मुंबई : मराठा (Maratha Reservation)  धनगर, ओबीसी आरक्षणाच्या (Obc Reservation)  प्रश्नावर थेट केंद्रीय गृहमंत्री अमित शाह  (Amit Shah) लक्ष घालण्याची शक्यता निर्माण झाली आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह लवकरच राज्यांतील महायुतीच्या नेत्यांची बैठक घेणार आहेत. यात राज्यातील राजकीय परिस्थितीचा आढावा घेतला जाणार आहे. राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भेटीत शाह यांनी सुतोवाच केल्याची माहिती सूत्रांनी दिलीय.


राष्ट्रवादीच्या अजित पवार गटाचे अध्यक्ष अजित पवार राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि महाराष्ट्राचे प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांच्या भेटीत शाह यांनी सुतोवाच केल्याची सूत्रांनी माहिती दिली आहे. मागील महिनाभरापासून राज्यात मराठा ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा विषय ऐरणीवर आहे.  यासोबतच लवकरच लोकसभा निवडणुका जाहीर होणारं आहे.  आगामी निवडणुका आणि राज्यांतील सध्य परिस्थिती याबाबत स्वतः गृहमंत्री आढावा घेणार असल्याची माहिती समोर येत आहे.


मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र


राज्यात मराठा, ओबीसी आणि धनगर आरक्षणाचा मुद्दा तीव्र झाला आहे. मनोज जरांगे यांनी मराठा आरक्षणावर आंदोलन सुरू केल्यानंतर राज्यात आंदोलनाचा वणवा पेटला होता. त्या दरम्यानच उपमुख्यमंत्री अजित पवार यांना डेंग्यूची लागण झाली असल्याची माहिती समोर आली. या आजारपणामुळे अजित पवार जवळपास 15 दिवस सार्वजनिक कार्यक्रमात दिसले नव्हते. त्यानंतर अजित पवार यांनी शरद पवारांची भेट घेतली. त्यानंतर आज अजित पवारांनी दिल्ली दौरा केला. गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. 


अजित पवारांनी घेतली अमित शाहांची भेट


अमित शाह यांच्या भेटीसोबत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे राष्ट्रीय कार्याध्यक्ष प्रफुल्ल पटेल, महाराष्ट्र अध्यक्ष सुनील तटकरे हे देखील सोबत होते. मागील काही दिवसांमध्ये राज्यात राजकीय घडामोडी सुरू आहेत. मराठा आरक्षण आंदोलन, ओबीसी आरक्षण आंदोलनाचा मुद्दा तापला आहे. राज्यात मराठा आरक्षणाच्या मुद्यावरून महायुतीच्या सरकारमध्ये एकवाक्यता नसल्याचे दिसून आले होते. त्यामुळे सरकारबद्दलची प्रतिमा चुकीची जात असल्याची चर्चा सुरू होती. त्याशिवाय, मराठा आरक्षणाच्या मुद्यावर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे एकटेच आंदोलनाला सामोरे जात असल्याचे चित्र होते. तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे निवडणूक प्रचारात होते. तर, अजित पवार हेदेखील आजारपणात होते.


हे ही वाचा :


Ajit Pawar : अजित पवारांची अमित शाह यांच्यासोबत बैठक संपली; आजारपणानंतरचा पहिला दिल्ली दौरा