Girish Kuber : ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक; घडामोडींचे प्रत्येक अपडेट एका क्लिकवर...

Akhil Bharatiya Marathi Sahitya Sammelan LIVE Updates : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली.

abp majha web team Last Updated: 05 Dec 2021 03:13 PM
शाईफेक करणे हे निंदनीय आहे - देवेंद्र फडणवीस

शाईफेक करणे हे निंदनीय आहे. अशा प्रकारे साहित्य संमेलनात शाईफेक करणे चुकिचे. साहित्य संमेलन हे अभिव्यक्तीच केंद्र असते. तुम्हाला जर अभिव्यक्ती करायची असेल तर दुसरे व्यासपीठ तयार करू शकता. हे निंदनीय कृत्य आहे, असे देवेंद्र फडणवीस म्हणाले. 

पुण्यातून आलेल्या दोघांनी शाईफेक केली - छगन भुजबळ

- गिरीश कुबेर यांनी गोल्फकार्ट मधून संमेलन स्थळ पाहणी केली
- सकाळपासून कुणकुण होती, संभाजी ब्रिगेड काहीतरी कॉन्ट्रोव्हर्सि आहे
- मी आणी माझा मुलगा पंकज भुजबळ स्वतः कुबेर यांना घेऊन फिरलो
- पुण्यातुन 2 जण मोटरसायकल वर आले होते
- काळी पावडर त्यांनी कुबेर यांच्या अंगावर फेकली
- व्यासपीठाजवळील प्रवेशद्वाराजवळ वाहन स्लो झालं आणी त्या दोघांनी काळी पावडर फेकली
- पंकज भुजबळ यानं अडवण्याचा प्रयत्न केला
- सुरक्षा व्यवस्था अधिक वाढवली आहे
- संभाजी ब्रिगेड आपली नाराजी निवेदन देऊन व्यक्त करतील असं मला वाटलं होतं

गिरीश कुबेरांवर शाईफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा मी निषेध करतोय : जतीन देसाई

गिरीश कुबेरांवर शाईफेक करणाऱ्या संभाजी ब्रिगेडचा मी निषेध करत आहे. लेखक, पत्रकार किंवा इतर कोणावरही शाईफेक करण लोकशाही विरोधी आहे. कुबेरांवर करण्यात आलेली शाईफेक अभिव्यक्ती स्वातंत्र्यावर हल्ला आहे, अशी प्रतिक्रिया ज्येष्ठ पत्रकार जतीन देसाई यांनी दिली आहे. 

या सर्व घटनेचा मी निषेध करतो : संजय राऊत

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. शिवसेना खासदार संजय राऊत म्हणाले की, "या सर्व घटनेचा मी निषेध करतो. गिरीश कुबेर जेष्ठ पत्रकार, संपादक आहेत. लोकसत्ता सारख्या वर्तमानपत्राचे ते संपादक आहेत. त्यांनी काही लिखान केलं असेल किंवा करत आहेत, त्याबाबत मतभेद असू शकतात. गेल्या काही काळात हा वाद झाला होता. तो मी वाचलाय. मुळात त्यांनी काय लिहिलंय? हे किती लोकांनी वाचलंय? न वाचता त्यांच्यावर अशाप्रकारे शाईफेक करणं, तेही मराठी साहित्य संमेलन सुरु असताना.  साहित्य संमेलनाच्या व्यासपीठावर अशाप्रकारंच कृत्य करणं हे कुणालाही मान्य होणार नाही. त्यांनी पुस्तकात जे काही लिहिलंय त्याबाबत लोकांनी गुन्हे दाखल केले आहेत. त्यासंदर्भात कायदेशीर कारवाई होईल. पण साहित्य संमेलन अभिव्यक्ती स्वातंत्र्याचं सर्वात मोठं व्यासपीठ असते. तिकडे येऊन तुम्ही शाईफेक करताय, त्यांना धक्काबुक्की करताय. सावरकर, कुसमाग्रज यांच्या भूमित असं करुन तुम्ही छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेला तुम्ही डागाळलेय, असे संजय राऊत म्हणाले. ज्यांना कुबेरांचं लिखान पसंत नाही, त्यांनी त्यांच्यासोबत चर्चा करावी, पुरावे द्यावे. पण अशाप्रकारे शाईफेक करणं चुकीचं आहे, असंही राऊत म्हणाले.

Nashik Girish Kuber : जेष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक ABP Majha

Girish Kuber : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पवारांचं स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती.

पाहा व्हिडीओ : पुस्तकाचं नाव माहित नसतानाही संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक ABP Majha

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

पाहा व्हिडीओ : Girish Kuber : साहित्य संमेलनात गिरीश कुबेर यांच्यावर संभाजी ब्रिगेडकडून शाईफेक ABP Majha

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे.

नाशिकमधील साहित्य संमेलनाचे प्रत्येक अपडेट युट्यूब लाईव्हवर

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

नाशिकमधील साहित्य संमेलनाचे प्रत्येक अपडेट युट्यूब लाईव्हवर

नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडचे नाशिक जिल्हा सचिव नितीन रोटे पाटील यांनी म्हटले. दरम्यान, गिरीश कुबेर यांच्यावर झालेल्या हल्ल्याचा विविध स्तरातून निषेध व्यक्त करण्यात येत आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक

सविस्तर वाचण्यासाठी येथे क्लिक करा

वाद आणि नाशिकचं साहित्य संमेलन

साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची प्रतीक्षा वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतदेखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.मात्र फडणवीस यांनी संमेलनास येण्यास नकार दिला. त्याआधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला.

पार्श्वभूमी

Girish Kuber : नाशिक येथील अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनात ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. संभाजी ब्रिगेड यांच्या कार्यकर्त्यांनी याची जबाबदारी घेतली आहे. गिरीश कुबेर यांनी लिहिलेल्या पुस्तकात छत्रपती संभाजी महाराज यांच्याबद्दल अवमानकारक, चुकीची माहिती लिहिल्याबद्दल शाईफेक करण्यात आल्याचे संभाजी ब्रिगेडच्या नितिन रोटे यांनी म्हटलंय.

'लोकसत्ता'चे संपादक गिरीश कुबेर हे आज साहित्य संमेलनात एका परिसंवादात सहभागी होणार होते. या परिसंवादात सहभागी होण्याआधीच त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली. या घटनेमुळे साहित्य संमेलनात मोठी खळबळ उडाली. सकाळीच साहित्य संमेलनामध्ये राष्ट्रवादीचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांनी भेट दिली होती. त्यांनी संमेलन परिसरात फेरफटका मारत साहित्यिकांशी देखील संवाद साधला होता. संमेलनाचे स्वागताध्यक्ष छगन भुजबळ यांनी पवारांचं स्वागत केलं होतं. मात्र, संभाजी ब्रिगेडने केलेल्या या कृत्यामुळे गिरीश कुबेर यांच्या पुस्तकावरून सुरू असलेला वाद आता आणखी पेटण्याची शक्यता आहे. 

ज्येष्ठ पत्रकार गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र’ या पुस्तकावरून वाद सुरू होता. या पुस्तकातील मजकूराबाबत अनेकांनी प्रश्न उपस्थित केले होते. गिरीश कुबेर यांच्या ‘रेनिसान्स स्टेट: द अनरिटन स्टोरी ऑफ द मेकिंग ऑफ महाराष्ट्र या पुस्तकात छत्रपती संभाजीराजे यांची बदनामी करण्यात आला असल्याचा आरोप याआधीच संभाजी ब्रिगेडने केला होता. या पुस्तकावर बंदी घालावी अशी मागणी करण्यात येत होती. 

वाद आणि नाशिकचं साहित्य संमेलन

साहित्यिकांसाठी पर्वणी असलेल्या साहित्य संमेलनाची प्रतीक्षा वाचक, रसिकांनाही तितकीच असते. मात्र साहित्य संमेलन आणि वाद हे समीकरण आता सर्वांच्या परिचयाचे झाले आहे. यंदा नाशिकमध्ये होत असलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाबाबतदेखील सुरुवातीपासून वाद सुरु आहेत. सुरुवातीला अपेक्षेप्रमाणे मानापमान नाट्य रंगलं. साहित्य संमेलनाच्या निमंत्रण पत्रिकेत विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, केंद्रीय राज्य मंत्री भारती पवार यांची नावं नसल्यानं महापौर सतिश कुलकर्णी यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर फडणवीसांच्या नावाचा समावेश पत्रिकेत केला असून ते संमेलनात सहभागी होणार असल्याचं स्वागताध्यक्ष छगन भुजबळांनी सांगितलं आणि या वादावर पडदा पडला.मात्र फडणवीस यांनी संमेलनास येण्यास नकार दिला. त्याआधी संमेलन गीतात सावरकरांचे नाव नसल्यानं मनसेनं उठवला आवाज होता. मनसेच्या इशारानंतर सावरकरांच्या नावाचा गीतामध्ये समावेश केला.

- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -

TRENDING NOW

© Copyright@2025.ABP Network Private Limited. All rights reserved.