Ambadas Danve:'तूप चाटून काय भूक जात नसते .अशा योजना बंद केल्याने राज्य स्थिर होईल असं वाटत नाही .आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज .राज्याला उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत .तुम्हीच योजना सुरू केल्या आता आम्ही योजना बंद होऊ देणार नाही .कॉन्ट्रॅक्टरचे खर्च कमी करा .त्यांच्यावर नियंत्रण लावा .तुमचे चरण्याच्या धंदे बंद करा' असं म्हणत विरोधी पक्षनेते अंबादास दानवे(Ambadas Danve) यांनी तिजोरीच्या खळखडाटावरून (financial burden) सरकारवर हल्लाबोल केलाय .

राज्य शासनाच्या तिजोरीत खडखडाट असल्याने अनेक योजनांना ब्रेक लागण्याची शक्यता असून एक लाख कोटी रुपयांची तूट भरून काढण्यासाठी शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधा या योजनांसह इतर काही योजना बंद करण्याच्या विचारात राज्य सरकार असल्याची माहिती आहे .लाडकी बहीण योजनेमुळे तिजोरीवर भार वाढला असून कंत्राटदारांची दैनिक थकल्याने हा निर्णय घेण्यात येणार असल्याची शक्यता आहे .यावरून राज्यभरात राजकीय वातावरण तापलंय .दरम्यान तिजोरीतील खडखडाट ,सोयाबीन खरेदी ,लाडकी बहीण जाहिरात या प्रकरणांवरून अंबादास दानवेंनी सरकारवर टीका केलीये. 

काय म्हणाले अंबादास दानवे ?

'तूप चाटून काय भूक जात नसते .अशा योजना बंद केल्याने राज्य स्थिर होईल असे वाटत नाही .आठ कोटी रुपयांचं कर्ज .तुम्हीच योजना सुरू केल्या आता आम्ही या योजना बंद होऊ देणार नाही .आठ लाख कोटी रुपयांचं कर्ज आहे .शिवभोजन थाळीमुळे दहा रुपयात गोरगरिबांना जेवण मिळतं .उद्धव ठाकरे यांनी ही योजना सुरू केली होती . राज्याला उत्पन्नाचे स्त्रोत शोधले पाहिजेत .कॉन्ट्रॅक्टरचे खर्च कमी करा .त्यांच्यावर नियंत्रण लावा .तुमचे चरण्याचे धंदे बंद करा हे सरकारला सांगणं आहे .असं अंबादास दानवे म्हणाले .गेल्या अनेक दिवसांपासून सोयाबीन खरेदी नीट होऊ शकलेली नाही .शेतकरी लाईन लावून बेजार आहेत .काही ठिकाणी बारदाना नव्हता तो गुजरातचा पाठवला होता .एकीकडे लाडक्या बहिणीचा निधी कट होणार तुमच्या जाहिरातींचा खर्च कमी करून त्या बहिणींना हा निधी दिला पाहिजे .जाहिरातींची तुम्हाला गरज काय ?नव्या लाडक्या बहिणींच्या नोंदी आहेत का ?असा सवालही दानवेंनी केला .

बीडच्या या गुंडागर्दी दादागिरी विरोधात जनता रस्त्यावर उतरली :अंबादास दानवे

धनंजय मुंडे यांच्यावर होणाऱ्या दोषारोपांवर कोर्टाचा जो निर्णय आहे त्याचीच अंमलबजावणी करावी असं म्हणत कृष्णा आंधळे समर्थक मारहाण प्रकरणी कालच मुख्यमंत्र्यांनी बीडचा दौरा केला .बीडच्या या गुंडागर्दी दादागिरी विरोधात जनता रस्त्यावर उतरली आहे .कशावरून हे दादागिरी करतील काही सांगता येत नाही .या प्रवृत्ती ठेचून काढल्या पाहिजेत असं दानवे म्हणाले .

हेही वाचा:

शिवभोजन थाळी, आनंदाचा शिधाला ब्रेक लागणार? लाडकी बहीणचा खर्च, तिजोरीतील खडखडाट, कंत्राटदारांची देणी यामुळं मोठा निर्णय?