Ajit Pawar on Rohit Pawar : आज अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तिसऱ्या दिवशी विधानसभेमध्ये चांगलीच खडाजंगी झाली. पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यात शाब्दिक चकमक झाल्यानंतर काही काळ वाद निर्माण झाला.  उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सुद्धा रोहित पवार यांना टोला लगावला. त्यामुळे गुलाबराव पाटील बोलत असताना चांगलीच शाब्दिक चकमक झाल्याचे दिसून आले. पाणीपुरवठा विभागासंदर्भात मंत्री गुलाबराव पाटील विधानसभेत उत्तर देत होते. यावेळी गुलाबराव पाटील उत्तर देत असतानाच रोहित पवार उभेच होते. तेव्हा अजित पवार यांनी टोला लगावला. 

तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या! 

गुलाबराव पाटील बोलत असताना अजित पवार यांचे लक्ष रोहित पवार यांच्याकडे गेले. मंत्री उत्तर देत असताना तेव्हा तरी खाली बस्सा, थोडं दमानं घ्या, असं म्हणत टोला लगावला. दुसरीकडे गुलाबराव पाटील बोलत असतानाच आदित्य ठाकरे हे बोलण्यासाठी उभे राहिले. त्यावेळी गुलाबराव पाटील यांनी सुद्धा तुम्ही शांत बसा असं म्हटल्यावर शिवसेना ठाकरे गटाच्या आमदारांनी एकच आक्षेप घेतला. यानंतर विधानसभा अध्यक्षांनी मध्यस्थी करत दोन्ही दोघांना शांत राहण्याचे आदेश दिले. 

गुलाबराव पाटील आणि आदित्य ठाकरे यांच्यामध्ये शाब्दिक जुगलबंदी

तरीसुद्धा मंत्री गुलाबराव पाटील यांनी आदित्य ठाकरे यांच्यामध्ये जुगलबंदी सुरूच राहिली आदित्य ठाकरे म्हणाले की मंत्री नेहमी केंद्रावर बोट ठेवत असतात, मग मंत्र्यांना खाते कळतं की नाही? यावेळी बोचरी टीका झाल्याने गुलाबराव पाटील यांनी सुद्धा पलटवार केला. मला खातं कळतं तर म्हणून तर तुमच्या वडिलांनी मला खात दिलं होतं, अशी बोचरी टीका केली. त्यानंतर आदित ठाकरे यांनी पलटवार केला म्हणून तुम्ही पळून गेले होते असा प्रतिटोला लगावला. दोघांची खडाजंगी सुरू असतानाच विधानसभा अध्यक्षांनी पुन्हा एकदा हस्तक्षेप करत वैयक्तिक कमेंट करू नये, ते रेकॉर्डवरून काढून टाकावे असे निर्देश दिले. 

इतर महत्वाच्या बातम्या