अकोला : अकोला राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला पदाधिकारी भारती निम यांनी आज जिल्हा परिषदेत चांगलाच धुडगुस घातला. त्यांच्या शिक्षण संस्थेच्या वसतिगृहाला ना हरकत प्रमाणपत्र देण्यास उशीर झाल्यानं निम यांनी चक्क एका अधिकाऱ्याला मारहाण केली.

 
मनोज बोपटे असं मारहाण झालेल्या ग्रामविकास अधिकाऱ्याचं नाव आहे. भारती निम यांच्या संस्थेचा खरप येथे वसतिगृहाचा प्रस्ताव जिल्हा परिषदेत दाखल आहे. पण त्यात त्रुटी असल्यानं तो प्रस्ताव प्रलंबित आहे. त्यामुळे चिडलेल्या निम यांनी दुपारी जिल्हा परिषद गाठत अधिकाऱ्याला मारहाण केली.

 
या घटनेनंतर जिल्हा परिषदेतील कर्मचाऱ्यांनी निवेदन देत निषेध व्यक्त केला. याप्रकरणी भारती निम यांच्याविरोधात शहर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.