Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan LIVE : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, पाहा प्रत्येक अपडेट
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरु झालंय. सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. संमेलनाचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर
राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार साहित्य संमेलन स्थळी पोहोचत आहेत
परिसंवाद : शेतकऱ्यांची दु:स्थिती, आंदोलने, राजसत्तेचा निर्दयपणा लेखक, कलावंतांचे मौन आणि सेलिब्रिटींची भूमिका!
अध्यक्ष : भास्कर चंदनशिव. सहभाग : ना. बच्चू कडू, रमेश जाधव, संजय आवटे, शेषराव मोहिते, श्रीमंत माने, निशिकांत भालेराव, विलास शिंदे, शैलेंद्र तनपुरे.
सूत्रसंचालन : हेमंत टकले
देवेंद्र फडणवीस साहित्य संमेलनात जाणार नाहीत, ट्वीट करत सांगितलं कारण
कुसुमाग्रजनगरीतील कवी गोविंद मंचावर माहिती जनसंपर्क संचनालनालयाचे महासंचालक डॉ. दिलीप पांढरपट्टे यांच्या हस्ते गझलकट्ट्याचे झाले उद्घाटन.. प्रमुख पाहुणे म्हणून नाशिक लाचलूचपत प्रतिबंधक विभागाचे अधीक्षक सुनिल कडासने उपस्थित.
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई, छगन भुजबळ यांच्यासह साहित्यिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले, पत्रपेटीत पत्र टाकले
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळावा यासाठी सुभाष देसाई, छगन भुजबळ यांच्यासह साहित्यिकांनी राष्ट्रपतींना पत्र पाठवले, पत्रपेटीत पत्र टाकले
सुभाष देसाई आणि स्वागत अध्यक्ष छगन भुजबळ, कौटिकराव ठाले पाटील यांच्या उपस्थितीत अभिजात मराठी दालनाचे उद्घाटन, कौतिक ठाले पाटील आणि छगन भुजबळ यांच्या हस्ते पार पडले ध्वजारोहण
थोड्याच वेळात साहित्य महामंडळाचे अध्यक्ष कौतिकराव ठाले पाटील यांच्या हस्ते संमेलनस्थळी भुजबळ नॉलेज सिटीच्या मुख्य क्रांतीज्योती सावित्रीबाई, महात्मा फुले प्रवेशद्वाराजवळ ध्वजारोहण सोहळा रंगणार..
ग्रंथदिंडी कुसुमाग्रज निवासस्थान पासून निघून पुढे महापौर बंगला, जूने सीबीएस सिग्नल, डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा, परशुराम सायखेडकर नाट्यगृह वरून सार्वजनिक वाचनालयापर्यंत मार्गस्थ होणार आहे
पालकमंत्री छगन भुजबळ कुसुमाग्रज निवासस्थानी, कुसुमाग्रज जिथे लिखाण करत होते त्या रूममध्ये बसेल, कुसुमाग्रज यांच्या आठवणींना उजाळा
कुसुमाग्रजांचा निवासस्थान कुसुमाग्रज प्रतिष्ठान पासून ग्रंथ दिंडीला सुरुवात होणार, कुसुमाग्रज प्रतिष्ठान, महापौर निवासस्थान रामायण बंगला, टिळकवाडी सिग्नल, सीबीएस चौक- आंबेडकर पुतळा, शिवाजीरोड मार्गे नेहरू गार्डन, आणि सार्वजनिक वाचनालय इथे दिंडीचा समारोप, दिंडीत शाळकरी मुलं, ढोल पथक, वारकरी सहभागी, दिंडी, मार्गावर रांगोळ्या काढून पालखीचे स्वागत,स्वागताध्यक्ष छगन भुजबळ, कृषी मंत्री दादा भुसे, विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवाळ यांच्या सह साहित्य रसिक, कुसुमाग्रज प्रतिष्ठान,लोकहितवादी मंडळांचे पदाधिकारी उपस्थित
अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला राज्याच्या कानाकोपऱ्यातून साहित्य रसिक, साहित्यिक, कलाकार दाखल झालेत. सोलापूरचे कलाकार संत गाडगे महाराजांचा वेश परिधान करून कुसुमाग्रज प्रतिष्ठानच्या बाहेर साफसफाई करत आहेत.
नाशिकच्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाचे नियोजित अध्यक्ष डॉक्टर जयंत नारळीकर संमेलनाला जाणार नाहीत. प्रकृतीच्या कारणास्तव जयंत नारळीकर संमेलनाला जाणार नसल्याच सांगण्यात आलंय. संमेलनाच्या आयोजकांकडून नारळीकर संमेलनाला यावेत यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न करण्यात आले. पण नारळीकरांच्या कुटुंबीयांनी नारळीकरांचेही प्रकृती आणि आताचे वातावरण या पार्श्वभूमीवर संमेलनाला न जाण्याचा निर्णय घेतलाय .
आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासमोर अनेक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट यामुळं अनेक विघ्नं या संमेलनाच्या वाटेत आली.
पार्श्वभूमी
Akhil Bhartiy Marathi Sahitya Sammelan नाशिक : आजपासून अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाला नाशिकमध्ये सुरुवात होत आहे. साहित्यिकांसह साहित्य रसिकांच्या उपस्थितीत सारस्वतांचा मेळा तीन दिवस भरणार आहे. अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनासमोर अनेक संकटं कमी होण्याचे नाव घेत नाहीत. आधी वेगवेगळे वाद मग कोरोनाचं संकट, कोरोनामुळं बदललेल्या तारखा आणि नंतर नवीन ओमिक्रॉन व्हेरियंट यामुळं अनेक विघ्नं या संमेलनाच्या वाटेत आली.
साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची वाट वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबत (Akhil Bhartiy Marathi Sahitya sammelan) देखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, नाशिकमध्ये वास्तव्यास असणाऱ्या केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.
महाविकास आघाडीच्या नेत्यांना स्थान- भाजपचा आरोप
भाजप नेत्यांनी आरोप लावत म्हटलं होतं की, साहित्य संमेलन एकतर्फी होत आहे. संमेलनात केवळ राष्ट्रवादी काँग्रेस, शिवसेनाच्या नेत्यांना स्थान देण्यात आले आहे. भाजपच्या नेत्यांना निमंत्रण न देता जाणुन बुजून डावलण्यात आल्याचा गंभीर आरोप महापौरांनी केला. भाजपच्या तिन्ही आमदारांनी 10/10 लाखांचा निधी दिला,महापालिकाने 25 लाख निधी देऊनही भाजपच्या नेत्यांना स्थान नसल्याने आयोजकांचे चांगलेच कान टोचले होते. साहित्य संमेलनात साहित्यिकांचा सन्मान राखला जावा. संमेलन सर्व समावेशक असावे एकतर्फी असू नये, असं त्यांनी म्हटलं. ग्रंथ दिंडी नशिकमध्ये निघणार असल्याने केवळ ग्रंथ दिंडीला उपस्थित राहणार असल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. या आधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला आहे.
संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट
94 वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन 3, 4 आणि 5 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये होणार आहे. कोरोनामुळे साहित्य संमेलनाचा मार्च आणि नोव्हेंबर महिन्याचा मुहूर्त हुकला होता. आता डिसेंबर महिन्यात होणाऱ्या 94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरिएंटचे सावट आलेलं पाहायला मिळत आहे. त्यामुळे साहित्य संमेलनाच्या आयोजकांना विशेष काळजी घ्यावी लागणार आहे.
आता अवकाळी पावसाचे संकट
वादावर कसेबसे मार्ग काढत संमेलन अंतिम टप्पात आले आणि काल सकाळपासूनच नाशिकमध्ये अवकाळी पावसाच्या सरी कोसळू लागल्या. यामुळं साहित्य संमेलनाच्या मुख्य सभा मंडपात पावसाचे पाणी साचलंय, त्यामुळे ठिकठिकाणी चिखल झाला आहे. पावसाने जोर धरल्याने कवी कट्टा आणि बालकाव्य हे दोन कार्यक्रम खुल्या जागेतून सभागृहात घेतले जाणार आहेत. पुढील दोन तीन दिवस पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळं साहित्यिकांसह रसिकांचीही मोठी गैरसोय होणार असून उपस्थितीवरही परिणाम होण्याची शक्यता आहे.
94 व्या साहित्य संमेलनादरम्यान पाळावे लागणार 'हे' नियम
संमेलनात सहभागी होणाऱ्यांना मास्क घालणे बंधनकारक राहणार आहे. तसेच तापमान चेक केल्यानंतच साहित्य संमेलनात प्रवेश दिला जाणार आहे. ओमिक्रॉनच्या पार्श्वभूमीवर संमेलनात एकूण आसन क्षमतेच्या 50 टक्के उपस्थिती ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.
संमेलनासंबंधी या बातम्याही नक्की वाचा
साहित्य संमेलन पुन्हा वादात! संमेलनात महाविकास आघाडीच्या नेत्यांनाच स्थान, भाजपची तीव्र नाराजी
94 व्या साहित्य संमेलनावर कोरोनाच्या नव्या व्हेरियंटचे सावट
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -