मुंबई : उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी IPS अधिकारी मीरा बोरवणकर (Meera Borwankar book) यांनी पुस्तकात केलेल्या आरोपांवर स्पष्टीकरण दिलं. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो, असं अजित पवार म्हणाले. मुंबईतील पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या पत्रकार परिषदेची सुरुवात फुले वाड्याबाबत मुंबई हायकोर्टाने (Mumbai High Court) दिलेल्या निर्णयावरुन झाली. 


अजित पवार काय म्हणाले? 


मी भला आणि माझं काम बरं असा माझा स्वभाव असून रिटायर्ड पोलीस अधिकाऱ्यांनी केलेल्या आरोपांचा माझा काही संबंध नसल्याची प्रतिक्रिया राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. मीरा बोरवणकरांनी त्यांच्या 'मॅडम कमिशनर' पुस्तकातून येरवडा जेल परिसरातील जमिनीसंबंधित अजित पवारांवर आरोप केले होते. त्यावर अजित पवारांनी आज स्पष्टीकरण दिलं आहे. 


मी आजपर्यंत म्हणजे जवळपास 32 वर्षे झाली, माझा स्वभाव जरी कडक असला तरी मी राज्यातल्या अधिकाऱ्यांशी व्यवस्थितपणे बोलत असतो. माझ्याकडे आतापर्यंत अनेक विभागांचा कारभार होता, त्या अधिकाऱ्यांशी मी योग्य पद्धतीने वागलो असल्याचं अजित पवार म्हणाले. 


अजित पवार म्हणाले की मी कुणाच्या टीकेला उत्तर देत नाही. मागील 3 ते 4 दिवस माझ्या विरोधात बातम्या येत आहेत. मी त्याला महत्त्व दिलं नाही. माझा त्याचाशी काहीही संबंध नाही. मी अनेकवर्ष पालकमंत्री होतो. मी एवढ्या वर्षात कायद्याच्या चौकटीत न बसणाऱ्या कोणत्याही गोष्टी केल्या नाहीत. जर एखाद्याचं काम होत नसेल तर मी त्याला तोंडावर नाही होत म्हणून सांगतो. पण चुकीचं काही काम करत नाही."


मीरा बोरवणकरांच्या पुस्तकात बरंक काही आहे, पण माझ्यावर फोकस का केला जातोय असाही सवाल अजित पवारांनी विचारला. ते म्हणाले की या प्रकरणानंतर विरोधी पक्षाच्या काही नेत्यांनी माझी चौकशी करा अशी मागणी केली. तो त्यांचा अधिकार आहे. 


फुले वाड्याबाबत महत्त्वाचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने दिला आहे. 2015 आणि 2018 ला राज्य सरकारने भूमिका मांडली आणि राष्ट्रीय दर्जाचं स्मारक व्हावं अशी सर्वाची इच्छा होती. छगन भुजबळ यांनी पुढाकार घेऊन यामध्ये लक्ष घातलं. स्मारक लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. 


ही बातमी वाचा: