सगळ्या शेतकऱ्यांचं लक्ष विधान भवनाकडे लागलं आहे. आम्ही 15 वर्ष सत्तेत होतो तेव्हा निर्णय घ्यायचो. मागण्यांसाठी आमचे आमदार वेलमध्ये यायचे नाहीत. मुख्यमंत्री आणि अर्थमंत्री यांनी भाजप आमदारांना सांगावं की याप्रकरणात भाजपने राजकारण करण्याचा केविलवाणा प्रयत्न करु नये. राजकारण न कळण्याएवढे महाराष्ट्रातील शेतकरी दुधखुळे नाहीत, असा टोला अजित पवारांनी लगावला.
..तर आम्ही चंद्रकांतदादांना मुख्यमंत्री करु : अजित पवार
शेतकरी कर्जमाफीची अचानक उपरती कुठून आली? आंदोलन काय करता कर्जमाफी करा, कर्जमाफी शिवाय सभागृहाचं कामकाज होऊ देणार नाही, असा इशारा अजित पवार यांनी दिला.
कोणीही शब्दांचे खेळ करण्याचे प्रयत्न करु नये. आम्ही कर्जमाफीची मागणी श्रेयासाठी करत नाही. पाण्याची पातळी किती खोल जातेय. 'जलयुक्त शिवार'चा टेंभा मिरवला, पण तरीही टँकरची मागणी होतेय, जाहिरातबाजी आणि घोषणाबाजी करुन प्रश्न सुटत नाही, असा हल्लाबोल अजित पवार यांनी केला.
सरकार गाजर दाखवत आहे. निवडणुकीचे निकाल लागले, आता जनतेचे प्रश्नांना अग्रक्रम द्या, अशी मागणीही अजित पवारांनी केली.
संबंधित बातम्या