Akola Accident : अकोल्यात धक्कादायक घटना घडली आहे. अकोल्यात 407 वाहनाचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात दोन शेतमजूर जागीच ठार झाले आहेत तर 11 जण जखमी झाले आहेत. जखमींमध्ये सर्व शेतमजूर असून यातील चार मुलं गंभीर स्वरुपात जखमी झाली आहेत. वाहन चालकाचं नियंत्रण सुटल्याने 407 वाहन पलटी झालं आहे. अकोला जिल्ह्यातील अकोला दर्यापूर रस्त्यावर ही घटना घडली आहे. सर्व जखमींना तातडीने अकोल्याच्या शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे. 

Continues below advertisement

कापूस वेचणी केल्यानंतर सर्व शेतमजूर दर्यापूरकडे परतीच्या प्रवासात असतानाच अपघात

अकोल्यातून कापूस वेचणी केल्यानंतर सर्व शेतमजूर दर्यापूरकडे परतीच्या प्रवासात असतानाच हा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका महिलेचा आणि पुरुषाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मून्नीबाई जांभेकर आणि मनिष कासदेकर असं अपघातात मृत व्यक्तींचे नावे. तर चार जण गंभीर जखमी असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

नागपूरमध्ये ब्रेक फेल झाल्याने शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये शिरली एसटी बस 

कान्होलीबारा येथून नागपूर शहराकडे भरधाव जाणारी राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या एसटी बसचे  ब्रेक फेल झाल्याने चालकाचे  नियंत्रण सुटले. त्यामुळं हिंगणा शिवाजी चौकातील शॉपिंग कॉम्प्लेक्समध्ये एसटी बस शिरल्याची घटना घडली. या अपघातात सुदैवाने जीवित हानी झाली नाही. हा विचित्र अपघात सायंकाळी साडेसहा वाजण्याच्या सुमारास घडला आहे. 

Continues below advertisement

बिबट्याच्या हल्यात चार वर्षीय मुलाचा मृत्यू...

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग गावात सायंकाळी साडेसहा वाजेच्या सुमारास बिबट्याने एका चारवर्षीय चिमुकल्याचा बळी घेतल्याची धक्कादायक घटना घडली आहे. यामुळे चिमुकल्याचे नातेवाईक व ग्रामस्थ संतप्त झाले असून जोपर्यंत नरभक्षक बिबट्याला ठार केले जात नाही तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नसल्याचा पवित्रा घेतल्याने वातावरण तणावपूर्ण बनले आहे.

संगमनेर तालुक्यातील जवळे कडलग येथील चिखली रस्त्यालगत शेतकरी सूरज दिलीप कडलग यांची वस्ती आहे. आज सायंकाळी ते गोठ्यातील जनावरांना चारा टाकत होते. तर आजी गवताचे ओझे घेऊन गोठ्यात गेली होती. त्याचवेळी चार वर्षीय चिमुकला सिद्धेश सूरज कडलग हा घराच्या दारात उभा होता. हिच संधी साधत गिन्नी गवतात दबा धरुन बसलेल्या बिबट्याने सिद्धेशला जागेवरच ठार केले. यानंतर त्याच्या वडिलांसह आजीने एकच आक्रोश केला.

महत्वाच्या बातम्या:

सप्तशृंग गडावर निघालेल्या भाविकांवर काळाचा घाला, कारचा भीषण अपघात, सहा जणांचा जागीच मृत्यू