Ajit Pawar : येणाऱ्या निवडणुकांमध्ये तुम्ही गाफील राहू नका, जागा मर्यादित आहेत. सगळ्यांना आमदार खासदार होता येत नाही असे वक्तव्य राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. सत्तेचं विकेंद्रीकरणासाठी स्थानिक स्वराज्य निवडणुका होतात. काहीही झाल तरी चांगला निधी देऊ असे उपमुख्यमंत्री अजित पवार म्हणाले. आज अनेकांनी पक्षात प्रवेश केला त्यांच स्वागत करतो. 

Continues below advertisement

निवडणुकीसाठी आपल्याकडे वेळ कमी

एका गोष्टीची जाणीव आहे, की निवडणुकीसाठी आपल्याकडे वेळ कमी आहे. राज्याचा आढावा घेताना कार्यकर्ते मुंबईला आले होते, त्यानंतर आज त्यांना मी वेळ दिला आहे. तुम्हाला थांबावं लागलं याची खेद आहे. नव्या जुना असा वाद न करता  सर्वांना समान भावना देऊ. सगळ्यांच मनापासून अभिनंद. अनेक वर्ष संग्राम थोपटेंचं वर्चस्व होतं पण यावेळी मुळशीला प्रतिनिधीत्व दिलं आहे. सगळे निधी देऊन आपण मदत करतो. तिन्ही नगरपालिका आपल्या विचारांच्या आणायच्या आहेत. 

सगळ्यांना 100 टक्के समाधानी करता येणार नाही

स्वतछता, वृषक्षारोपणाला मी महत्त्व देतो, सकाळी पाहणी करतो माझी सवय आहे. आपण प्रतिनिधित्व करतो आहे त्याच समाधान मिळालं पाहिजे. सगळ्यांना 100 टक्के समाधानी करता येणार नाही. अनेक समित्यांमध्ये ज्यांना संधी मिळणार नाही. तीन पक्षाचं सरकार आहे ज्यांना उमेदवारी देता येणार नाही त्यांना समित्यांमध्ये सामावून घेणार असल्याचे अजित पवारम्हणाले. आपण चांगल्या प्रकारे पुढे जाऊ. भोरचा चेहरा बदलण्याचा मानस आहे. उतरवलीची एमआयडीसी प्रलंबित आहे तिथं प्रोजेक्ट येतील. तीन महत्त्वाची धरण आहेत, तिथं अजून पाण्याचे प्रश्न सोडवू असेही अजित पवार म्हणाले. कोकणला जाण्यासाठी घाट आणि वनविभागात लक्ष घातलं आहे. माझ्या शब्दावर विश्वास ठेवा, मी वेळ मारुन नेणार नाही कामाचा माणूस आहे असं अजित पवार म्हणाले. 

Continues below advertisement