विधानसभा निवडणुकीनंतर अजित पवार यांची राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर नियुक्ती करण्यात आली होती. परंतु त्यांनी बंडखोरी केल्यामुळे या पदावरुन त्यांना हटवले आहे. दरम्यान, राष्ट्रवादीच्या विधीमंडळ पक्षनेतेपदावर प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील किंवा दिलीप वळसे पाटील यांची निवड होऊ शकते, अशी माहिती मिळाली आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही दिवसांपासून हाय व्होल्टेज ड्रामा सुरु आहे. हा ड्रामा सुरु असताना आज राज्यात मोठा राजकीय भूकंप झाला. कोणालाही कल्पना नसताना आज सकाळी भाजप आमदार देवेंद्र फडणवीस यांनी राजभवन येथे गुपचूप मुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. तर राष्ट्रवादीचे आमदार अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली.
दरम्यान, सत्तेसाठी कुटुंबात फाटाफूट नको, तू काहीही कर, पण उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी त्यांचे मोठे बंधू अजित पवार यांना केले आहे. अजित पवारांनी भाजपशी हातमिळवणी केल्यामुळे पवार कुटुंबाला मोठा धक्का बसला आहे.
आपल्या कुटुंबाचा आत्तापर्यंतचा प्रवास महाराष्ट्राला माहिती आहे. सत्तेच्या खेळासाठी आपल्या कुटुंबात फूट पडायला नको. तुला जे हवे आहे त्यावर आपण चर्चा करु, त्यावर तोडगा काढू. तू पहिल्यांदा राजीनामा दे आणि परत ये, असे भावनिक आवाहन खासदार सुप्रिया सुळे यांनी केले आहे. मात्र, यावर अजित पवारांनी कोणती प्रतिक्रिया दिली हे समजू शकले नाही.
"काहीही कर, उपमुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दे - सुप्रिया सुळे | ABP Majha
अजित पवारांच्या भूमिकेला कधीही पाठिंबा देणार नाही- शरद पवार | ABP Majha
व्हिडीओ पाहा : कालपासून बेपत्ता असलेले धनंजय मुंडे परतले
"पवार कुटुंबात उभी फूट", पत्रकारांशी बोलताना सुप्रिया सुळेंच्या डोळ्यात पाणी | ABP Majha
बहुमत सिद्ध करण्याची प्रक्रिया कशी पार पडेल? माजी विधीमंडळ सचिव अनंत कळसेंचं विश्लेषण
'त्या' निर्णयात शरद पवारही सामील; नवनीत कौर राणांचा आरोप