Ravindra dhangekar : कसबा मतदार संघाचे नवनिर्वाचित आमदार रविंद्र धंगेकर (Ravindra dhangekar) यांचा आज शपथविधी पार पडला. मात्र शपथविधी पूर्वी केलेल्या एका कृतीमुळे ते पुन्हा एकदा चर्चेत आले. शपथविधी पूर्वी धंगेकरांनी "हू इज धंगेकर" म्हणणाऱ्या पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या जवळ जाऊन नमस्कार केला. त्यावेळी हू इज धंगेकर अशा घोषणा देण्यात आल्या.
रविंद्र धंगेकर कसब्यातून निवडून आल्यानंतर "हू इज धंगेकर" हा चंद्रकांत पाटील यांनी प्रचाराता मारलेला डायलॉग खूप फेमस झाला होता. या डायलॉगमुळे चंद्रकांत पाटलांना कॉंग्रेसच्या कार्यकर्त्यांनी चांगलंच ट्रोल केलं. धंगेकर ईज नाऊ एमएलए असे पोस्टर्स लावले होते. त्यानंतर रविंद्र धंगेकरांनी निवडून आल्यानंतर मी रविंद्र धंगेकर असं प्रत्युत्तर दिलं होतं. त्यानंतर आज विधानसभेत शपथविधीपूर्वी त्यांनी चंद्रकांत पाटलांना नमस्कार केल्याने पून्हा एकदा "हू इज धंगेकर" च्या घोषणा रंगल्या.
डायलॉगची राज्यभर चर्चा
भाजपने कसबा पोटनिवडणुकीत धंगेकरांना पराभूत करण्यासाठी चांगलीच फौज मैदानात उतरवली होती. रोड शो, प्रचारसभा, कोपरा सभा घेतल्या होत्या. त्याशिवाय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेदेखील मैदानात उतरले होते. त्यावेळी चंद्रकांत पाटलांनी प्रचार सभेत रवींद्र धंगेकरांना चांगलंच डिवचलं होतं. भरसभेत हू इज धंगेकर तो आमच्यासमोर टिकू शकत नाही असं वक्तव्य केलं होतं. त्यानंतर धंगेकरांचे समर्थक पेटून उटले होते त्यांनी सगळ्या कसब्यात पुणेरी पाट्या लावल्या होत्या. विजयानंतर त्यांनी ही कविता व्हायरल करुन चंद्रकात पाटलांना चांंगलंच उत्तर दिलं. धंगेकर नाऊ.. MLA असं आता सगळीकडे व्हायरल केलं. कसबा हा मागील 28 वर्षांपासून भाजपचा बालेकिल्ला आहे. खासदार गिरीश बापट यांच्यानंतर मुक्ता टिळकांनी कसब्याचा विकास केला. त्यानंतर पहिल्यांदाच या मतदारसंघात कॉंग्रेसने मुसंडी मारली आहे. ही निवडणूक भाजपने मोठी प्रतिष्ठेची केली होती. त्यामुळे रवींद्र धंगेकर यांचा हा विजय भाजपला मोठा धक्का मानला जात आहे.
हू इज रविंद्र धंगेकर विचारल्यावर चंद्रकांत पाटील 'शांत'
चंद्रकांत पाटील हे चिंचवडच्या विजयी आमदार अश्विनी जगताप याचं अभिनंदन करायला गेले होते. त्यावेळी पत्रकारांनी त्यांना हू इज धंगेकर विचारल्यास त्यांनी उत्तर देण्यास चंद्रकांत पाटलांनी टाळाटाळ केली होती. कसब्याची पोटनिवडणूक महाविकास आघाडीच्या रविंद्र धंगेकर यांनी जिंकल्यानंतर कोल्हापुरात देखील होर्डिंग लावण्यात आले. मात्र या होर्डिंगवर 'धीस इज धंगेकर' म्हणत चंद्रकांत पाटील यांच्यावर महाविकास आघाडीने टीका केली आहे.