अकोला : अकोल्याच्या आरोग्य विभागातून सेवानिवृत्त झालेल्या अधिसेविकेकडे तब्बल पावणेतीन कोटींची बेहिशेबी मालमत्ता आढळून आली आहे. मीना माहुरे असं या अधिसेविकेचं नाव आहे.

काल संध्याकाळी एसीबीनं माहुरे यांचं घर, कार्यालय, तसंच अकोटच्या वॉटर प्लांटवर छापा टाकला. यावेळी तब्बल 2 कोटी 70 लाख 5 हजारांची बेहिशेबी मालमत्ता आढळून आलीय.

यातील माहित असलेल्या स्त्रोतांपेक्षा ही मालमत्ता 420 पट जास्त आहे. याप्रकरणी त्यांचे पती मनोहर आणि मुलगा स्वप्नील यांच्याविरोधातही गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

मीना यांनी अकोला येथील आरोग्य खात्यातील आपल्या २००२ ते २०१३ या सेवाकाळात ही मालमत्ता कमावल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, मेहुरे यांच्या बँक लाँकरची तपासणी व्हायची बाकी आहे. त्यामुळे त्यांच्या बेहिशेबी मालमत्तेचा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे.