्या काळात कोरोनाचा झपाट्याने प्रसार झाल्याचं पाहायला मिळाले आहे, पुढच्या 4400 रुग्णांसाठी केवळ 33 दिवसांत ही वाढ झाल्याचे पाहायला मिळाले आहे. या मागील कारणांचा विचार केला तर तिसऱ्या लॉकडाऊननंतर अनेक विभागात शिथिलता देण्यात आली होती. त्याचा परिणाम म्हणून अनेक नागरिक कामधंद्या निमित्ताने बाहेर पडले होते,अनेक परप्रांतीय मजूर आणि पुण्या-मुंबई मधील तरुण जिल्ह्यात वळल्याने हा प्रसार झाल्याचे सांगण्यात येत आहे, दुसरीकडे कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाने आरोग्य सुरक्षा पंधरवडा राबवत मोठ्या प्रमाणावर नागरिकांच्या आरोग्य तपासणी सुरू केल्याने देखील अनेक रुग्ण हे समोर आल्याचं पाहायला मिळत आहे
कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी प्रशासनाच्या वतीने विविध उपाययोजना राबविल्या जात आहेत त्यात शहरी आणि ग्रामीण भागातील नागरिकांची घरोघरी जाऊन आरोग्य तपासणी आणि उपचार,कोमरबीड गटाकडे अधिक लक्ष,मास्क सिनिटायजर आणि सुरक्षा अंतर याची जनजागृती आणि कायदेशीर कारवाया करण्यात आल्या आहेत,यानंतर ही कोरोनाचा प्रसार वाढत असल्याच लक्षात येताच कोरोनाची साखळी तोडण्या साठी पुन्हा एकदा एक आठवड्या साठी लॉकडाऊन घोषित करण्यात आला असल्याच पाहायला मिळत आहे
हिंगोली जिल्ह्यात नवे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. तर एक रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतला आहे. जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण संख्या 328 वर पोहोचली आहे. तर आतापर्यंत 272 रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. सध्या 56 कोरोना बाधित रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
नाशिकमध्ये कोरोनाचा विळखा घट्ट, रात्रीतून 80 नव्या रुग्णांची भर, काल दिवसभरात 254 कोरोना बाधितांची नोंद तर 6 मृत्यू, जिल्ह्यातील रुग्णसंख्या 6559 व, आतापर्यंत कोरोनामुळे 312 मृत्यू, सध्या 2200 रुग्णांवर उपचार सुरू तर 4047 कोरोनामुक्त
बीड जिल्ह्यात आजपर्यंत एका दिवसात सर्वाधिक पॉझिटिव्ह रुग्ण, जिल्ह्यातून 292 जणांचे सॅम्पल तपासणीसाठी पाठवण्यात आले होते, त्यामध्ये 20 जणांचे अहवाल पॉझिटिव्ह, बीड शहरात आठ जणांचे अहवाल पॉझिटिव्ह असून परळी 4, गेवराई सहा आष्टी व धारूर प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण
हिंगोली : हिंगोली जिल्ह्यात रात्री उशिरा प्राप्त अहवालात आढळले नवे 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण,
तर एकाला मिळाला डिस्चार्ज,
जिल्ह्यात एकूण बाधित रुग्ण संख्या 328 वर
आजपर्यंत 272 जणांना डिस्चार्ज , तर सध्या कोविड रुग्णालयात 56 जणांवर उपचार सुरू
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेकठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लगतचे डोंगर भिंतीसारखे उभे कापण्यात आल्याने सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळयामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धामणदिवी गावाच्या हद्दीत सुमारे 75 मीटर्स अंतराच्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातील लाल मातीची दरड डोंगरावरील झाडांसह कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्रभर दरड हटविण्याचे काम महामार्ग रूंदीकरणाच्या वीर ते कातळीबंगला या कामाची ठेकेदार एलऍण्डटी या कंपनीने तीन जेसीबी प्रोकलेन आणि डंपर्सच्या साहयाने सुरू केले. मात्र, शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच पावसाचा जोर वाढून आणखी मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा दरडग्रस्त महामार्गावर पुन्हा कोसळला. परिणामी, दृष्टीपथात आलेले हे दरड हटविण्याचे काम पुन्हा तब्बल 16 तासांसाठी लांबणीवर गेले आणि सायंकाळी कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत् सुरू झाला.
रायगड : उरण तालुक्यातील कोप्रोली गावानजीक डोंगरात शिकारीला गेलेल्या चौघांना अटक, शेड्युल वन प्रकारातील लांडोर प्रजातीची केली शिकार, वन्यजीव कायद्यानुसार गुन्हा दाखल, उरण वनविभागाची कारवाई
सोलापुरात शिवसेनेचे पदाधिकारी विष्णू कारमपुरी आणि पोलीस याच्यामध्ये बाचाबाची झाल्याचा प्रकार समोर आला आहे. कामगार सेनेचे सरचिटणीस असलेल्या कारमपुरी यांना पोलिसांनी फरपटत नेलंय. सोलापुरातील पार्क चौक येथे नियम मोडणाऱ्या वाहनचालकांविरुद्ध कारवाई करण्यासाठी नाकाबंदी करण्यात आली होती. यामध्ये कारवाई करताना दुचाकीवर दोघे फिरत असल्याने कारमपुरी यांच्या मुलाला देखील पोलिसांनी कारवाईसाठी अडवलं होतं. त्यावेळी कारमपुरी हे त्याठिकाणी पोहोचले. यावेळी पोलीस कर्मचारी आणि विष्णू कारमपुरी यांच्यात शाब्दिक बाचाबाची झाली. घटनास्थळी उपस्थित असलेल्या एका पोलीस अधिकाऱ्याने त्यांचे कॉलर पकडून ओढत पोलीस गाडीकडे घेऊन जाण्याचा प्रयत्न केला. यावेळी कारमपुरी खाली देखील पडले. मात्र तसेच त्यांना पोलीस गाडीत घेऊन नेण्यात आलं. दरम्यान पोलिसांनी विष्णू कारामपुरी याना काही वेळ पोलीस ठाण्यात बसवून ठेवलं त्यानंतर शासकीय आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी कलम 188 प्रमाणे कारवाई करण्यात आली आहे. तर पोलिसांना विनंती केल्यानंतर ही त्यांनी धक्काबुक्की केली असून त्यांच्या विरोधात कायदेशीर तक्रार करणार असल्याची मत विष्णू कारमपुरी यांनी व्यक्त केले.
ठाण्यात लॉकडाऊनचा कालावधी 19 जुलैपर्यंत वाढवला. घरकाम करणाऱ्या महिलांना काम करण्याची मूभा
मुंबईत वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू. या बैठकीनंतर मुंबईतल्या शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे.
मुंबईत वर्षा बंगल्यावर राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यामध्ये बैठक सुरू. या बैठकीनंतर मुंबईतल्या शिवसेना आमदारांची बैठक होणार आहे.
कोरोना रुग्णांची नावे जाहीर करण्याची मागणी करत हायकोर्टात याचिका. 'राईट टू प्रायव्हसी' पेक्षा 'राईट टू लिव्ह' महत्त्वाचा, याचिकाकर्त्यांच दावा. नावं जाहीर झाल्यास बाधित व्यक्तीच्या संपर्कात आलेले वेळीच सावध होऊन साखळी तोडण्यास मदतच होईल. राज्य आणि केंद्र सरकारला भूमिका स्पष्ट करण्याचे निर्देश.
सोलापूर शहरात लॉकडाऊन होणार; उद्या दुपारी अंतिम निर्णय घेऊन नागरिकांना पाच दिवस अगोदर कळवलं जाणार. स्थानिक लोकप्रतिनिधी यांनी लॉकडाऊन करा, अशी मागणी आज बैठकीत केली. प्रशासकीय अधिकारी यावर प्लँनिंग करून निर्णय घेतील, पालकमंत्री दत्तात्रय भरणे यांची माहिती.
मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66 वर अनेकठिकाणी महामार्गाच्या रुंदीकरणादरम्यान लगतचे डोंगर भिंतीसारखे उभे कापण्यात आल्याने सुकेळी खिंडीपासून कशेडीघाट, रघुवीर घाट आणि अन्य सर्वत्र पावसाळयामध्ये भूस्खलन होऊन दरडी आणि मातीचे ढिगारे महामार्गावर कोसळून महामार्ग ठप्प होण्याचे प्रकार घडत असतात. गुरूवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास धामणदिवी गावाच्या हद्दीत सुमारे 75 मीटर्स अंतराच्या रस्त्यावर लगतच्या डोंगरातील लाल मातीची दरड डोंगरावरील झाडांसह कोसळल्याने वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली. रात्रभर दरड हटविण्याचे काम महामार्ग रूंदीकरणाच्या वीर ते कातळीबंगला या कामाची ठेकेदार एलऍण्डटी या कंपनीने तीन जेसीबी प्रोकलेन आणि डंपर्सच्या साहयाने सुरू केले. मात्र, शुक्रवारी सकाळी हे काम सुरू असतानाच पावसाचा जोर वाढून आणखी मोठया प्रमाणात मातीचा ढिगारा दरडग्रस्त महामार्गावर पुन्हा कोसळला. परिणामी, दृष्टीपथात आलेले हे दरड हटविण्याचे काम पुन्हा तब्बल 16 तासांसाठी लांबणीवर गेले आणि सायंकाळी कशेडी घाटातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग पुर्ववत सुरू झाला.
कोकणात जायला कोकणी माणसाला बंदी असं होऊ शकत नाही. असा आदेश निघालेला नाही. जर बंदीचा आदेश आला तर तीव्र आंदोलन करु, अशा इशारा भाजपचे नेते नारायण राणे यांनी दिला आहे.
ICSE बोर्डाने यावेळी टॉपर्सची यादी जाहीर केली नाही. तसंच निकाल जाहीर करण्यासाठी प्रत्यक्ष पत्रकार परिषद सोडाच व्हर्च्युअल प्रेस कॉन्फरन्स ही नाही घेतली.
पुण्यात आणि पिंपरी चिंचवडमध्ये पुन्हा लॉकडाऊन करण्याचा निर्णय, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या आदेशानंतर पुणे जिल्ह्यात 13 जुलैपासून लॉकडाऊन
खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील एकूण आठ जणांना कोरोनाची लागण.
खासदार कपिल पाटील यांच्यासह कुटुंबातील एकूण आठ जणांना कोरोनाची लागण.
सांगली -: कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षाचा निर्घृण खून, दत्तात्रय पाटोळे यांचा तीन हल्लेखोरांनी धारदार शस्त्राने हल्ला करून केला खून, मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये आज दुपारी ही घटना घडली. आर्थिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज वर्तवण्यात येत आहे. हल्लेखोर पसार झाले असून पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
सांगलीच्या कुपवाडमध्ये राष्ट्रवादीच्या शहर जिल्हा उपाध्यक्षाचा निर्घृण खून केल्याची घटना घडली आहे.
दत्तात्रय पाटोळे असं त्यांचं नाव असून तिघांनी धारदार शस्त्राने हल्ला करुन त्यांचा खून केला. मिरज औद्योगिक वसाहतीतील रोहिणी कोल्ड स्टोअरेजमध्ये आज दुपारी ही घटना घडली.
आर्थिक वादातून खून झाल्याचा प्राथमिक अंदाज, हल्लेखोर पसार
सर्व न्यायालयं आता व्हॉट्सअॅप-ईमेलच्या माध्यमातून नोटीस आणि समन पाठवू शकणार आहेत. व्हॉट्सअॅपवर ब्लू टिक दिसल्यास नोटीस मिळाल्याचं समजलं जाईल. एखाद्याने हे फीचर डिसएबल ठेवलं असेल तर सर्विस पूर्ण झाली की नाही हे कोर्ट ठरवणार, लॉकडाऊनमुळे धीम्या झालेल्या न्यायालयीन कामात वेग आणण्यासाठी सुप्रीम कोर्टाचा आदेश.
कोरोनाबाधित रुग्णांसाठी महत्त्वाच्या रेमडेसिविर या इंजेक्शनचा राज्यात तुटवडा निर्माण झाला आहे. रेमडेसिविर इंजेक्शनची चढ्या भावाने विक्री होत असल्याच्या तक्रारी आल्याने कॅबिनेट मंत्री डॉक्टर राजेंद्र शिंगणे यांनी मुंबईतील रुग्णालय तसेच मेडिकलमध्ये धाड टाकली. तसंच रुग्णालयात उपलब्ध असणाऱ्या रेमडेसिविर इंजेक्शनच्या साठ्याची पाहणी केली. रेमडेसिविर इंजेक्शन महाराष्ट्रात उपलब्ध व्हावी यासाठी राज्य सरकारचे प्रयत्न सुरु आहेत.
चंद्रपुर : ताडोबा व्याघ्र प्रकल्पातील मदनापूर आणि कोलारा गेट पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहेत. स्थानिक ग्रामपंचायतींची मागणी लक्षात घेता ताडोबा प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. पर्यटकांमुळे गावात कोरोना पसरु नये यासाठी स्थायिक गावकऱ्यांनी हे दोन गेट बंद करण्याची ही मागणी केली होती.
हिंगोली : कळमनुरी तालुक्यातील कसबे धावंडा येथील संजय कचरु खिल्लारे या 45 वर्षीय व्यक्तीने गावाच्या परिसरात निघालेल्या एका विषारी सापाला पकडण्याचा प्रयत्न केला, मात्र साप हा विषारी आणि सफल असल्याने सापाने संजय यांना चावा घेतला, त्यानंतर संजय यांना तात्काळ बाळापूर येथे प्राथमिक उपचार करून नांदेड येथे हलविण्यात आले आहे. सध्या नांदेड येथील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु आहेत.
पारनेरच्या नगरसेवकांची नाराजी संपण्याचं नाव घेत नाही. नगरसेवकांनी माजी आमदार विजय औटी यांच्या राजीनाम्याची मागणी केली आहे. औटी यांच्यामुळे पक्ष संपण्याची चिन्ह आहेत. असं पत्र नगरसेवकांनी उद्धव ठाकरे यांना दिलं आहे. तसेच औटी यांची पक्षातून हकालपटटी करून निष्ठावान शिवसैनिकाकडे पक्षाची धुरा सोपवावी अन्यथा तालुक्यात एकही शिवसैनिक शिल्लक राहणार नाही, असा इशाराही नगरसेवकांनी दिला आहे.
अकोल्यात आणखी 13 नवे रूग्ण आढळले. जिल्ह्यातील कोरोना रूग्णांचा एकूण आकडा 1841 वर पोहोचला आहे.जिल्ह्यातील कोरोना मृतांचा आकडा 91 वर पोहोचला असून 1369 रूग्ण आतापर्यंत कोरोनामुक्त झाले आहेत. सध्या 381 रूग्णांवर उपचार सुरु आहेत.
रत्नागिरी : पावसाचा जोर वाढल्याने पुन्हा त्याच ठिकाणी मोठा मातीचा ढिगारा दरडींसोबत कशेडी घाटात कोसळला. संध्याकाळ पर्यंत मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग वाहतुकीसाठी बंद राहणार. घाटातील ढिगारा हटवण्याचे काम युद्धपातळीवर सुरु आहे.
पुण्यात रात्रभरात 183 नवीन कोरोना रुग्णांची नोंद, पुण्यातील रुग्णांची संख्या 34582 वर तर आतापर्यंत 979 कोरोना बाधितांचा मृत्यू, एकूण डिस्चार्ज रुग्णांची संख्या 21411 वर
औरंगाबाद 160 रुग्णांचे अहवाल आज सकाळी पॉझिटिव्ह, त्यात 86 पुरूष, 74 महिला, आतापर्यंत एकूण 7832 कोरोनाबाधित, त्यापैकी 4162 बरे झाले, 338 जणांचा मृत्यू, तर 3332 जणांवर उपचार सुरु
सोलापूर येथील अहिल्या देवी होळकर विद्यापीठात क्वारंटाईन करण्यात आलेल्या नागरिकांना निकृष्ट दर्जाचे जेवण, मुळातच कोरोणाच्या धास्तीने पछाडलेल्या मुलांना कच्चा भात, उपमा दिले जात आहे. त्यामुळे लहान मुलांना पोटदुखीसारख्या त्रासाला सामोरे जावे लागत आहे. काल रात्रीच्या जेवणात अळ्या दिसून आल्याने अनेकांनी जेवण न करता तसेच ताट ठेवून दिले. चांगल्या दर्जाचे जेवण द्यावे अशी मागणी केली आहे.
गुन्हेगाराचा अंत झाला, गुन्हेगारी आणि गुन्हेगारांना सुरक्षा देणाऱ्या लोकांचं काय? विकास दुबेच्या एन्काऊंटनंतर प्रियांका गांधींचं ट्वीट
वसई-विरार : वसई-विरार नालासोपारा क्षेत्रात नागरिकांना एक मोठा दिलासा मिळाला आहे. कोरोनावर मात करणाऱ्या रुग्णांची संख्या वाढली आहे. मागच्या 5 दिवसात 1660 जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर 1063 कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांत झाली वाढ आहे. यातील 14 जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोनावर मात करणाऱ्यांची संख्या 4328 झाली आहे. तर उर्वरित 2554 जण कोरोनावर उपचार घेत आहेत. मागच्या 24 तासांत 211 कोरोना पाॅझिटीव्ह रुग्णांची वाढ झाली आहे. 321जणांनी कोरोनावर मात केली आहे. तर एकाच दिवसात 06 जणांचा मृत्यू झाला आहे. वसई विरार नालासोपारा क्षेत्रात आजपर्यंत कोरोना पाॅझिटीव्ह रुग्ण संख्या 7022 झाली यातील 140 कोरोबाधित रुग्णांचा मृत्य झाला आहे.
आज पासून 3 दिवस म्हणजे, 10 ते 12 जुलैपर्यंत राज्यातील सर्व कृषी सेवा केंद्रे बंद राहणार आहेत. बोगस बियाणांच्या विक्री संदर्भात कृषी केंद्र संचालकांवर दाखल होत असलेल्या गुन्ह्यांविरोधात हा बंद पुकारण्यात आला आहे. दुकानदारांचा आक्षेप आहे की, सर्टिफाइड बियाणे विकून देखील त्यांच्यावर गुन्हे दाखल होत आहेत. बियाणं विक्रीची मान्यता स्टेट सीड्स सर्टीफिकेशन एजन्सी देते. त्यामुळे विक्रेत्यांऐवजी उत्पादकांवर किंवा एजन्सीवर गुन्हा दाखल करा.
परभणी शहरासह जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील सेलु, पाथरी, पुर्णा या तिन मंडळात 60 मिमी एवढा पाऊस झाल्यानं अनेक गावातील शेती पाण्याखाली गेलीय सेलु तालुक्यातील रायपुर सह चिकलठाणा, निरवाडी, सावंगी, केमापूर, बोथ येथील सोयाबीन तसेच कापूस पीक पुर्णपणे पाण्याखाली गेले असल्याने शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शिवाय अनेक ठिकाणच्या नदी,नाल्याना ही पाणी आल्याने गावाला जोडणारे रस्ते बंद झाले आहेत.
परभणी शहरासह जिल्ह्यात रात्री मुसळधार पाऊस झालाय. जिल्ह्यातील सेलु, पाथरी, पुर्णा या तिन मंडळात 60 मिमी एवढा पाऊस झाल्यानं अनेक गावातील शेती पाण्याखाली गेलीय सेलु तालुक्यातील रायपुर सह चिकलठाणा, निरवाडी, सावंगी, केमापूर, बोथ येथील सोयाबीन तसेच कापूस पीक पुर्णपणे पाण्याखाली गेले असल्याने शेताला तळ्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे.शिवाय अनेक ठिकाणच्या नदी,नाल्याना ही पाणी आल्याने गावाला जोडणारे रस्ते बंद झाले आहेत.
रत्नागिरी : कशेडी घाटातील दरड उपसण्याचे काम अजूनही सुरु आहे. जेसीबी आणि पोकलेनने मातीचे ढिगारा उपसला जात आहे. आज दुपारपर्यंत मातीचा ढिगारा हटवण्याचे काम पूर्ण होईल, अशी माहिती तहसीलदारांनी दिली आहे. दरम्यान इथली वाहतूकही बंदच आहे.
कुख्यात गुंड विकास दुबेसोबतच्या चकमकीत एसटीएफचे दोन पोलीस जखमी झाल्याची माहिती
उस्मानाबादमधील अनाळा गाव आज बंद, पोलीस मारहाण प्रकरण, पोलिसांनी चुकीच्या पद्धतीने गावातील लोकांशी वर्तणूक केली व खोटे गुन्हे दाखल केल्याने निषेध म्हणून आज गाव बंद करण्याचा निर्णय गावकऱ्यांनी घेतला आहे
रत्नागिरी कशेडी घाटातील दरड उपसण्याचे काम अजूनही सुरु, एल अँड टीच्या जेसीबी आणि पोकलेनने मातीचे ढिगारे उपसण्याचे काम चालू, तहसीलदारांच्या माहितीनुसार आज दुपारपर्यंत मातीचा ढिगारा पूर्णपणे हटविण्याचे काम पूर्ण होईल
रायगडमधील रोहा तालुक्यातील कुंडलीका नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. इशारा पातळी 23 मीटर उंचीच्यावर गेली असून सध्या 23.40 मीटर उंचीने वाहत आहे. नदीकाठावर प्रशासनाकडून सुरक्षेची दखल घेतली जात आहे. याठिकाणी सुरक्षेच्या दृष्टीने पोलीस तैनात करण्यात आले आहेत.
हिंगोली : जिल्ह्यामध्ये औंढा तालुक्यातील काही भागांत मुसळधार पावसाने लावलेल्या हजेरीत परिसरातील ओढे नदी, नाले, दुथडी भरून वाहू लागले आहेत. त्याचबरोबर सोयाबीनच्या उभ्या पिकातही पावसाचे पाणी साचल्याचे बघायला मिळाले. तर जिल्ह्यातील इतरही भागात सकाळच्या सुमारास पावसाची रिपरिप बघायला मिळाली.
पोलीस एन्काऊंटरमध्ये कुख्यात गुंड विकास दुबे ठार
गुंड विकास दुबेसोबतची चकमक संपली, गंभीर अवस्थेत कानपूरच्या हॅलेट रुग्णालयात दाखल केलं.
विकास दुबेला कानपूरला घेऊन जात असताना एसटीएफच्या ताफ्यातील एक गाडी उलटली. याच गाडीत विकास दुबे होता. यानंतर विकास दुबेने पोलिसांची पिस्तुल हिसकावून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याचवेळी ही चकमक झाली.
नाशिक शहरासह जिल्ह्यात कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव, रात्रीत 104 संशयितांचे अहवाल पॉझिटिव्ह, नाशिक शहरात ८९, नाशिक ग्रामीणमध्ये १४ तर मालेगावात १ नवा रुग्ण, जिल्ह्यातील रुग्णसंख्या ६४०९ वर, मृतांचा आकडा तीनशे पार, आतापर्यंत ३०६ बळी, सध्या २२६७ बाधितांवर उपचार सुरु तर ३८३६ रुग्णांची कोरोनावर मात
पार्श्वभूमी
मुंबई : देशात कोरोनाबाधितांच्या संख्येने सोमवारी (13 जुलै) 9 लाखांचा आकडा पार केला. मागील 24 तासात देभशभरात 28 हजार 178 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. त्यानंतर एकूण रुग्णसंख्या 9 लाख 7 हजार 645 झाली आहे. यामध्ये सर्वाधिक महाराष्ट्रात (6,498) आणि तामिळनाडू (4328) वाढले आहेत. कर्नाटकमध्ये 2,738, आंध्र प्रदेशात 1,935, उत्तर प्रदेशात 1,654, तेलंगणामध्ये 1,550, पश्चिम बंगालमध्ये 1,435, आसाममध्ये 1,001, बिहारमध्ये 1,116 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. आतापर्यंत 5 लाख 69 हजार 753 रुग्ण कोरोनातून मुक्त झाले आहेत, तर सध्या 3 लाख 10 हजार 377 जणांवर उपचार सुरु आहेत. याशिवाय कोरोनामुळे आतापर्यंत 23 हजार 711 रुग्णांचा मृत्यू झाला आहे.
आयसीएसई (ICSE) आणि आयएससी (ISC) बोर्डानंतर केंद्रीय माध्यमिक शिक्षण बोर्ड म्हणजेच CBSE सीबीएसईच्या बारावी परीक्षेचा निकाल जाहीर झाला. त्यामुळे महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या इयत्ता दहावी आणि बारावीच्या निकालाचे वेध आता सर्वांनाच लागले आहेत. हा निकालही लवकरच लागणार असल्याची माहिती शालेय शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. बारावीचा निकाल 15 ते 20 जुलै तर दहावीचा निकाल 31 जुलैपर्यंत लागणार असल्याचं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं. त्यांनी एबीपी माझाशी संवाद साधला त्यावेळी त्या बोलत होत्या. लॉकडाऊनमुळे दहावीचा एक पेपर रद्द झाल्याने पेपर तपासणीची प्रक्रियादेखील लांबली होती. त्यामुळे यंदा दहावी आणि बारावी दोन्ही वर्गाचे निकाल लांबले आहेत.
महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांचा प्रवास केल्यानंतर आढळलेली वस्तुस्थिती आणि त्यावर करावयाच्या उपाययोजनांसंदर्भात माजी मुख्यमंत्री, विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधानपरिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवींण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना एक पत्र पाठविले आहे. यातील मुद्यांवर आपल्याला चर्चा करावी वाटल्यास आपल्याला प्रत्यक्ष भेटून या मुद्यांचे गांभीर्य आणि त्यावरील उपाययोजना इत्यादींबाबत प्रत्यक्ष माहिती देता येईल, असेही देवेंद्र फडणवीस यांनी या पत्रात म्हटले आहे. मुंबईतील केईएम, नायर आणि सेंट जॉर्ज रूग्णालय, पुणे आणि पिंपरी चिंचवड, सोलापूर, अमरावती आणि अकोला, नागपूर, एमएमआर क्षेत्रातील पनवेल, नवी मुंबई, उल्हासनगर, भिवंडी, कल्याण, ठाणे आणि मिरा भाईंदर तसेच नाशिक, मालेगाव, जळगाव आणि औरंगाबाद इत्यादी ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांनी दौरा केला होता.