Ajit Pawar : विरोधी पक्षात राहून लोकांची जास्त कामं करता येत नाहीत, असं वक्तव्य उपमुख्यमंत्री अजित पवार (Ajit Pawar) यांनी केलं आहे. पुणे जिल्ह्यातील जेजुरी येथे (Jejuri Shashan Aplya Dari)) होणाऱ्या शासन (Jejuri) आपल्या दारी कार्यक्रम पार पडत आहे. याच कार्यक्रमात ते बोलत होते. ते म्हणाले की,' काहीजणांना प्रश्न पडला असेल की अजित पवार आधी महाविकास आघाडीत काम करत होते. पण मला विकास करायचा आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी काही दिवसांपूर्वी पुण्यात आले होते. त्यापूर्वी गडकरी आले होते. काल अमित शहा आले होते. विरोधी पक्षात राहून लोकांची कामं जास्त करता येत नाहीत.'
राज्याच्या प्रपंचाचा कारभार एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सुरु आहे. पुरंदरचे एअरपोर्ट उभारण्याची मागणी होतेय तर काहीजण विरोध करत आहेत. मी राज्याच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्याच्या साक्षीने सांगतो की हे महायुतीचे सरकार कोणालाही वाऱ्यावर सोडणार नाही. योग्य मोबदला दिला जाईल, असंदेखील ते म्हणाले. हे सरकार आधी डबल इंजिनचं होतं. आता आमचे इंजिन जोडले गेल्याने हे सरकार आणखी वेगाने काम करेल. अमित शहांनी लोकांच्या हितासाठी, त्यांची कामे व्हावीत यासाठी आम्ही महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींचे नेतृत्व जगाने मान्य केलं असल्याचं ते म्हणाले.
काम बोललं पाहिजे...
उस उत्पादक शेतकऱ्याच्या साखर कारखान्याला करोडोंचा टॅक्य शेतकऱ्यांना लागला होता. मात्र पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात अमित शाह यांनी माफ केलं. यासाठी मी आणि अनेक शिष्टमंडळाने केंद्रिय मंत्र्यांच्या भेटी घेतल्या होत्या. मात्र 20 ते 22 वर्ष रखडलं होतं. मात्र मोदींनी हे काम करुन दाखवलं. काम बोललं पाहिजे. या निर्णयामुळे अनेक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला असल्याचं ते म्हणाले.
'बस स्थानकांचा पुनर्विकास झाला पाहिजे'
केंद्र सरकारने ज्या प्रमाणे देशातील रेल्वे स्थानकाचा पुनर्विकास करण्याचं धोरण हाती घेतलं आहे. त्याचप्रमाणे राज्यातील बसस्थानकांचा देखील पुनर्विकास झाला पाहिजे. यासाठी देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा सुरु आहे. त्यामुळे येत्या काळात बसस्थानकासंदर्भात चांगला निर्णय घेण्यात येईल, असंही ते म्हणाले.