एबीपी माझा व्हॉट्सअॅप बुलेटिन | 17 मार्च 2019 | रविवार

  1. जालन्याच्या जागेचा तिढा अखेर सुटला, मुख्यमंत्र्याच्या मध्यस्थीनंतर अर्जुन खोतकरांनी माघार घेतल्याने रावसाहेब दानवेंचा मार्ग मोकळा, युतीचा धर्म पाळण्यासाठी माघार घेतल्याचं खोतकरांचं स्पष्टीकरण 


 

  1. भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची मध्यरात्री 2 वाजेपर्यंत सलग आठ तास बैठक, आज पहिली यादी जाहीर होण्याची शक्यता https://goo.gl/X3EdpE


 

  1. लोकसभा निवडणूक लढवणार नाही, मनसेकडून पत्रक जारी, माघार घेतल्यानंतर मनसे कुणाला पाठिंबा देणार याकडे सर्वांचं लक्ष


 

  1. औरंगाबादसह नाशिकमध्ये शिवसेना-भाजप युतीचा मेळावा, रामदास आठवले आणि महादेव जानकरांना मात्र बोलावणं नाही, फक्त सेना-भाजपचे नेत्यांच्या सहभागामुळे चौथ्या आघाडीच्या चर्चांना उधाण  


 

  1. ज्यांनी मोठं केलं त्यांच्याशी कधीच गद्दारी केली नाही, आढळरावांना मदत केल्याच्या चर्चा दिलीप वळसे पाटलांनी पहिल्यांदाच जाहीररित्या नाकारल्या


 

  1. अमरावतीमध्ये रवी राणा यांचा युवा स्वाभिमानी पक्ष काँग्रेस-राष्ट्रवादीच्या आघाडीसोबत, अमरावतीच्या जागेवर नवनीत राणा लढणार


 

  1. पुलवामा हल्ल्यानंतर पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त करण्याचा सल्ला मीच दिला, पुण्यातील चाकणमध्ये शरद पवारांचा दावा, एअर स्ट्राईकवरुन पुन्हा राजकारण तापण्याची शक्यता 


 

  1. यूपीमध्ये महाआघाडीच्या वाराणसी जागेचा पेच सुटता सुटेना, पंतप्रधान मोदींविरोधात लोकसभा लढण्यासाठी समाजवादी पक्षाचे नेते सुरेंद्र पटेल यांचं नाव चर्चेत


 

  1. गोव्यात मुख्यमंत्री पर्रिकरांची तब्येत चिंताजनक असल्याची चर्चा, राजकीय घडामोडींना वेग, सत्तास्थापनेच्या दाव्यानंतर काँग्रेसचेच 4 आमदार भाजपच्या वाटेवर असल्याचा गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष विनय तेंडुलकरांचा दावा, काँग्रेसला खिंडार पडण्याची शक्यता


 

10.               https://goo.gl/CPb5meभाजपची टीम 'चौकीदार' सज्ज, पंतप्रधान नरेंद्र मोदींसह भाजप नेत्यांनी ट्विटर अकाऊंटचं नाव बदललं, काँग्रेसच्या चौकीदार चोर है ला प्रत्युत्तरादाखल नावापुढे चौकीदारचा उल्लेख

*यूट्यूब चॅनेल* - https://www.youtube.com/abpmajhatv

*इन्स्टाग्राम* - https://www.instagram.com/abpmajhatv

*फेसबुक* - https://www.facebook.com/abpmajha

*ट्विटर* - https://twitter.com/abpmajhatv

*व्हॉट्सअॅप* - https://abpmajha.abplive.in/whatsapp-widget.html

*मेसेंजर* m.me/abpmajha

*Android/iOS App ABPLIVE* -  https://goo.gl/enxBRK