अमरावती : रणवीर सिंगची भूमिका असलेल्या रिकी बेहल चित्रपटाबद्दल तुम्हाला माहित असेलच. असाच एक रिकी बेहल सध्या अमरावतीमध्ये फिरत आहे. अमरावतीमधला ऑटोचालक समीर खडसेनं महिलांना प्रेमाच्या जाळ्यात गुंतवून लाखोंची लुबाडणूक केली आहे.
रिक्षा चालवून आधी महिलांशी दोस्ती करायची, हळूहळू त्यांना आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवायचं, आणि पैसे मिळाले की फरार व्हायचं, हा या लफंग्याचा डाव असायचा. 'तो मला रिक्षाने सोडायचा. हळूहळू प्रेमसंबंध जुळले. घर द्यायचं आमिष दाखवलं आणि 8 लाख घेऊन पसार झाला', असा आरोप एका महिलेने केला आहे.
संबंधित महिलेच्या सांगण्यानुसार या चोरट्यानं आणखी 10-12 जणींनाही असाच गंडा घातला आहे. लाखोंचा गंडा घालून महिलांची फसवणूक करणाऱ्या या चोरट्याला अमरावती पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. तेव्हा तुम्ही कोणाशी मैत्री करता, जवळीक साधता, याचं भान ठेवा आणि अशा रिकी बेहलपासून जरा सांभाळून रहा.
प्रेमाच्या जाळ्यात अडकवून महिलांना गंडा, रिक्षाचालकाला बेड्या
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
07 Sep 2017 11:44 PM (IST)
तो मला रिक्षाने सोडायचा. हळूहळू प्रेमसंबंध जुळले. घर द्यायचं आमिष दाखवलं आणि 8 लाख घेऊन पसार झाला, असा आरोप एका महिलेने केला आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -