Ajit Pawar on A. Y. Patil : कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष ए. वाय. पाटील दोन दिवसांपूर्वी शिंदे गटाच्या व्यासपीठावर दिसून आल्याने एकच खळबळ उडाली. त्यामुळे कोल्हापूरमध्ये राष्ट्रवादीला पहिला हादरा बसणार असल्याची चर्चा रंगली आहे. दरम्यान, राज्याचे विरोधी पक्षनेते अजित पवार यांनी ए. वाय. पाटील यांना चिमटा काढला आहे. 


राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्या मुलाच्या विवाहासाठी अजित पवार आज इस्लामपूरमध्ये उपस्थित आहेत. यावेळी एबीपी माझाशी बोलताना अजित पवार म्हणाले की, ए. वाय. आपलं ठरलंय, व्यासपीठापुरतं मर्यादित रहायचं. पवार यांनी हसन मुश्रीफ यांना एकत्र घेऊन बोलणार असल्याचे सांगितले. त्यामुळे शिंदे गटात जाण्यावर जवळपास शिक्कामोर्तब केलेल्या ए. वाय. पाटील यांची नाराजी दूर होणार का? याची उत्सुकता आहे. राष्ट्रवादीत वेळोवेळी अपमान झाल्याची भूमिका पाटील यांनी बोलून दाखवली आहे. काही दिवसांपूर्वीच त्यांनी कार्यकर्त्यांचा मेळाव्यात भावना बोलून दाखवली होती.


ए. वाय. पाटील कोल्हापूर राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष


दरम्यान, दोन दिवसांपूर्वी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापूरमध्ये पंचगंगा घाटावर पंचगंगेची आरती करण्यात आली. तसेच कणेरी मठावर 20 ते 26 फेब्रुवारी दरम्यान होत असलेल्या 'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण करण्यात आले. या कार्यक्रमात राष्ट्रवादीला पहिला हादरा बसण्याचे स्पष्ट संकेत मिळाले.


'सुमंगलम' महोत्सवाच्या बोधचिन्हाचे अनावरण कार्यक्रमात ए. वाय. पाटील सुद्धा उपस्थित होते. तळ्यात मळ्यात सुरु असलेल्या करवीरचे माजी शिवसेना आमदार चंद्रदीप नरके सुद्धा दिसून आले. नरके शिंदे गटात जाणार याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून आहे. मात्र, ए. वाय. पाटील व्यासपीठावरून दिसून आल्याने राजकीय भूवया उंचावल्या. दुसरीकडे माजी आमदार के. पी. पाटील आणि ए. वाय. पाटील यांच्यातील राजकीय वाद टोकाला गेला आहे. दोघांमधील वाद मिटवण्यासाठी हसन मुश्रीफ यांनी प्रयत्न केले असले, तरी त्यामध्ये यश आलेलं नाही.


इतर महत्वाच्या बातम्या