छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगरच्या सभेत अमित शाहांनी (Amit Shah) उद्धव ठाकरेंवर (Uddhav Thackeray) जळजळीकत टीका केली आहे. ज्या पक्षांनी कलम 370 हटवण्यास विरोध केला, त्यांच्यासोबत सत्तास्थापन करताना उद्धव ठाकरेंना लाज नाही वाटली का, अशा शब्दांत शाहांनी ठाकरेंचा समाचार घेतला. अमित शाह हे मंगळवारी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर होते. दरम्यान, छत्रपती संभाजीनगरच्या (Chhatrapati Sambhaji Nagar) जाहीर सभेतून त्यांनी उद्धव ठाकरेंवर टीका केली आहे.
यावेळी बोलतांना अमित शाह म्हणाले की, “देशात राममंदिर बांधण्यासाठी विरोध करणाऱ्या, 370 कलम हटवण्यासाठी विरोध करणाऱ्या, आदिवासी महिला राष्ट्रपतीपदी विराजमान झाल्यानंतर द्रौपदी मुर्मू यांना विरोध करणाऱ्यांच्या बाजूने सत्तेत जाऊन बसणारे शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे वारस कसे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांच्यावर केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी हल्ला चढवला आहे.
इम्तियाज जलील यांच्यावर देखील टीका
छत्रपती संभाजीनगरमध्ये झालेल्या सभेत अमित शाह यांनी एमआयएमचे खासदार इम्तियाज जलील यांच्यावर देखील टीका केलीय. आपल्या छोट्या चुकीमुळे मजलीस इथे आले. इथून मजलिसला हटवून भाजपला निवडून देणार की त्यांना पुन्हा एकदा घरी बसून त्यांची जागा दाखवणार अशा शब्दात एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांच्यावर टीका शाह यांनी टीका केलीय.
शरद पवारांवर टीका...
गेली 50 वर्षं महाराष्ट्र शरद पवारांना सहन करतेय अशी बोचरी टीका अमित शाहांनी जळगावाच्या सभेत केली आहे. सोनिया गांधी गेली 20 वर्षं आपल्या मुलालाच लाँच करतायेत अशी जळजळीत टीका देखील शाहांनी केली.
आम्ही चर्चा करायला तयार आहो
महाराष्ट्रात आपण काय केलं याची चर्चा करायला आम्ही तयार आहोत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळा समोर आम्ही चर्चा करायला तयार आहो. 200 कोटी टीकाकरण करून 130 कोटीच्या लोकांना कोरोना पासून सुरक्षित करण्याचं मोदींनी केले. 370 कलमाला मुलाप्रमाणे घमंडी सरकारनं जपलं होतं, पण आमच्या सरकारने ते हटवले असल्याचे अमित शाह म्हणाले.
घराणेशाहीवरून टीका...
सोनिया गांधी यांना मुलाला पंतप्रधान करायचा आहे. शरद पवारांना आपल्या मुलीला मुख्यमंत्री करायचा आहे. उद्धव ठाकरे यांना त्यांच्या मुलाला मुख्यमंत्री करायचे आहे. ममता बनर्जी यांना आपल्या पुतण्याला मुख्यमंत्री करायचं आहे. जे आपल्या नातेवाईकांसाठी काम करत आहेत ते आपला भलं करू शकतात का? असा प्रश्न यावेळी अमित शाह यांनी विचारला.
इतर महत्वाच्या बातम्या :