पुणे: कोरेगाव पार्क येथील जमीन व्यवहार प्रकरणावरून सध्या राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. या प्रकरणात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांचे पुत्र पार्थ पवार (Parth Pawar) आणि त्यांचे मामेभाऊ दिग्विजय पाटील (Digvijay Patil) हे दोघे भागीदार असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. ही जमीन व्यवहार “अमेडिया कंपनी” (Amedia Pvt. Ltd.) मार्फत करण्यात आली असून, या कंपनीत पार्थ पवार आणि दिग्विजय पाटील हे प्रमुख भागीदार आहेत. या व्यवहारात गंभीर गैरव्यवहार आणि शासकीय नियमांचे उल्लंघन झाल्याचा आरोप आहे. तर शीतल तेजवानी गायब असल्यानं पार्थ पवारांचा वादग्रस्त जमीन व्यवहार रद्द होऊ शकत नाही. दुय्यम निबंधक कार्यालयात शीतल तेजवानी आणि अमेडिया कंपनीकडून दिग्विजय पाटलांना समक्ष हजर राहणं बंधनकारक आहे. अशा परिस्थितीत शीतल तेजवानी परदेशात गेली असेल तर ती जो पर्यंत समोर येण्याची वाट पहावी लागेल.
Parth Pawar Land Scam: शीतल तेजवानी सध्या गायब आहे
काल उपमुख्यमंत्री अजित पवारांनी हा व्यवहार रद्द झालं असं जाहीर करताना या पुढची सगळी पूर्तता ही शासकीय नियमांना धरूनच करावी अशा स्पष्ट सूचना दिल्या आहेत. त्यामुळे पार्थ पवारांना आता काही अटींची पूर्तता करावी लागणार आहे. कंपनीने जमीन खरेदी करताना दिग्विजय पाटील यांच्याकडून सही करण्यात आली तर शीतल तेजवानी यांनी जमीन विक्री केली म्हणून त्यांची सही होती, आता हा व्यवहार रद्द करायचा असेल तर त्यांना म्हणजेच सही करणाऱ्या दिग्विजय पाटील आणि शितल तेजवानी या दोघांनाही दुय्यम निबंधक कार्यालयामध्ये हजर राहणं बंधनकारक असणार आहे. मात्र शीतल तेजवानी सध्या गायब आहे. शितल तेजवानीचा फोन लागत नाहीये, शितल तेजवानी कुठे आहे असं त्यांच्या निकटच्या व्यक्तींना विचारलं तर त्यांनाही ती कुठे आहे ही माहिती नाहीये आणि पोलिसांना विचारलं तर त्यांनी शंका व्यक्त केली आहे कदाचित ती परदेशात गेली असेल. मग शितल तेजवानी जोपर्यंत समोर येत नाही, तोपर्यंत ही सही होणार नाही आणि हा व्यवहारही रद्द होणार नाही.
Parth Pawar Land Scam: पार्थ पवारांना देखील काही अटींची पुर्तता करावी लागणार
त्याचबरोबर पार्थ पवारांना देखील काही अटींची पुर्तता करावी लागणार आहे, त्यातली पहिली, मुद्रांक शुल्क 21 कोटी रुपयांचा भरावा लागणार आहे. त्याचबरोबर सुरवातीला जमीन खरेदी व्यवहार केला त्यातील मुद्रांक शुल्क, त्यापुढे आणखी एक अट आहे विजय कुंभार यांच्या म्हणण्यानुसार दीडशे ते पावणे दोनशे कोटी रुपयांचा नजराना त्यांना भरावा लागणार आहे, ही सगळी पूर्तता केल्यानंतर हा जमीन व्यवहार रद्द होणार आहे, त्याच वेळी पार्थ पवारांची या प्रकरणातून मुक्तता होणार आहे.