छत्रपती संभाजीनगर : लोकसभा निवडणुकीत मुंबई महाराष्ट्रापासून तोडण्याचं काम केले जातं आहे असे म्हणतील आणि महाराष्ट्रात मत मिळवण्यासाठी काम करतील, अशी खोचक टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.जी टीका भाजपकडून उद्धव ठाकरे यांच्यावर केली जाते, तीच टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली आहे. लोकसभा निवडणूक लागेल, त्यावेळी आपल्यासोबत असलेल्या पक्षाचं काम करायचे आहे असा सल्लाही त्यांनी दिला.  छत्रपती संभाजीनगरमध्ये राज्यव्यापी संविधान गौरव मेळाव्यातून अजित पवार यांनी विरोधकांवर जोरदार टीका केली. 






कोणताही माय का लाल संविधान बदलू शकत नाही 


अजित पवार म्हणाले की, काहीजण सांगतात संविधान बचाव देश बचाव अस म्हणायचं. पण कोणताच माय का लाल संविधान बदलू शकत नाही .अस्वस्थ करण्याचं काम केलं जातं आहे. अजित पवार यांनी मोदी यांचे कौतुक करताना 135 देशात मजबूत नेता कोण आहे, अशी विचारणा केली. विरोधी पक्षांनी बोलण्याची पातळी सोडली असेल, तर आपण सोडू नका. सोशल मीडियाचा वापर केला जातो, त्याला तेवढाच उत्तर द्या असे ते म्हणाले.  






असल्या लोकांना फाशीची शिक्षा द्या 


ड्रग्ज अड्डा झालेल्या पुण्यातील कारवाईवरही अजित पवार यांनी भाष्य केले. ते म्हणाले की, पुण्यामध्ये 4 हजार कोटींचे  ड्रग्ज सापडलं. त्याचा म्होरक्या पंजाबमध्ये सापडले त्यांना सोडू नका. असल्या लोकांना फाशीची शिक्षा द्या. उद्या आधिकाऱ्यांसोबत बैठक घेणार आहे. आता बंदूक लायसन देण्याबाबतही आम्ही कडक भूमिका घेतली आहे. एकत्र जेवतात आणि तिथे गोळ्या घालतात. आता पोलिसांनी जेवताना जायचे का? अशी विचारणा त्यांनी केली. ते पुढे म्हणाले की, पोलीस स्टेशनमध्ये (उल्हासनगर भाजप आमदार गणपत गायकवाड गोळीबार) गोळ्या झाडल्या त्यावेळी पोलीस धावून गेले. 


आरक्षणावर बोलताना त्यांनी सांगितले की, आज आरक्षणचा मुद्दा समोर आहे. गरीबांना आरक्षण मिळालं पाहिजे. इतरांच्या आरक्षणाला धक्का न लावता दिल पाहिजे, असे त्यांनी नमूद केले. 


इतर महत्वाच्या बातम्या