Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan LIVE Updates : साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी उपस्थित राहणार

Sahitya Sammelan LIVE Updates : वर्ध्यातील 96 व्या  अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा (Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan ) आज शेवटचा दिवस आहे. आज विविध विषयांवर परिसंवाद होणार आहे.

abp majha web team Last Updated: 05 Feb 2023 12:28 PM

पार्श्वभूमी

Sahitya Sammelan LIVE Updates : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचा आज शेवटचा दिवस आहे. आज समारोपीय कार्यक्रम होणार आहे. संध्याकाळी चार वाजताच्या सुमारास होणाऱ्या समारोपीय कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी...More

साहित्य संमेलनात उपमुख्यमंत्र्यांची उपस्थिती, मात्र संमेलन अध्यक्ष नरेंद्र चपळगावकर ग्रंथ दालनात

Sahitya Sammelan : अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात एकीकडे उपमुख्यमंत्री यांच्या उपस्थितीत कार्यक्रम  सुरू आहे. मात्र तिथे संमेलन अध्यक्ष नाहीत. संमेलन अध्यक्ष न्यायमूर्ती नरेंद्र चपळगावकर ग्रंथ दालनात पुस्तकात रमले आहेत. संमेलनात येताना सुरक्षेचा फटका बसल्याने अध्यक्ष ग्रंथ दालनात पोहोचले आहेत. तर त्यांची कन्या भक्ती चपळगावकर यांनी मात्र सुरक्षा व्यवस्थेमुळं  चपळगावकर सभामंडपात पोहोचले नसल्याचे पोस्ट फेसबुक केली आहे. या ट्विटमुळे चर्चा सुरू झाली आहे. भक्ती चपळगावकर यांनी मात्र एक मुलगी म्हणून आपल्या वाडीलांविषयी जे वाटलं ते पोस्टमधून मांडल्याचे सांगितले आहे. बऱ्याचदा पोलीस त्यांना कुठे जाऊ देत नव्हते, अखेर पोलिसांना विनंती करण्यात आली.