Amit Shah : शंकरराव कोल्हे यांनी जे रोपटे लावले त्याचा मोठा वटवृक्ष झाला आहे. भारताच्या इतिहासात पहिल्यांदाच सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखान्यामध्ये CNG आणि पोटॅशची निर्मिती होणार आहे. विवेक आज तुम्ही जी सुरुवात केली ती देशातील सर्व कारखान्यांना रस्ता दाखविणारी वाटचाल असल्याचे मत अमित शाह यांनी व्यक्त केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार येत्या दिवसात 15 साखर कारखान्यांना NCDC मधून नवीन प्रकल्प उभारण्यात मदत करणार आहेत.
एक झाड धरती माता आणि एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा
सहकार संदर्भात जे प्रश्न उपस्थित केले जात होते ते आता दूर झाले असून सहकार क्षेत्र मजबूत झाले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितले आहे की, 140 कोटी जनतेने आणि व्यापाऱ्यांनी ठरवले आणि आपण विदेशी वस्तूचा वापर टाळला तर देशाची प्रगती होईल. देशाची अर्थव्यवस्था जगात एक नंबरला आणण्यासाठी स्वदेशीचा वापर केला जावा असे मत केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी व्यक्त केले. एक झाड धरती माता आणि एक झाड आपल्या आईच्या नावाने लावा यातून ग्लोबल वॉर्मिंग सारख्या समस्या दूर होतील असेही ते म्हणाले.
CNG आणि पोटॅश आयात बंद करुन आत्मनिर्भर भारतसाठी मोठे योगदान
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्या हस्ते आज कोपरगाव मधील सहकार महर्षी शंकरराव कोल्हे सहकारी साखर कारखानाच्या देशातील पहिल्या CNG अर्थात कॉम्प्रेस्ड बायोगॅस प्रकल्पाचे उद्घाटन झाले. दररोज या प्रकल्पाच्या माध्यमातून 12 टन CNG ची निर्मिती होणार आहे. या कार्यक्रमात अमित शाह बोलत होते. शंकरराव कोल्हे यांच्यासारखे विवेक कोल्हे यांचे नाव मोठे होईल असे अमित शाह म्हणाले. 55 कोटी रुपयांचा खर्च हा प्रकल्प उभारण्यासाठी लागला आहे. CNG आणि पोटॅश आयात बंद करुन आत्मनिर्भर भारतसाठी मोठे योगदान आहे. केवळ प्रकल्प उभारला नाही तर त्याच्या विक्रीसाठी मार्ग शोधला आहे. साखर कारखाना बनवायचा असेल तर अशा सर्व व्यवस्था करा असेही अमित शाह म्हणाले.
आता महाराष्ट्राची जबाबदारी आहे, साखर कारखान्याची चक्रीय अर्थव्यवस्था निर्माण करण्यासाठी त्याचा उपयोग करा. विवेक कोल्हे यांनी जे मॉडेल उभे केले तर सर्वाना दाखवण्यासाठी उपयोगी पडेल. हरित ऊर्जा आणि स्थिरत साठी महिला बचत गटांना उभे केले आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षणाची सोय संजीवनी ग्रुपने केली आहे असे अमित शाह म्हणाले.