बीड : शिवछत्र परिवार पाठीत मारण्याचं काम कधीही करणार नाही, असं म्हणत माजी आमदार अमरसिंह पंडित यांनी बजरंग सोनवणे यांना निवडणून आणण्याचे आवाहन केले. लोकसभा निवडणुकीचं तिकीट मिळालं नाही म्हणून नाराज असलेले अमरसिंह पंडित अखेर बजरंग सोनवणेंच्या प्रचारसभेत काल (रविवारी) सहभागी झाले होते.

यावेळी अमरसिंह पंडित म्हणाले की, ' इतरांनी आमची काळजी करण्याची गरज नाही. माझा भाऊ भावनेच्या भरात निश्चित बोलला असेल. जे झालं ते परवाच्या दिवशी पुरतंच होतं. बजरंग सोनवणे तुम्हाला आणि बसलेल्या तमाम जनतेला मी हा विश्वास देतो, शिवछत्र परिवार पाठीत मारण्याचे काम कधीही करणार नाही', असं अमरसिंह म्हणाले.

निवडणुकीत माझ्यासाठी जे करणार होतो, ते मी बजरंग सोनवणे यांच्यासाठी करेन. बजरंग सोनवणे यांच्या पाठीशी उभारून त्यांना निवडून आणण्याचे काम आपल्याला करायचे आहे. त्यामुळे सर्वांनी प्रचाराच्या कामाला लागावे, असे आवाहन देखील त्यांनी कार्यकर्त्यांना केले.

बीड लोकसभा मतदारसंघातून राष्ट्रवादीकडून अमरसिंह पंडित हे इच्छुक होते. त्यांना उमेदवारी मिळेल हे जवळपास निश्चित मानलं जात होतं. मात्र आयत्यावेळी बीड राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आणि जि.प सदस्य बजरंग सोनवणे यांना उमेदवारी देण्यात आली. सोनवणे यांना धनंजय मुंडे

त्यामुळे अमरसिंह पंडित यांच्या समर्थकांमध्ये नाराजी होती. अमरसिंह पंडित यांचे बंधू विजयसिंह पंडित यांनी सोशल मीडियावर आपली नाराजी व्यक्त केली होती. पंडित यांचे समर्थक नाराज झाल्यामुळे विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांना गेवराईमध्ये होणारी बैठक रद्द करावी लागली होती. मात्र पक्षाला पंडित यांची नाराजी दूर करण्यामध्ये यश आले आहे.

बजरंग सोनवणेंना उमेदवारी दिल्याने अमरसिंह पंडित समर्थकांमध्ये रोष, गेवराईत होणारी बैठक रद्द