Ajit Pawar on Maharashtra Budget 2023 : अर्थमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज अर्थसंकल्प सादर केला. या अर्थसंकल्पावर विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे. विरोधी पक्ष नेते अजित पवार यांनीही या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. फडणवीसांचा अर्थसंकल्प म्हणजे चुनावी जुमला असल्याचं वक्तव्य अजित पवार यांनी केले आहे. 


निवडणुका डोळयासमोर ठेऊन तयार केलेला अर्थसंकल्प आहे. देवदर्शन बजेट. करून करून भागले आणि देवदर्शनाला लागले, असे टीकास्त्र अजित पवार यांनी सोडले.  लोकसभेसोबत त्यांना विधानसभेच्या निवडणुका घ्यायच्या आहेत. आम्ही तयारीला लागलो आहोत. आता उद्धव आणि नाना पटोलेंसोबत बैठक आहे, असेही अजित पवार यांनी  सांगितलं. 


होतं नव्हतं ते जाहीर करा, पुढचं पुढं बघू अशा आशयाचा हा अर्थसंकल्प आहे, असे अजित पवार म्हणाले. वीज गॅस पाणीपुरवठा सेवा याकडे आजच्या अर्थसंकल्पात निधी नाही. तुकाराम महाराज यांच्या देहूसाठी कही घोषणा करतील असं वाटलं मात्र काहीचं केलं नाही. अरबी समुद्रातील शिवाजी महाराज स्मारक बाबत काहीचं घोषणा नाही, असे अजित पवार म्हणाले. 


मी अर्थसंकल्प मांडला, पंचसूत्र मांडलं, यांनी विकासाचं पंचामृत मांडलं आहे मुळात अमृत कोणी बघितला नाही. आधीच्या योजनांबाबत काय झालं? विकास कामांवर निधी खर्च होतं नाही. काही जिल्ह्यात 4 टक्के 5 टक्के निधी खर्च झाला आहे. बजेचा खर्च पाहिला तर 51 टक्के खर्च झाला आहे. आता 20 दिवसांत उरलेला 50 टक्के निधी हे खर्च करणार कसे आहेत, असे अजित पवारम म्हणाले. 


यांनी निधी किती दिला याची काहीचं माहिती दिली नाही. केवळ महामंडळांसाठी भरीव तरतूद करणार करणार, पण काय करणार हा प्रश्न बाकी आहे. वीज माफीची घोषणा केली मात्र यांनी पुढं काहीचं केलं नाही. 25 तारखेला अधिवेशन संपला की 1 तारखेला नागरिकांना झटका बसणार आहे? कारण हे वीज दर वाढवणार आहेत. केवळ शेतकऱ्यांची थट्टा करणे सूरू आहे. शेतकऱ्यांच्या कांद्याला, गव्हाला दर द्या. आता राज्य कर्जबाजरी होईल अशी परिस्थिती निर्माण झाली आहे, अशी टीका अजित पवार यांनी केली.



फडणवीस यांनी एक पुस्तक लिहल होतं. त्यामध्ये अर्थसंकल्प कसा वाचायचा हे लिहलं असतं तर बरं झालं असतं, अशी खोचक टीकाही यावेळी अजित पवार यांनी केली. खुल्या अर्थिक धोरणाचा स्वीकार 1991 साली मनमोहन सिंग यांनी केला होता. त्यानंतर अटलबिहारी यांनी देखील त्याचा स्वीकार केला होता. आजचा अर्थसंकल्प निराशाजनक आहे. 14 मार्चला कोर्टाचा सरकारबाबतचा निकाल लागणार आहे. त्याचा परिणाम आज अर्थसंकल्पामध्ये दिसत आहे. किंवा कसबा निवडणूकीसाठी ज्या प्रकारे परिस्थीत झाली त्यामुळें नुसत्या घोशना करण्यात आल्या आहेत असं वाटत आहे, असे अजित पवार म्हणाले.